अशी ही सुंदर सकाळ असेल...!!
अशी ही एक सुंदर सकाळ असेल...!!
जेव्हा तोंडावरच्या मास्क ऐवजी हास्य खुललेलं असेल
आणि मनसोक्त गप्पांमध्ये मन रमलेलं असेल
हसण्याचा खळखळाट आणि त्यावर टाळ्याची दाद असेल
ती एक सुंदर सुखदायक सकाळ असेल...!!
अशी ही सुंदर सकाळ असेल...!!
जेव्हा सेनेटाईजर ऐवजी सुगंधी अत्तर शिंपडले जाईल
आणि मनमोहक गंधानी परिसर दरवळला जाईल
मग तिथे प्रत्येकाचा एक सुगंधी साज असेल
ती एक रम्य सुहासमय सकाळ असेल...!!
अशी ही रम्य सकाळ असेल...!!
जेव्हा मेडिकल स्टोअर समोर गर्दी नसेल
औषध घेण्यासाठी ग्राहकांची रांग नसेल
तो दिवस खऱ्या अर्थाने तंदुरुस्त जनतेची ओळख असेल
उगवलेल्या त्या दिवसाची आजची ठळक बातमी हीच असेल
ती एक आरोग्यदायी सकाळ असेल...!!
अशी एक रम्य सकाळ असेल...!!
जेव्हा रस्त्यावरती शुकशुकाटाच्या ऐवजी
सर्वत्र गर्दीचे थवे दिसू लागतील
माणसं लॉक डाउनचा आळस झटकून
झपाट्याने कामाला लागतील
ती एक कार्यक्षमतेची सकाळ असेल...!!
अशी ही सुंदर सकाळ असेल...!!
जेव्हा पेपर वाचतांना हातात कडवट कढ्या ऐवजी
कडक चहाचा कप असेल
आणि चहाच्या प्रत्येक घोट सोबत
सकाळची ताजी बातमीची चर्चा असेल
ती एक खबर बात घेणारी सकाळ असेल...!!
अशी ही एक रम्य सकाळ असेल...!!
जेव्हा हॉस्पिटल मधील गर्दी ऐवजी
लोक हॉटेलमध्ये मिसळ, इडली, पापडा, जिलेबीसाठी गर्दी करतील
आणि फास्टफूडचे शौकीन बर्गर, पिझा, फ्रांकीसाठी गर्दी करतील
ती एक न्याहारीची सकाळ असेल...!!
अशी ही मस्त सुंदर सकाळ असेल...!!
जेव्हा जिवाभावाचे मित्र, गतकाळातील घडून गेलेल्या चौकश्या करण्या ऐवजी
मस्त चहाच्या टपरीवर छान गप्पागोष्टी करण्यात मग्न असतील
आणि चहा पिऊन झाल्यावर पैसे कोणी द्यायचे म्हणुन भांडत असतील
ती एक मौज मस्तीची सकाळ असेल...!!
अशीही सुंदर सकाळ असेल...!!
जेव्हा गल्लीत रुग्णवाहिका नाही तर शाळेची गाडी येईल.
आणि आपल्या मुलांना अप टू डेट करून मम्मी बस थांब्यावर घेऊन येईल
ती एक शालेय सकाळ असेल...!!
अशी ही सुंदर सकाळ असेल...!!
शाळेच्या मुलांच्या हातात मोबाईल ऐवजी टिफिन, वॉटरबॅग असेल
आणि ऑनलाईन अभ्यासाची डोकेदुखी संपून फेस टू फेस स्टडीची गोडी असेल
ती एक हजर जाबाबी सकाळ असेल...!!
अशी ही सुंदर सकाळ असेल...!!
जेव्हा मित्रपरिवरतील मंडळी सहा फूट अंतर टाळून गळाभेट करतील
आणि भूतकाळातील राग रुसवे विसरून आनंदाने स्नेहभोजन करतील
ती एक स्वागतमय सकाळ असेल...!!
अशी ही रम्य सकाळ असेल...!!
जेव्हा माणसं मेडिकलच्या तारखा व चेकअपचे रिपोर्ट विसरून
आपल्या पारंपारीक सणांच्या तयारीला लागतील
आणि उत्सवात उत्साहाने बेभान होऊन नाचतील
ती एक जल्लोषाची सकाळ असेल...!!
अशी ही सुंदर सकाळ असेल...!!
जेव्हा रुग्णाच्या खांद्यावर वर ऑक्सिजन सिलिंडर नाही तर ऑफिसची बॅग दिसेल
आणि कामावर वेळेवर पोहचण्यासाठी लगबघिने धावत पळताना दिसेल
ती एक लक्षवेधी सकाळ असेल...!!
अशी ही रम्य सकाळ असेल...!!
जेव्हा कंपनीत उशिराच पंचिंग होईल
तेव्हा लगेच तीन लेट मार्कचा विचार डोक्यात येईल
मग पुन्हा वेळेची समीकरण घडू लागतील
आदींची अचूक वेळ साधण्यासाठी माणसं पूर्वीसारखी वागू लागतील
ती एक कामधंद्याच्या सकाळ असेल...!!
ती सकाळ दूर नाही तो दिवस ही दूर नाही
अशी ही रम्य सकाळ अवश्य असेल
तो वर्तमान हि नक्कीच आपलाच असेल
होय.. नक्कीच असेल, ती एक यशस्वी सकाळ असेल...!!
अशी ही रम्य सकाळ असेल...!!
धन्यवाद !!
लेखक : अर्जुन नारायण वालावलकर
0 comments:
Please do not enter any spam link in the Comment