गुरुपौर्णिमा
गुरु पौर्णिमा हा दिवस गुरुची मूर्ती पूजा आणि गुरूचा सन्मान करण्याचा एक पवित्र दिवस आहे. आजचा शुभ दिवस प्रत्येक शिष्यासाठी गुरूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप मोठा दिवस मानला जातो. शिष्याच्या जीवनात दरवर्षी येणार हा दिवस कोणत्या उत्सवापेक्षा नक्कीच कमी नाही.
पराशय मुनींचे पुत्र श्री व्यास जे एक महान ऋषी होते त्यांनी सर्व वेदना संकलित केले आणि कलियुगातील सर्व सामान्य माणसांना समजेल अश्या सोप्या भाषेत त्याचे लिखित वर्णन करून लोकांपर्यंत पोहचविले त्यांना कृष्णदयापायला व्यास म्हणून ओळखले जाते, त्याचा रंग हि श्री कृष्णा प्रमाणे सावळा होता त्यामुळे त्यांना कृष्ण सुद्धा म्हटले जाते, श्री महाऋषी व्यास यांचा जन्म सती आणि मती या नदीच्या काठाच्या एका बेटावर झाला म्हणून त्यांना द्वपायन सुद्धा म्हटले जाते वेदना विभाजित केल्या नंतर त्यांना वेद व्यास म्हणून ओळखले जाऊ लागले.
ज्ञानाची बरीचशी क्षेत्र आहेत परंतु ज्ञान अध्यात्मिक आणि भौतिक स्वरूपात दिले जाऊ शकते असं म्हटलं जात या भौतिक जगात मनुष्य अंधःकरात जन्म घेतो म्हणजेच अज्ञानात जन्म घेतो आणि गुरूच्या मार्दर्शनाने आपल्या जीवनातला अंधकार दूर करतो. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरुपौर्णिमेला तिथी नुसार महर्षी व्यासांचा जन्म दिवस असल्याने यादिवसाला एक अनन्य साधारण महत्व आहे म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. आणि त्याच्या सन्माना प्रति जन्मदिवसाच्या निम्मिताने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. श्री महर्षी व्यासाना भारताचे आध्य गुरु समजले जाते. श्री महर्षी व्यासानी महाभारत हा ग्रंथ लिहिला. महाभारतातून व्यासानी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्र याचे दर्शन घडले. यादिवशी चारही वेदांचे प्रथम व्याख्याता महर्षी वेद व्यास याचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आषाढ शुक्ल पक्षच्या पौर्णिमेला तिथी नुसार या दिवसाला गुरुपौर्णिमा म्हणतात किंवा व्यास पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते. गुरुपौर्णिमा पूर्ण भारतात मोठया उत्सवांनी साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हि शिष्याच्या जीवनात गुरुचे असलेले महत्व व शिष्याची गुरु वर असलेली निष्ठा आणि प्रेम याचे हे एक प्रतीक आहे. व तसेच नवीन पिढीला गुरु आणि शिष्याचे महत्व समजावले जाते. यादिवशी गुरुचे पूजन करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करणे फार महत्वाचे आहे.
गुरु पौर्णिमा याचा अर्थ, गुरु म्हणजे जो अंधारातुन प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे दिव्य प्रकाश ज्ञानाची अनुभूती. गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाने शिष्याचे जीवन प्रकाशमय होते.
संत कबीर यांचा एक दोहा आहे त्यात त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गुरुचे महत्तव समजावले आहे.
गुरु गोविंद दोहू खडे, काके लागू पाय l बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय ll
याचा अर्थ असा आहे. गुरु आणि भगवंत एकत्र उभे आहेत तर प्रथम नमस्कार कुणाला करायचा कबीर असे म्हणतात कि गुरूच्या श्री चरणावर नतमस्तक होणे उत्तम आहे. कारण गुरूच्या मार्गदर्शनानेच गोवींदचे दर्शन होण्याचा मार्ग आहे.
गुरूला ब्रह्मदेव सुद्धा म्हटले गेले आहे.
गुरुब्रह्म गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री तस्मै गुरुवे नमः
गुरु हे एक प्रत्यक्ष भगवंताचेच रूप आहे जे गुरु रूपाने आपले जीवन सार्थक करीत आहेत असे जे शिष्य मनोमनी गुरुवर निष्ठा ठेवून गुरूच्या मार्गदर्शनाचे आचरण करून ते आत्मसात करतात त्या शिष्याच्या जीवनात लवकरच प्रगती होते व यशस्वी होऊन त्याचे जीवन सफल होते.
आयुष्यात चांगला गुरु मिळणे हे फार मोठे भाग्याचे लक्षण समजले जाते. कारण ज्याच्या जीवनात चांगल्या गुरुचे मार्दर्शन लाभते त्याना जीवनात चांगल्या आणि वाईट परिस्तिथीत कशाप्रकारे सामोरे जावं याचे बळ मिळत असते. पुढील जीवनात आपल्याला आपले मित्र, कामातील सहकारी, शेजारी, व्यवहारी जीवनात भेटणारी माणसे आणि चांगली पुस्तके आपली गुरु असू शकतात. गुरुची महती फार थोर आहे म्हणून ‘आचार्य देवो भव’ असे म्हटले जाते.
गुरुपौर्णिमा भारतात मोठया उत्सवांनी साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हि शिष्याच्या जीवनात गुरुचे असलेले महत्व व शिष्याची गुरु वर असलेली निष्ठा, प्रेम आणि त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक महत्वाचा दिवस आहे. व तसेच नवीन पिढीला गुरु आणि शिष्याचे महत्व समजावले जाते. यादिवशी गुरुचे पूजन करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करणे फार महत्वाचे आहे. यादिवशी गुरुपूजन करून गुरूला नमस्कार करणे म्हणजे गुरुपूजन नक्कीच नाही. खऱ्या गुरूंना अश्या दिखाव्याची मुळीच गरज नसते तर त्यांनी दिलेलं ज्ञान आत्मसात करून ते ज्ञान आचरणात आणून ज्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झालेय व गुरुच्या प्रति नेहमी कृतज्ञता व्यक्त करणे आणि कृतज्ञतेच्यापोटी त्याची सेवा, आदर करणे म्हणजेच खरे गुरु पूजन आहे. तसेच निस्वार्थ भावनेने ब्राम्हणांची सेवा, दक्षिणा व गरिबांना किंवा गरजूना दान देणे मदत करणे, थोर व्यक्तीचा आदर सन्मान करणे हा एक गुरूच्या मार्दर्शनाचा एक भाग आहे. प्रत्येकाच्या जीवनात कोण ना कोण गुरु असतो आपले आई वडील, थोर भाहुबहीण, व घरातील इतर थोर आपले गुरूच आहेत त्यांचा आशीर्वाद प्राप्त करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचे आईवडील, भाऊबहीण, घरातील थोर व्यक्तीच प्रथम गुरु असतात कारण शिक्षणाची सुरुवात त्यांच्या कडूनच होते.
भारतामध्ये गुरुपौर्णिमेला सर्व विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ, गुरुकुल जेथे शिक्षणाचे मार्गदर्शन केले जाते त्यासर्व ठिकाणी गुरु पूजन केले जाते. सर्व विध्यार्थी आपल्या गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करतात व गुरूंनी दिलेल ज्ञान आणि मार्गदर्शन यामुळेच शिष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतात. गुरुचे महत्त्व सर्वांनाच माहित आहे कि गुरु आपल्या सर्व शिष्याचे दोष माफ करून शिष्याला योग्य मार्गदर्शन करून शिक्षा प्रधान करीत असतात. गुरुचे महत्त्व सर्व दृष्टीने सकारात्मक आहे. प्रामाणिकपणे जो व्यक्ती आपल्याला काही नवीन शिकवितो किंवा आपले मार्गदर्शन करतो तो आपला गुरु असतो आपल्याला त्याचा सन्मान आवश्य करायला हवा. तसे तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोज काहींना काही कुणाच्याना कुणाच्या माध्यमातून काहीतरी शिकतच असतो म्हणजेच ज्ञान प्राप्त करीत असतो पण आपण सर्वच वेळेला आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला गुरु मानतो का ? किंवा धन्यवाद तरी मानतो का ? यावर आपल्याला नक्कीच विचार करायला हवा.
आजच्या या गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा मानून गुरुपौर्णिमा बद्दलची माहिती आपणा पर्यंत पोहचवू शकलो या बद्दल मी माझ्या गुरुना कृतज्ञता व्यक्त करून गुरुचे आभार मानतो.
हि माहिती आपणसुद्धा आपल्या प्रियजनांपर्यंत पोहचवू शकलात तर आपल्या कडून सुद्धा हि एक गुरुसेवा घडेल.
श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद !!
लेखन : अर्जुन ना. वालावलकर
0 comments:
Please do not enter any spam link in the Comment