खोडरबरची आत्मकथा...!!

आयुष्यभर दुसऱ्यांच्या चुका खोडण्यातच गेली की जगण्याची जिद्दच संपूण गेली 

गरजे प्रमाणे वापरले सगळ्यांनी पण कुणी मला दाद नाही दिली...!! 

कधी तक्रार नाही केली, जन्मल्या पासून रब रब राबतच राहिलो 

आता स्वतः कडे पण पाहण्यासाठी शिल्लकच नाही उरलो...!!

Autobiography-of-eraser


मोठया आवडीने, हौसेने मला घेऊन येतात 

मिरवताना मात्र पेपर, पेन्सिल घेऊन नाचतात...!! 

आपल्या चुका खोडून टाकण्यासाठी हळूच मला खिशातून काढतात 

जणू सर्वकाही आपणच ठीकठाक केले आहे असे सर्वाना दाखवतात


आम्ही तर सगळेच फक्त निम्मित मात्र आहोत 

त्या कागदावरची ठरलेली पात्र आहोत...!! 

कुणाचे काम झिझने तर कुणाचे उजळून टाकणे आहे 

प्रत्येकाची आपली एक खासियत आहे...!! 

म्हणूनच आम्ही सगळे एकमेकांनपेक्षा वेगळे आहेत 


एक पेन चूक करू शकते पण पेन्सिल कधी चुकणार नाही...!! 

कारण तिच्या मागे मी खंभिर उभा असतो, हे काय सांगायची गरज आहे 

मी नेहमी तिच्या सोबतच असतो, नाहीतर मागुन पाहत असतो 

तिच्या सर्व चुका सुधारतो, मिटवून टाकतो सर्व खाणाखुणा 

पण गर्व कधी केला नाही ना कधी केला बहाना...!! 

तिला माहीत आहे, मी तिचा सच्चा दोस्त आहे, 

माला तिच्या पेक्षा तिचा माज्यावर विश्वास आहे 


मी स्वतःला संपवून पुन्हा संधी निर्माण करून देतो 

ती एकदाच ठळक उमटून आपल्या जागेवर ठाम राहते

पण आपले अस्तित्व कायम राहील की फासले जाईल 

याची तिला सतत चिंता लागून राहिलेली असते 

आणि विना कारण तिला माझी भीती वाटत असते


खर तर.... जगात मित्र संकटात साथ देतात 

मित्राच्या चुका खोडून मार्ग नवे काढतात...!! 

न वादविवाद... करता त्याची प्रत्येक चूक मी सुधारतो

पण तेच मित्र नंतर माझी आठवण कुठे काढतात...!! 


तुम्ही असाल पडद्यावरचे आवडते हिरो 

पण मी ही तुमच्या पडद्यामागचा कलाकार आहे...!!

तुम्ही मोठे कलाकार घडण्यासाठी मी नेहमी झिझून तुम्हाला साथ दिली आहे

तुमच्यासाठी झिझने हे माझं कर्तव्यच होत 

पण कधी एकदा तरी मला पाहून थँक्यू बोललं पाहिजे होत...!!


आता पूर्ण आयुष्य असेच ओढाताण करून संपून गेले 

खोड्या करून खोडण्याची मज्या काय असते ते जगण्याचे राहूनच गेले 

एकत्र राहून पण कधी संगतीने मिसळलो नाही...!! 

मी तिला आणि ती मला समजू ही कधी उमजलो नाही 

सांगायचे शेवटी ते राहावुनच गेले आता सांगून काही उपयोग नाही 

तिच्या सर्व चुका खोडण्यातचं मग्न होतो कि सांगितलेच नाही...!! 


देखावा सजवण्यासाठी मी राब राब राबलो 

कर्तव्याला जागताना मी पेपराशी खूप भांडलो...!! 

पण आता कोणताच वाद नाही

ना कुणाकडून कोणती अपेक्षा काही...!!

इच्छा फक्त एवढीच जाणून घ्यायची आहे

एवढे सर्व घडून या जीवनाचे सार्थक झाले की नाही 

हे काय माहीत नाही...!!


आयुष्यात पुष्कळ मित्र बनवा 

पण जीवनात एक तरी विश्वासू मित्र असावा...!! 

जो तुमच्या चुका सुधारायला तुम्हाला साथ देणारा 

ज्याचा तुमच्या एका हाकेवर विश्वास असावा 

असा एक मित्र असावा...!!


धन्यवाद...!! 

लेखक : अर्जुन नारायण वालावलकर 

Previous Post
Next Post
Related Posts

0 comments:

Please do not enter any spam link in the Comment