घेतली का ?.... तो घेतो का ?

घेतली का ?.... तो घेतो का ? 

घेतली का?...
या शब्दाचा अर्थ आता वेगळाच घेतला जात आहे. 
घेतली का? असे म्हटलं की, त्याला संशयाने पाहिले जात आहे. 
घेतली का ? हे वाक्याच इतक बदनाम झाले आहे, 
की आपण काय घेतो हे सांगण्या आधीच त्याला गृहीत धरले जात आहे



माणूस किती ही सभ्य असला तरी, 
घेतली की... त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे, 
त्याला चरित्रहीन नजरेने पण पाहिले जात आहे. 

तो घेतो काय...? 
या वाक्याने लोक त्या माणसांनची चर्चा तर करतात, 
मग तेच लोक, भाऊ आजचा बेत काय आहे...!! 
अशी पण विचारणा करतात.

घेणे ही त्याची वैयक्तिक इच्छा किंवा समस्या असली तरी, 
घेतली की... त्याला चोकस दृष्टीने पाहिले जात आहे. 
असे घेणारे बरेच आहेत. 
अहो, मी सांगतो असे घेणारे बरेच आहेत
पण काही चोरून घेणाऱ्यांन कडून त्यांना जास्त बदनाम केले जात आहे.

कुणाला कस विचारावं...!! हा एक मोठा प्रश्नच आहे ?
तू घेतोस काय ? 
थोडी घेऊया ? 
तू घेतोस मला माहित आहे...!!
मी तुला घेताना पाहिलंय...!! 
तू तर आदीच घेऊन आलास काय ? 
"थोडीशी घ्यायला काय" 
असे आदरातिथ्याने विचारणेही म्हणजे  
आता संशयास्पद नजरेने पाहिले जात आहे.

घेणारा आणि घेतोस का ? असं विचारणारा दोघे समविचाराचे असले तर ठीक 
म्हणजेच,घेणारे असले तर ठीक आहे.
नाहीतर आपण किती सभ्य आहोत हे पटवून देण्याची वेगळीच स्पर्धा सुरू होते 
आणि शिल्लक घेण्याच्या विषयावरून न घेताच वाद होण्याची शक्यता असते.

 तो घेतो काय...? किंवा घेतली का ? या वाक्याला घेणारे तर...!! 
अजिबात भीक घालत नाहीत, 
पण यांच्या बद्दल चर्चा करणारे मात्र ..!! 
आपण पण कधी कधी थोडीशी घेतो, 
हा विषय कधी समजून घेत नाहीत. 

घेतली का ? 
अस विचारणाऱ्यांना घेणाऱ्यांची खरच काळजी असते ?
कि फक्त चर्चा करायची असते ?
या बद्दल नक्की काही कळतच नाही 
पण असले विषय घेतल्या शिवाय त्याचा वेळ जात नाही
 
अरे.....!! घेणारा घेतो, आपल्या पैशाची घेतो, 
यात तुमच्या पोटात काय दुखते ?
अरे.....!! घेणारा घेतो, आपल्या पैशाची घेतो, 
यात तुमच्या पोटात काय दुखते ?
कुणाचं दुखू नये म्हणून कोण घेतो, तर कुणाचं घेतली नाय म्हणून दुखते 
यात तुमच्या पोटात काय दुखते ?

प्रश्न जरी वयक्तिक असला तरी त्याचे उत्तर सामाजिक असावे लागते
अशी आपल्या समाजाची सार्वजनिक अपेक्षा असते. 
नाहीतर लोकं काय म्हणतील...!! हि भीती नायतर शंका मनात असते
मग अश्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चढाओढ सुरु असते.  
यश अपयश प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून असते. 
कोण उत्साहाने साजरा करतो तर कोण नाईलाजाने घेत असतो. 

घेणारा आपल्या आवडीने आपल्याला जसे हवे तसे घेतो आणि तो घेतच राहणार...!! 
मी तर म्हणेन त्यानी ते तसेच घ्यावे ....!! 
लोक त्यांना कसे घेतात ते त्यांच्या घेण्यावर सोडून द्यावे ....!! 

आता तुम्हाला काय घ्यायचेय तुम्ही ठरवून घ्या ....!!
तुम्ही नाही घेतलीत तरी लोकं तुम्हाला घेतोस का ? विचारणारच
तुम्ही नाही म्हणून सांगितले तरी दुसऱ्याला विचारणार तो घेतो का..... ?

तुम्ही कितीही सभ्य असलात तरी ते तुम्हाला थोडी घेणार का ? विचारणारच ....!!
तुम्ही घेत नाही म्हणून सांगितली तरी सुद्धा ते तुम्हाला घेतच राहणार...!!
अहो, लोकांच काय ? ते तर संधी पाहताच राहणार...!! 
अहो, त्या लोकांच ते कामच हाय, ते तर तुम्हाला घेतच राहणार...!!  
आणि लोकांच, लोकांच काय म्हणताय ? ते तर बोलतच राहणार...!! काय ?
घेतली का ? तो घेतो का ?

घेणारे काय काय घेतात आणि त्याचे प्रकार किती ? 
हे तुम्ही पण थोडी माहीती करून घ्या, 
नाहीतर उगाचच स्वतःला बुचकळ्यात पडून तुम्हीपण घ्याल.

कोण चहा घेतो 
कोण कॉफी घेतो
कोण सरबत घेतो
कोण ज्यूस घेतो
कोण काढा घेतो 
कोण कोल्ड्रिंक घेतो
कोण ताडी, माडी घेतो
कोण बिअर घेतो
कोण वोडका, व्हिस्की घेतो
कोण गुळाची घेतो


तुम्ही यापैकी कोणती घेता आम्हाला पण कळवा, 
नाहीतर लोकं आम्हाला विचारतीलच ...!!  तो घेतो का ? 
मग आम्ही काय सांगायचं...!! घेतली का ?



सर्व मित्रांना समर्पित 

लेखक : अर्जुन वालावलकर


Previous Post
Next Post
Related Posts

2 comments:

Please do not enter any spam link in the Comment