The Indian Army
आपण पहिल्या भागात भरितीय सैन्यदलातील काही रेजिमेंट आणि बटालियन बद्दलची माहिती पहिली. भारतीय सेन्यदल इतके मोठे आहे की एका लेखांमध्ये पूर्ण माहिती लिहिली तर एक ग्रंथ होईल म्हणून मी काही भागात विभागून हि माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहे. आपण अजून काही फार पूर्वीच्या व आतापर्यंतच्या काळातील रेजिमेंट आणि बटालियन बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय सेन्यदलाने अशी कोणती पुराव्यानिशी माहिती उपलब्ध केलेली नाही कि ज्यामुळे कोणती रेजिमेंट सर्वात पूर्वीची व प्रथम आहे. तरी प्रत्येक रेजिमेंट व बटालियनच्या स्थापनेची माहिती आज उपलब्ध आहे. आपण त्या वादात न जाता इतर माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे.
National Security Guard
National Security Guard हि भारतात सर्वात जास्त प्रसिद्ध commando Force पैकी एक आहे. 1984 च्या Operation Blue Star च्या नंतर याची स्थापना केली गेली. याचे काम आतंकवादी कारवाही रोखाने आणि देशातील व्यवस्तेला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे व VIP ना व देशातील उच्च पधाधिकाऱ्याची सुरक्षा करणे आहे. National Security Guard ना सोप्या शब्दात सांगायचे तर NSG Commando व Black Cat Commando या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे Commando नेहमी काळ्या रंगाचे कपडे काळ्या रंगाचा मुखवटा, काळ्या रंगाचे साहित्य आणि हत्यारे सुद्धा काळ्या रंगाचीच वापरतात. म्हणून याना Black Cat Commando म्हटले जाते. याच एकच ब्रीद वाक्य आहे “One for All, All for One” हे Commando आपली कारवाही करताना मनात कोणताही संकोच ठेवत नाही ते फक्त आपल्या ध्येयावर लक्षा ठेवून काम करतात. 26/11 च्या आतंकवादी कार्रवाहीत आतंकवादींना मारण्यात यांचा मोठे योगदान होते. NSG Commando ची प्रशंसा फक्त भारतच नाही तर पूर्ण जगभरात केली जाते व याची तुलना अमेरिका, रशिया, इस्राईल, फ्रांस च्या सैनिकानं बरोबरीने केली जाते. पूर्ण एशिया मध्ये NSG Commando च्या मुकाबल्यात कोणती दुसरी फोर्स नाही. NSG Commando च्या स्थापने पासून आता पर्यंत 20 ते 25 यशस्वी Operation पूर्ण केले आहेत.
Garud Force
Garud Force हि एक भारतीय वायू सेनाचीच Special Force आहे. 2001 मध्ये जेव्हा जम्मू काश्मीर मध्ये आतंकीवाद्यांनी दोन एअर बेस वर हमला केला तेव्हा त्यांना मारण्यासाठी Garud Force ला पाचारण केले होते. याची स्थापना 2004 मध्ये Air Force Day च्या दिवशी जगासमोर घोषित केली गेली. Garud Force हवाई युद्धात पारंगत आहे आपल्या कौशल्याने ते शत्रूच्या हद्दीत घुसून आपल्या साथीदारांना सुरक्षित बाहेर काढतात Garud Force चे प्रशीकक्षण काही यशस्वी Force माध्यमातून केले जाते. Garud Force अति भयानक व जगातील अत्याधुनिक हत्यारांनी सुसज्य असतात याचे ब्रीद वाक्य आहे "प्रहार से सुरक्षा" हे कोणत्याही प्रकारच्या प्रहारा पासून देशाची सुरक्षा करण्याची तयारी ठेवतात.
Marcos Force
Marcos Force भारतीय नौदलाचे विशेष दल युनिट आहे. हि एक सर्वोत्तम फोर्स आहे. याची स्थापना 1987 मध्ये झाली यांना Marin Commando म्हणून सुद्धा ओळखले जाते. हि Force सर्वप्रकारच्या युद्धासाठी पारंगत आहे. मग ते समोरासमोर शत्रूबरोबरचे युद्ध असो, बंदी बनविलेल्या नागरिकांना सोडवायचे असो किंवा थेट हमला करायचा असेल पाण्यातून केल्याजाणार्या ओप्रेशन मध्ये तर यांची महारार्थ आहे. संपूर्ण लढाऊ सामना सहित ते समुद्रात Para-Drop करण्यास सक्षम आहेत. या फोर्सला दाढीवाली फोर्स म्हणून ओळखले जाते. कारण याना कोणी ओळखू नये म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये दाढी वाढवून येतात. Marcos Commando शत्रुपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी नेहमी अत्याधुनिक शस्त्राने सुसज्य असतात. कारगिल युद्धात आणि मुंबई च्या आतंकवादी हमल्यात Marcos Commando साथ दिली होती. Marcos Commando बनण्याची ट्रेनींग 2 वर्षाची असते याची खास बाब हि आहे कि यात 20 ते 24 वर्ष पर्यंतच्या तरुणांचाच समावेश केला जातो त्यांना ट्रेनिगच्या दरम्यान अमेरिकन, ब्रिटन सारख्या सैन्याबरोबर शिक्षण घेण्याची संधी मिळते ज्यामुळे ते कोणत्याही प्रकारचे युद्धाला प्रतित्युर देऊ शकतात.
Marcos Force भारतीय नौदलाचे विशेष दल युनिट आहे. हि एक सर्वोत्तम फोर्स आहे. याची स्थापना 1987 मध्ये झाली यांना Marin Commando म्हणून सुद्धा ओळखले जाते. हि Force सर्वप्रकारच्या युद्धासाठी पारंगत आहे. मग ते समोरासमोर शत्रूबरोबरचे युद्ध असो, बंदी बनविलेल्या नागरिकांना सोडवायचे असो किंवा थेट हमला करायचा असेल पाण्यातून केल्याजाणार्या ओप्रेशन मध्ये तर यांची महारार्थ आहे. संपूर्ण लढाऊ सामना सहित ते समुद्रात Para-Drop करण्यास सक्षम आहेत. या फोर्सला दाढीवाली फोर्स म्हणून ओळखले जाते. कारण याना कोणी ओळखू नये म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये दाढी वाढवून येतात. Marcos Commando शत्रुपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी नेहमी अत्याधुनिक शस्त्राने सुसज्य असतात. कारगिल युद्धात आणि मुंबई च्या आतंकवादी हमल्यात Marcos Commando साथ दिली होती. Marcos Commando बनण्याची ट्रेनींग 2 वर्षाची असते याची खास बाब हि आहे कि यात 20 ते 24 वर्ष पर्यंतच्या तरुणांचाच समावेश केला जातो त्यांना ट्रेनिगच्या दरम्यान अमेरिकन, ब्रिटन सारख्या सैन्याबरोबर शिक्षण घेण्याची संधी मिळते ज्यामुळे ते कोणत्याही प्रकारचे युद्धाला प्रतित्युर देऊ शकतात.
Cobra Force
Cobra Force हि एक CRPF ची एक Special Force आहे. जी CRPF च्या Commando Battalion for Resolute Action च्या नावाने सुद्धा ओळखले जाते. Cobra Force जसे नाव तसे काम देखील आहे. Cobra Force ची स्थापना 2008 मध्ये नक्षल वाद्यांचा खात्मा करण्यासाठी केली गेली होती। यांचे काम जंगलातील युद्ध लढने यांच्या युध्द करण्याच्या पद्धतीला Gorilla Tactical म्हटले जाते . नक्षलवादी जंगलात लपून बसलेले असतात त्यांना शोधून काढून ठार मारण्याचे काम हे करत असतात. कोब्रा कमांडचे चयन सीआरपीएफ मध्ये भरती झालेल्या जवानांमधून केले जाते चयन केल्यानंतर त्यांना कधी चार तर कधी नऊ महिन्याची कठीण प्रशिक्षण दिले जाते. Cobra Force चे ब्रीद वाक्य "यश किंवा मृत्यू" असे आहे. जंगलामधील होणाऱ्या युद्धात भारतातील सर्वात अननुभवी आणि सफलता पूर्वक Cobra Force आहे . Cobra Force च्या गोरिला पद्धतीने युद्ध करणे, बॉम्ब शोधणे, जंगलात कश्या प्रकारे जिवंत राहून कोणत्या प्रकारे युद्ध करायचे कौशल्य शिकविले जाते जेणे करून संकटाच्या काळात सैनिकाला कोणत्या प्रकारे युद्ध करावे हे समजले पाहिजे . Cobra Force आतापर्यंत 2 शौर्यचक्र आणि 9 वीरता पुरस्काराने सन्मानित केली गेली आहे सध्या आपल्या देशात Cobra Commando ची 10 युनिट आहेत प्रत्येक युनिट मध्ये 1300 जवानांचा समावेश केला जातो Cobra Force ची Snapper Unit भारतिय सैन्यात उत्तम श्रेणीत गणली जाते. Cobra Commandoशत्रूशी लढण्याची कला आता विदेशात पण पोहचली आहे. दर सहामहिन्यांनी Cobra Commando बाहेरील देशातील अमिरीक, रशिया, इज्राइल सैनिकांना Gorilla युद्ध प्रशिक्षण देण्यास जातात.
Ghatak Force
Ghatak Force "भारतीय अजेय विशेष सेना" Ghatak Force भारतीय पायदळ सेनेचा एक भाग आहे. जी भारतीय सैन्यात प्रत्येक पायदळ बटालियनमध्ये उपस्थित आहे. घातक हा हिंदी शब्द आहे ज्याचा अर्थ "Killar" किंवा "प्राणघातक" आहे. Ghatak Force हे नाव जनरल बिपिनचंद्र जोशी यांनी त्यांना दिले. Ghatak Force यांची 20 जणांची फलटण असते त्याचेकाम आहे शत्रूला चकवा देणे आणि शत्रूवर हल्ला करणे. हे पायदळ सेनेच्या एक पाऊल पुढे काम करते जेणे करून सेनेला येणाऱ्या धोक्यापासून आधीच सूचना देता येईल हे मोठमोठ्या शस्त्रांनी सुसज्य होऊन शत्रूच्या भागात धाडी मारत जातात आणि दूरवरून शत्रूवर सुद्धा वार करण्याची क्षमता यांच्यात असते. कारगिल सारख्या युद्धात यांचा सहयोग होता. याचे प्रशिक्षण फार कठीण आणि भयानक असते याना पर्वतारोहन आणि 50 ते 60 किमी पर्यंत जलद पद्धतीने चालण्याची ट्रेनींग दिली जाते याना शस्त्रस्तासोबत आणि पाठीवर २० किलो भारी वजन देऊन मैलो चालवले जाते यामुळे हे शारीरिक पणे खूप मजबूत असतात.
Para commando force
Para commando force भारतातील यशस्वी फोर्स पैकी एक आहे. Para commando ची स्थापना 1966 मध्ये भारतीय सेन्याने केली होती. Para commando फक्त जमिनीवर नाहीतर हवेतून सुद्धा युद्धात पारंगत आहे. Para commando Parachute च्या माध्यमातून शत्रूच्या आतल्या भागात जाऊन कारवाही करण्यात हातखंडा आहे पॅरा Para commando हल्लीच्या काळात बरेच वेळा ऐकले गेले पाकिस्तान मध्ये काश्मीरच्या उरी मधील Surgical Strike मध्ये पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांचे केंद्र उध्वस्त केले. Para commando हे आतंकवादी संघटनेशी लढण्यात, बंदी केलेल्या नागरिकांना सोडवण्यामध्ये माहीर आहे Para commando भारताची सर्वात पहिली आणि सर्वात जुनी रेजिमेंट आहे. Para commando प्रशिक्षण जवळजवळ 3 वर्षा पर्यंत चालते याचे प्रशिक्षण भयंकर कठीण स्वरूपाचे असते. भारत-पाकिस्तान युद्धामध्ये Para commando प्रथम तैनात करण्यात आले होते, ज्यात जम्मू-कश्मीरच्या पुंछमधील मांधोळ येथे 9 Para commando ने भारी तोफा बॅटरी हस्तगत केली होती. Para commando ने 1971 आणि 1999 मध्ये झालेल्या युद्धात आपले मोठे योगदान दिले होते.
Force One महाराष्ट्र सरकारची मुंबई महानगर क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक खास Counter Terrarium Unit आहे. जे राष्ट्रीय सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले जगातील सर्वात मोठे महानगरा मध्ये आहे. 2000 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या अंतर्गत Force One ची स्थापना करण्यात आली. Force One ची भरती महाराष्ट्र पोलिसांकडून यापूर्वीच उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या तरुण स्वयंसेवकांमध्ये घेतली जाते. जगात सर्वात तीव्र गतीने काम करणारी टीम आहे जी फक्त 15 मिनिटात आपल्या सर्व शास्त्रसाहित्या सहित तयार होते याना NSG आणि Israel च्या Special Commando मार्फत प्रशिक्षण दिले जाते स्फोटकाचे निरीक्षण, अचूक लक्ष भेदून वार करणे या कौशल्याने याना इतरांपेक्षा वेगळं बनवते. मुंबईतील कोणत्याही प्रकारच्या आतंकी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास हे सक्षम आहेत. यांच्या भरतीच्या वेळी 3000 पर्यंत निवेदन आले होते पण यातील फक्त 216 चे चयन केले गेले.
वैगवेगळ्या प्रकारचे सैन्यदल आपल्या भारत देशात कार्यरत आहेत अश्या सर्वात भयानक Special Forces आणि हे commando आपल्या देशाच्या सेवेसाठी कायम सतर्क असतात. यांच्यामुळेच आपण आपल्या देशात सुरक्षित आहोत. एक सैनिक होणे काही साधं काम नाही कठीण मेहनत आणि परिश्रम करून शरीर मोडेपर्यंत सराव करणे तसेच मनावर मानसिक दबाव असताना देखील दिलेली जबाबदारी अखेरच्या श्वासापर्यंत पूर्ण करण्याची तयारी ठेवणे. हे करत असताना हसत हसत आपले सर्वकाही अर्पण करणाऱ्यांना या जाबाज योध्याना शतशत नमन आहे. हि खूप निराशाजनक बाब आहे कि आपल्याला आपल्या देशातील Special Force तसेच सैन्यदलाबद्दल फारसे काही जास्त माहित नाही किंवा ते जाणून घेण्यासाठी आपण किती उसूक्त आहोत ते प्रत्येकाने आपणच ठरवावे. आपल्याला आपल्या भारत देशातील सर्व सैन्यदलाचे आभार मानायला हवे ज्याच्यामुळे आपण सुरक्षित आहोत आणि हे सांगावे लागताकामा नये. यासाठी आपण आपल्या देशप्रेमाची ज्योत प्रत्येकांच्या मनामनामध्ये प्रज्वलित केली पाहिजे आताच्या पिढीकडून पुढच्या पिढीला मार्गदर्शन करून देशाबद्दल आणि देशासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या सैन्यदलाचे महत्व किती अनमोल आहे हे पटवून देता आले पाहिजे. हि सुद्धा एक देशसेवा मानून आपल्या देशाच्या प्रति आपले देशावरील प्रेम व्यक्त करता आले पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक आहोत हे छातीठोक पणे अभिमानाने सांगू शकतो कि भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे.
जय हिंद !!
धन्यवाद !!
लेखन: अर्जुन ना वालावलकर
धन्यवाद !!
लेखन: अर्जुन ना वालावलकर
0 comments:
Please do not enter any spam link in the Comment