Bhaucha Dhakka
मुंबई देशाचे सगळ्यात मोठे शहर आणि देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे काही लोक मुंबईला मायानगरी हि म्हणतात या माया नगरीत आकर्षणाची कोणतीही कमी नाही. या मुंबईला फार मोठा इतिहास आहे पण आपण आज या मुंबईत एक वास्तू जी काळाच्या ओघात भूतकाळात जमा होत चालली आहे. ज्यावास्तूने मुंबईला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती पूर्वी इंग्रजांच्या काळापासून एक गजबजलेलं ठिकाण म्हणजे "भाऊंचा धक्का" आपण आज या बद्दल जाणून घेणार आहोत.
भाऊंचा धक्का कधी बांधण्यात आला ? तो कुणी बांधला ? त्याची आवश्यकता किती होती ? त्यासठी किती खर्च आला ? तो नंतर भविष्यात किती उपयोगी ठरला ? व त्याची आताची स्तिथी काय आहे ते आपण विस्तारपणे पाहूया.
भाऊंचा धक्क्याला आताच 179 वर्ष पूर्ण झाली हा भाऊंचा धक्का गेली 179 वर्ष लोकांची सेवा करीत आहे आणि अजूनही करीत आहे. एके काळी या धक्क्यावरूनच कोकणातील व गोव्याकडील प्रवाशी प्रवास करीत होते. मुंबई शहरात जाण्यासाठी आणि दूरचे अंतर पार करण्यासाठी प्रवासांना जहाजाने प्रवास करणे भाग होते तेव्हा एसटी बसची सुविधा नव्हती आणि बेशिस्त खाजगी बस प्रवासापेक्षा जहाजाने प्रवास करणे सोयीस्कर होते. म्हणून त्याकाळी जवळजवळ कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गाने होत असे, मुंबई बेटावर समुद्रमार्गे होणारी मालाची व प्रवाशांची वहातूक लहान-मोठे मचवे-गलबत्ताद्वारे होत असे.
1841 पर्यंत हा धक्का बांधून होण्यापूर्वी मुंबईच्या अफाट सागरी किनाऱ्यावर प्रवाशांसह मालाची चढ-उतार करण्यासाठी सुरक्षित असा धक्का नव्हता रात्रभर प्रवास कसून आलेलं जहाज लांब कुठेतरी नांगर टाकायची आणि मग मोठ्या होड्यातून आणि मचव्यातून प्रवासी खच्चून भरून किनाऱ्यावर यायचे किनाऱ्यावर बोटीतून उतरल्यावर चिखलातून चालत जमिनीपर्यंत पाय टेकेपर्यंत उतारूंचे खूप हाल व्हायचे हे दुश्य भाऊ रोज पाहून हळहळत असे. ब्रिटिश सरकार प्रवाशांचे हे होणारे हाल निवारण्यासाठी स्वतःहून काही करणार नाही हे भाऊंना माहित होते तेव्हा त्यांनी स्वतःच येथे धक्का बांधण्याचे मनोमनी ठरविले आणि काही काळातच एका कोकणी माणसाकडून कोकणी माणसांसाठी हक्काचा धक्का तयार झाला.
भाऊ बद्दल सांगायचे झाले तर, लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य हे रायगड जिल्ह्यातील उरण मधल्या कारंजा गावी इ. स. १७८८ साली लक्ष्मण अजिंक्य यांचा जन्म झाला त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजे १९०१ साली त्यांचे कुटुंब मुंबईत आले त्याचे पुढील शिक्षण मुंबईत पूर्ण केले पण काही दिवसात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली भाऊ लहानपणापासून हुशार, मेहनती आणि मनमिळावू होते. त्यामुळे त्यांना मुंबईत कुलाबा येथी इस्ट इंडिया गन कॅरीएज कंपनीत कारकुनाची नोकरी मिळाली. युद्ध साहित्य व यंत्र बनवणाऱ्या या कंपनीत तोफखाना खात्यात कॅप्टन रसेल या वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी होता याच्या खात्यामध्ये एका मराठी माणसाने चोरी केली त्या बद्दल त्याला फटक्याची शिक्षा सुनावण्यात आली हे एकूण भाऊ अस्वस्थ झाले कि एका क्षुल्लक चोरीसाठी सर्वांसमोर त्याला फटके खावे लागणार. भाऊ यांनी तोफखाना खात्यातील कॅप्टन रसेल याना भेटून त्या मराठी माणसाला माफ करण्यासाठी क्षमायाचनाची विनंती केली. भाऊंची त्यामराठी माणसाबद्दलची तळमळ पाहून रसेल यांनी त्या मराठी माणसाला माफ केले. यामुळे रसेल यांच्या मनात भाऊ बद्दल एक वेगळाच आदर निर्माण झाला. ब्रिटिश अधिकारी रसेलने लक्ष्मणला मिठी मारून म्हणाला 'यु आर माय ब्रदर' असे उद्गार काढले हि बातमी पूर्ण कारखान्यात पसरली रसेल सारख्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मणाला ब्रदर या नावाने संबोथले व भाऊंच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि रसेल सारख्या अधिकाऱ्याचा चांगला लोभ भाऊंना लाभल्यामुळे साऱ्या कंपनीत मूळनाव लक्ष्मण हे मागे पडून त्यांना सर्व कर्मचारी व कामगार वर्ग 'भाऊ' यानावाने ओळखू लागले.
त्यावेळी मुंबईला तसा ग्रामीण भागाचा थोडाफार प्रभाव होता. मुंबई हि सात बेटांचे एक शहर म्हणून ओळखले जात होते आणि याच छोट्या छोट्या बेटावरून म्हणजे माहीम, वरळी, मजगाव, परळ, माटुंगा, धाकटा कुलाबा, मोठा कुलाबा, याठिकाणाहून कामगार व कर्मचारी वर्ग कामावर येत असत त्याच्या जेवणाचे फार हाल होत असत त्याच्यासाठी दुपारची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आपण उपहार सुरु करण्याची इच्छा त्यांनी कारखाना प्रशासनाकडे केली. भाऊंवर विश्वास असलेला रसेल अधिकाऱ्याने यासाठी भाऊंनीच हे उपहार चालवू देण्याची शिफारीश केली व ती मान्य हि झाली. भाऊने माफक दरामध्ये कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण उपलब्ध करून दिले. इथूनच भाऊंच्या उज्वल व्यावसायिक भविष्याची वाटचाल सुरु झाली. भाऊंच्या अंगी असलेली कामाबद्दलची कार्यक्षमता, विचारांची कल्पकता, परिश्रम करण्याची तयारी, कामाची चिकाटी व आपल्या सोबत कामकारणाऱ्या बद्दल आदर आणि प्रेम पाहून रसेल यांनी त्यांना कामात बढती तर मिळवून दिलीच पण सोबत प्राथमिक अवस्थेतील वाढत्या व्यापारी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सहकार्य केले. त्यावेळी मुंबईत वाढत्या लोकसंख्या मुळे जमा होणार कचरा, सांडपाण्याची डबकी, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले होते ते कामाचे कंत्राट भाऊंना मिळाले. भाऊ यांनी रसेलसबंधी कृतज्ञता म्हणून आपल्या कंपनीचे नाव "भाऊ रसेल आणि कंपनी" असे दिले. पुढे "भाऊ रसेल" हेच नाव भाऊच्या सोबत कायमचे जोडले गेले ते अखेर पर्यंत.
नंतर भाऊंनी गनर्केरिएज स्थापनेतील नोकरीचा राजीनामा दिला आणि आपली व्यावसायिक कारकीर्द जोमाने सुरु केली. मुंबईच्या पूर्वी किनाऱ्यावर भरणी घालून कारनॅक बंदर आणि कॅलरीअर कलेअर बंदर उभारणीचे कामही कंपनी करीत होती पण भाऊंच्या डोक्यामध्ये मुंबईच्या किनाऱ्यावर प्रवाशांचे हाल त्यांना स्वस्त बसू देत नव्हते आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सोयीस्कर व्हावा यासाठीधक्का असावा असा विचार भाऊ अजिंक्य याच्या मनामध्ये सतत येत होता. या दरम्यान उरण ते मुंबई सागरी प्रवास करताना, मुंबई बंदरावर उतरताना प्रवाशांचे खूप हाल व्हायचे. प्रवाशांना किनाऱ्यावर सुखरूप उतरून इच्छितस्थळी मार्गस्थ होण्यासाठी चांगले रस्ते बांधण्यासाठी त्यावेळचे रेव्ह्य़ेन्यू कलेक्टर ब्रुससाहेबांकडे भाऊंनी अर्ज केला. त्याद्वारे मशिद बंदर ते क्रॉफर्डमार्केट, डोंगरी ते समुद्रसपाटीपर्यंत पाण्याखालील जागेवर भराव टाकून रस्ताबांधणी कंत्राट देण्याची विनंती केली. हे काम मिळवण्यात भाऊ अजिंक्य यशस्वी झाले. कारण ‘या नियोजित कामामुळे प्रवाशांची सोय होऊन बंदरमार्गे होणाऱ्या व्यापाराला चालना मिळून सरकारचा महसूलही वाढेल,’ हे सरकारला भाऊंनी पटवून दिले. भाऊंच्या या प्रस्तावाला गव्हर्नर ग्रांटकडे शिफारस करताना कलेक्टर ब्रुसनी अभिप्राय दिलाय की, लक्ष्मण हरिश्चंद्रजींनी प्रस्तावाद्वारे सादर केलेल्या सूचना सार्वजनिक हिताच्या असून सागरीमार्गे होत असलेल्या तस्करीलाही आळा बसेल.
हे सर्व करत असताना सरकारच्या नजरेमध्ये भाऊ अजिंक्य यांना एक बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळखीसह मान्यता प्राप्त झाली. नैसर्गिक बंदर म्हणून मुंबईचे नाव सर्वत्र होते हे जरी खरे असले तरी मुंबई बेटावर समुद्रमार्गे होणारी मालाची व प्रवाशांची वहातूक लहान-मोठे मचवे-गलबत्ताद्वारे होत असे. 1841 पर्यंत मुंबईच्या अफाट सागरी किनाऱ्यावर प्रवाशांसह मालाची चढ-उतार करण्यासाठी सुरक्षित असा धक्का नव्हता. मुंबईमार्गे देशात व्यापारवृद्धी करण्याचा ध्यास घेतलेल्या दूरदृष्टीच्या इंग्रजांना ही मालधक्क्याची उणीव वारंवार जाणवायला लागली.
अखेर सुरक्षित मालधक्का बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मालकी हक्कांनी बंदर बांधकाम करण्यासाठी अर्ज मागवले. नेहमीच आव्हानं स्वीकारणाऱ्या भाऊंनी या कामासाठी अर्ज करण्याचं धाडस केलं. भाऊंच्या अर्जाला काही अटीवर मंजुरी देण्यात आली आणि त्याच्या कडून बंदर बांधण्याचा आराखडा मागविण्यात आला भाऊंनी अभ्यासपूर्वक आराखडा तयार करताना भरती - ओहोटी चा आणि पर्यावरणाचा अभ्यास केला होता मातीचा भराव टिकणार नाही म्हणून कचऱ्याचा भराव घालण्याची संकल्पना भाऊने पटवून दिली कचरा भिजल्या नंतर त्याचा लगदा बनतो हे भाऊंना माहित होते आणि कचऱ्याची व्हिले वाट लावण्याचे कंत्राट भाऊंकडे आधीपासूनच होते त्यामुळे त्यांना कचऱ्याचा भराव समुद्रात टाकला आणि काम सुरु केले.
पुढे हे काम सुरु असताना इंग्रजांनी लीज मध्ये वारंवार बदल केल्या मुळे त्यांना बरेच अडचणींना तोंड द्यावे लागले पण या कठीण परिस्थितीत भाऊ अजिंक्य यांच्या अडचणी जाणून गव्हर्नर रॉबर्ट ग्रांट यांनी 6 टक्के चक्रवाढ या व्याज दराने दीड लाख कर्ज मंजूर करून दिले त्यानंतर भाऊंनी कामाला गती देऊन पुढच्या चार वर्षात 1841 मध्ये धक्कयाचे काम पुर्णतर केलेच शिवाय येणाऱ्या-जाणाऱ्या मालासाठी सुसज्ज वखारीची उभारणी केली, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था, माल वाहतुकीसाठी प्रशस्त रस्ते, सुरक्षित तटाची बांधणी मोट्या कुशलतेने केली यामुळे दळणवळण करणे सर्वाना सोयीस्कर झाले. देशातील मुंबई हे पहिले वखारयुक्त बंदर म्हणून नोंद झाली आपण उभारलेलं बंदर साऱ्या देशात परिपूर्ण आणि आदर्श होण्यासाठी भाऊंची करडी अनुभवी नजर बांधकामावर होतीच. त्यामुळे हे काम भाऊने यशस्वी पाने पार पडले.
भाऊंची तत्परता, कामाचे कौशल्य आणि प्रामाणिकपणाची जाण ठेवून ईस्ट इंडिया कंपनीने जलवाहतुकीद्वारे मालाची चढ-उतार करण्यासाठी पुढील पन्नास वर्षांचा मक्ता भाऊंना बहाल केला. बांधकामाच्या पूर्ततेपासून दीर्घकाळचा मक्ता प्राप्त होण्यापर्यंतच्या प्रवासामुळे हे परिक्षेत्र ‘भाऊचा धक्का’ म्हणून आजतागायत ओळखले जाते आणि हेच नाव समाजमनावर कायमचं कोरलं गेलं. याच सुमाराला गव्हर्नरपदी जेम्स कारनॅक यांची नेमणूक झाली होती. ‘मी बांधलेल्या या बंदर धक्क्य़ाला गव्हर्नर कारनॅक साहेबांचे नाव द्यावे’ ही भाऊंनी केलेली सूचना वजा विनंती म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शवतो. आजही हे "कारनॅक बंदर" म्हणूनही ओळखलं जात असले तरी शेकडो वर्षे ‘भाऊचा धक्का’ हे नामाभिमान समाजमनावर कायमचं आहे.
भाऊंची कामावरील निष्ठा व चिकाटी, कठोर परिश्रम, निसर्गदत्त कल्पकता आणि द्रष्टेपणानी एक माणूस प्रतिकूल परिस्थितीतही कायम स्वरूपी काय नवनिर्मिती करू शकतो याचं अजोड उदाहरण म्हणजे ‘भाऊचा धक्का’आहे.
भाऊंचा धक्का आजही पूर्वी प्रमाणेच आपल्याला गजबलेला दिसून येईल पूर्वी प्रमाणे मालाची वाहतूक किंवा प्रवाशाची वाहतूक तर होतेच पण त्यासोबत येथे कोळी बांधवांची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे रात्रभर मच्छिमारी करून पहाटे मच्छिमार मासे आणून येथे आपल्या मालाची विक्री करतात तसेच येथून मास्यांची निर्यात पूर्ण मुंबई व इतर ठिकाणी केली जाते.
भाऊ अजिक्यनी बांधलेलं बंदर आजही आपल्या आठवणीत राहावे व येणाऱ्या पुढच्या पिढीला याचा इतिहास व महत्त्व काय होते हे माहित असणे गरजेचे आहे. आजच्या आधुनिक काळात मुंबईत नवनवीन वस्तूची निर्मिती होत असते व त्या मुळे इतिहास कालीन वास्तूचे विसर पडत जाऊ नये यासाठी आपण जेव्हा कधीही नवीन पर्यटकांना प्रवाशांना मुंबई दर्शन करण्यासाठी मार्गदर्शन करीत असाल तर आवर्जून "भाऊंचा धक्का" पाहण्यासाठी सुचवा कारण मुंबईतील बरेच पर्यटन संस्थांनी मुंबई दर्शन या परिक्रमेत भाऊंचा धक्का वगळून टाकला आहे त्यामुळे नवनवीन पिढीला एका मराठी माणसानी मराठी माणसांसाठी बांधलेला धक्का याची माहिती करून देणे गरजेचे आहे
जय हिंद
धन्यवाद !!
लेखन: अर्जुन ना वालावलकर
धन्यवाद !!
लेखन: अर्जुन ना वालावलकर
0 comments:
Please do not enter any spam link in the Comment