India's Dedicated Freight Corridor
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक देश आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामध्ये आपला भारत देश सुद्धा सक्रिय आहे. आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशातील काही मूलभूत सुविधा आणि आवश्यक गरजांची पूर्तता करणे फार आवश्यकता आहे. त्या मध्ये प्रामुख्याने दोन गोष्ठी महत्वाच्या आहेत एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर उद्पादन आणि दुसरे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय निर्यात म्हणजेच उद्पादन करण्या सोबत निर्यात करण्याची सुद्धा व्यवस्था करणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण आज या India's Dedicated Freight Corridor बद्दल जाणून घेणार आहेत.
आपल्या देशाचे विदेशमंत्री जेव्हा दुसऱ्या देशांना आपल्या देशात उद्योग करण्यासाठी प्रस्ताव ठेवतात तेव्हा आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही कारण आपल्या देशात इतर अडचणी सोबत मालाची वाहतूक करणे हि एक मोठी समस्या आहे. ती म्हणजे इतर प्रगत देशा मध्ये Dedicated Freight Corridor प्रमाणे असलेली सुविधा आपल्या कडे नाहीय.
आपल्या देशाचे विदेशमंत्री जेव्हा दुसऱ्या देशांना आपल्या देशात उद्योग करण्यासाठी प्रस्ताव ठेवतात तेव्हा आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही कारण आपल्या देशात इतर अडचणी सोबत मालाची वाहतूक करणे हि एक मोठी समस्या आहे. ती म्हणजे इतर प्रगत देशा मध्ये Dedicated Freight Corridor प्रमाणे असलेली सुविधा आपल्या कडे नाहीय.
आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या
वस्तूचे उत्पादन छोट्या
व मोठ्या प्रमाणावर
होते पण
उत्पादित केलेला माल
योग्य वेळेवर बाजारपेठेत
पोहचू शकत नाही
त्यामुळे बाजारपेठेत इतर देशाचा
उपलब्ध असलेला माल
जो आपल्या मालाच्या
किमती पेक्षा कमी
किमतीमध्ये सहज विकला
जातो व ते बाहेरील देशातील उद्योजक
मोठ्या प्रमाणावर नफा
मिळवून पैसा देशाबाहेर
घेऊन जात आहेत
आणि आपला देश
बाजारपेठेची मागणी पूर्ण
करण्यासाठी निर्यात करण्याऐवजी आयात
करीत आहे आणि हि
भविष्यात आपल्या देशाला
एक धोक्याची सूचना
आहे. आपल्या लक्षात
आले असेल कि आज भारतामध्ये
विदेशी मालाची मत्तेदारी
निर्माण होत आहे म्हणजेच जवळ जवळ आहेच असे म्हणायला हरकत नाही
तरी काही भारतीय
उद्योजक मोठ्या कौशल्याने
विदेशी उद्योजकांना मात
देण्याचा यशस्वी प्रयत्न
करीत आहेत. आज आपण
बाजारपेठेत पाहिलेतर जास्तीत जास्त
चिनी मालाची उपलबद्धता
दिसून येत आणि आपण सुद्धा
मोठ्या प्रमाणावर त्याचे
आधीन होत चाललो
आहोत.
आपण जगातील सर्वश्रेष्ठ
निर्यात करणाऱ्या २० देशाची यादी पहिली तर चीन हा जगातला सर्वात मोठा निर्यात करणारा
देश आहे व आपण चीनच्या तुलनेत भारताचा निर्यात क्रमांक शेवटून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर
आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चीनचे Infrastructure. चीन आणि भारताची अर्थव्यवस्था
तुलनात्मक दृष्टीने पहिली तर आपण कुठे आहोत आणि चीन कुठे आहे हे आपल्या लक्षात येईल
चीनची अर्थव्यवस्था 14 ते 15 Trillion ची आहे व आपली फक्त 3 Trillion आहे म्हणजेच
भारताच्या 5 पट जास्त आहे. भारताला आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर Infrastructure वर जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे देशातील मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर रेल्वेने
होत असते पण कुचंबणा अशी आहे कि ज्या मार्गावरून प्रवासीगाड्या जातात त्याच मार्गावरून
मालाची वाहतूक होत आहे त्यामुळे याचा त्रास प्रवाशी व उत्पादकांना होत आहे आपण रेल्वेने
प्रवास करीत असाल तर तुम्हाला बरेच वेळेला हा अनुभव आला असेल.
भारतीय रेल्वे रोज 2.3 कोटी प्रवाश्याना लाभ देते आणि 30 लाख टन मालाची वाहतूक करते या साठी देशभरात 8500 रेल्वे स्थानके आहेत पण नेहमी वाहतुकीची समस्या होत असते आणि जितक्या गाड्या त्या रुळावरून
जायला पाहिजेत त्याच्या 2.5 पट जास्त गाड्या जात आहेत. यावरून तुम्ही विचार करू शकता
कि रोज रेल्वे मार्गावर किती ताण पडत असेल. जेव्हा उद्योजकांचा माल योग्य वेळेवर बाजारपेठेत
पोहचू शकत नाही. तयार असलेला माल बरेच दिवस गोडावून मध्ये पडून राहिल्यास त्याची Logistics costs वाढत जाते आपल्या देशाची Logistics costs जवळ जवळ 15% ते 18% पर्यंत आहे आणि चीन
ची 8% त्यामुळे माल बाजारात पोहोचेपर्यंत त्याची किंमत वाढत जाते. चिनी माल कोणत्याही
बाजारपेठेत गेला तरी आपल्या मालाची किंमत इतरांच्या मालाच्या किमती पेक्षा कमी असल्याने
चिनी माल तेथील बाजार पेठ Destroy करते.
भारत आणि चीनचा ट्रेड
मार्केटची सरासरी पाहिलीत तर आपल्या लक्ष्यात येईल कि चीन जवळजवळ 70 ते 80 Billion Dollar च्या दरम्यान असतो
आणि भारताचा 58 ते 60 Bllion Dollar आहे म्हणजे आपण चीन ला फक्त 18 ते 20 Billion Dollar मालाची निर्यात करतो व जास्त आयात करीत आहोत एकीकडे कुठे चीनचे Infrastructure, चांगले
मजबूत आठपदरी, दहापदरी रस्ते, मोठे उडानफूल,
वेळेवर चालणारी वाहतूक, स्वस्त विधुत पुरवठा, मोट्या प्रमाणावर कामगार, निर्यातीसाठी
मोठमोठे पोर्टबन्दर आणि तेथील स्थानिक सरकारचा सकारात्मक सहकार्य या सर्व गोष्टीचा
उपयोग करून चीनने आपली प्रगती झपाट्याने केली आहे.
Dedicated Freight Corridor
या सर्व बाबीचा
विचार करून भारत
सरकारने काही मोठे
निर्णय घेऊन सकारात्मक
पावले उचलली आहेत.
जसेकी Sagarmala Project, Bharatmala Project, Dedicated Freight Corridor इत्यादी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
भारत सरकारने आपले Infrastructure मजबूत करण्या साठी 6 नवीन Corridor बनविण्याची योजना आखून
त्यातील दोन Corridor चे
काम जलद गतीने
सुरु आहे व ते 2020
ते 2021 यावर्षी
पूर्णहि होतील
आणि ते उपयोगात
आणले जातील. हि
योजना पूर्ण झाल्यावर
भारताच्या अर्थवेवस्थेला एक Game Changer प्रमाणे
फायदा होईल.
पहिला Corridor आहे
Eastern Dedicated Freight Corridor (EDFC)
इस्टर्न फ्रेड कॅरीडोर ह्याची लांबी 1856 km आहे
व त्या मार्गावर 104 Bridges, 368 Road Over Bridges, 189 Road Under Bridges, 21 Flyovers and While renovating 9 existing Road Over Bridges and 10 Road Under Bridges आहेत आणि हा मार्ग देशातील प्रमुख शहरातून जात आहे. हा रेल्वेमार्ग पंजाबहुन हरियाणा उत्तरप्रदेश बिहार झारखंड
पश्चिम बंगाल स्थानका पर्यंत तयार करण्यात येणार आहे. या मार्गावर ठीक ठिकाणी रेल्वे
स्थानके बनविण्यात आली आहेत जेथून फक्त मालाची वाहतूक केली जाईल. Eastern
Dedicated Freight Corridor चे काम दोन टप्प्यात केले जाणार
आहे पहिला टप्पा 1409 km चा होणार आहे जो पश्चिम बंगालच्या दानखुनी पासून ते उत्तरप्रदेशच्या
खुर्जा पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा 447 km चा असून जो लुधियानाच्या धांधाडी, कलान
पासून खुर्जा पर्यंत जाईल. Eastern Dedicated Freight Corridor हा तीन फेज मध्ये बनविला जाणार आहे
आणि याचा फेज वन डिसेम्बर 2020 पर्यंत पूर्ण
होईल बाकीच्या फेज टू आणि त्री चे काम 2022 पर्यंत पूर्ण केले जाईल.
आणि दुसरा Corridor आहे
Western Dedicated Freight Corridor (WDFC)
तसेच दुसरा Western Dedicated
Freight Corridor हा एक दिल्ली मुंबई Industrial परीयोजनेचा एक भाग आहे. ह्याची लांबी 1499 km आहे. या मार्गावर 4 km Long Tunnel, 262 Bridges, 33 Flyovers, 505 Road Over bridges, 200 Road Under Bridges, and Reconstruction of 24 existing Road over bridges Lengthening of 10 Road Under Bridges आहेत आणि हा Electrified Double Track Segment मध्ये होणार आहे हा रेल्वेमार्ग पंजाबच्या लुधियानाहुन पश्चिम बंगालच्या दानखुनी पर्यंत जाणार आहे हा sate Dedicated Freight Corridor अमृतसर कोलकोट्टा Industrial Corridor Integrated भाग आहे. ह्या रेल्वेमार्गाचे काम दोन विभागामध्ये केले जाणार आहे पहिला भागात हरयाणाच्या
रेवाडीपासून ते गुजराथच्या वडोदरा पर्यंत केले जाईल ज्याची लांबी 915 km असेल आणि बाकीच्या मार्गाचे काम दुसऱ्या टप्प्यात केले
जाईल. यामार्गाचे ३०६ km लांबीचे
काम पूर्ण झाले असून पुढील मार्गावर जलद गतीने काम चालू आहे. हा प्रोजेक्ट 2021 च्या
डिसेम्बर पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या परीयोजनेला Dedicated Freight Corridor corporation of India च्या अंतर्गत तयार केला जात आहे जो कि Ministries of Railways चा एक भाग आहे.
आज ज्या प्रकारे मालगाडीतून
मालाची वाहतूक होते त्याची क्षमता 500 टनची आहे पण या नवीन मालगाडीची क्षमता जास्त
आहे व हि मालगाडी Double Decker Container असणार आहेत म्हणजे माल वाहून नेण्याची क्षमता दुप्पटीपेक्षा
जास्त जवळ जवळ 1300 टन आहे साधारहण मालगाडीची लांबी सरासरी 700 मीटर असते पण हि नवीन
मालगाडी ची लांबी 1500 मीटर पर्यंत असेल याचे container सुद्धा जुन्या पेक्षा आकाराने
मोठे असणार आहेत ज्यामुळे जास्त मालाची वाहतूक करता येईल साधारणता आता होत असलेली मालवाहतूक
करण्याची गती तासाला 25 km आहे. पण या नवीन मार्गावर तासाला 100 km च्या गतीने मालवाहतूक करण्याची क्षमता
आहे तरी सरासरी तासाला 70 km च्या गतीने मालवाहतूक केली जाणार आहे. म्हणजे जवळ जवळ
तीन पट्टीच्या गतीने मालवाहतूक होणार आहे. Eastern Dedicated Freight
Corridor आणि Western
Dedicated Freight Corridor या दोन्ही
योजना पूर्ण करण्यासाठी 11.38 Billion Dollar चा खर्च आहे म्हणजेच भारतीय चालना प्रमाणे 871
अरब रुपये खर्च येणार आहे.
अशा प्रकारे अजून 4 Freight Corridor बनविण्याची योजना पुढील काळात होणार आहेत.
East-West Dedicated
Freight Corridor हा मुंबईहून कोलकोत्ता पर्यंत जाईल त्याची जास्तीत जास्त लांबी 2338 km पर्यंत असेल याचा मार्ग मुंबईहून भुसावळ,
नागपूर, दुर्ग, खडकपूर ते कोलकोट्टा पर्यंत जाईल हा प्रोजेक्ट 2018 मध्ये मंजूर झाला
आहे हा फारच महत्त्वच्या प्रायोजनेचा भाग आहे कारण हा रेल्वे मार्ग बनल्या मुळे दोन्ही
कडील पोर्टबंदरशहरे एकमेकांना जोडली जातील
त्यामुळे मध्य भारतातून आयात आणि निर्यात करणे फार सोपे जाणार आहे पण सरकारने हि योजना कधी पर्यंत पूर्ण होणार याची तारीख जाहीर केलेली नाही आणि हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी
14 Billion Dollar चा खर्च येणार आहे.
North South Dedicated
Freight Corridor हा दिल्ली ते चेन्नई ला जोडणारा असेल त्याची जास्तीत जास्ती
लांबी 2343 km असेल जो दिल्लीहून इटारसी नागपूर, विजयवाडा वरून चेन्नई पर्यंत जाईल.
या प्रायोजनेला Ministries of Railway कडून मंजुरी मिळालेली आहे पण या Project वर
अजून काम सुरु होण्याचे बाकी आहे. हा मार्ग बनल्यामुळे मध्य भारत आणि उत्तर भारत मधील
मालाची वाहतूक जलद गतीने करण्यास मदत होईल. या Project चा पूर्ण खर्च 13 Billion Dollar आहे. आणि या Project पूर्ण करण्याची तारीख अजून जाहीर केलेली नाही.
जय हिंद
धन्यवाद !!
लेखन: अर्जुन ना वालावलकर
East Cost Dedicated Freight Corridor या रेल्वे मार्गाची जास्तीत जास्ती लांबी 100 km पर्यंत
असेल हा मार्ग पश्चिम बंगालच्या खड्डकपूर मार्गे भुवनेश्वर, विशाखापट्टणम ते विजयवाडा पर्यंत बनविला जाणार आहे. यमार्ग मुळे
पोर्टबंदर ते पोर्टबंदर चा संपर्क कायम राहील ज्यामुळे एकाच बंदरावर भार येणार नाही.
हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी 6 Billion Dollar आहे. आणि या Project पूर्ण करण्याची
तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पण या प्रायोजनेला Ministries of Railway कडून मंजुरी
मिळालेली आहे. South-West Dedicated Freight Corridor या रेल्वे
मार्गाची जास्तीत जास्ती लांबी 899 km पर्यंत असेल हा मार्ग गोव्याच्या मडगावहुन
अंकोला, हुबळी वरून चेन्नईच्या रेणीगुंठा स्थानका पर्यंत बनविला जाईल. Bangalore is an integral part of the Chennai Industrial Corridor सदर या योजनेचं एक भाग बंगलोर आणि
एक भाग मेंगलोर आहे कारण मेंगलोर एक मोठे पोर्टबंदर असून Petrochemical complex आहे आणि बेंगलोर हा IT HUB असण्या सोबत आता Manufacturing HUB मध्ये रूपांतरित होत चालला आहे त्या मुळे गोव्यातील मडगाव, मेंगलोर आणि चेन्नई पोर्टबंदरे जोडली जातील त्याच प्रमाणे बंगलोर कडे
आयात आणि निर्यात करण्यासाठी तीन पोर्टबंदरांचा
उपयोग होऊ शकतॊ. सध्या तरी हा Project proposed आहे पण हा Project पूर्ण करण्यासाठी 5 Billion Dollar चा खर्च आहे. आणि सरकारने या
Project कधी पूर्ण केला जाईल याची तारीख जाहीर
केलेली नाही.
अश्या प्रकारे भारतीय रेल्वेमध्ये
बनणारे 6 Freight Corridor हे सर्व Freight Corridor पूर्ण झाल्या नंतर आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात
नक्कीच मोठी क्रांती घडून येईल आणि याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा फायदा
होईल.
धन्यवाद !!
लेखन: अर्जुन ना वालावलकर
0 comments:
Please do not enter any spam link in the Comment