Maratha Light Infantry Regiment

Maratha Light Infantry Regiment

Maratha-Light-Infantry-Regiment-A3
मराठा आणि रेजिमेंट 
रेजिमेंट म्हणजे काय आणि तीची स्थापना व त्याची कारणे
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे महत्व काय आहे.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट जवानांची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म 
मराठा रेजिमेंटच्या जवानांचे युध्दातील योगदान 
मराठा रेजिमेंटच्या जवानांना मिळालेला युध्द सन्मान 
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंचे प्रशिक्षण केंद्र आणि इतिहास 
मराठा रेजिमेंट चे घोषवाक्य कोणते, ते कुणी व कधी दिले.

Maratha-Light-Infantry-Regiment-5

मराठा आणि रेजिमेंट 

मराठ्यांचं नाव घेताच आपल्याला आठवतात ते श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा अस्मर्णीय, असाधारण स्वराज्यासाठी केलेल्या पराक्रमाचा इतिहास. शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा वारसा जपणाऱ्या मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंटचा ज्यांनी जगाला आपली ताकत दाखवून दिली.

जो मरणाला घाबरत नाहीत तो मराठा, जो कोणासमोरही नजर झुकवत नाही तो मराठा, ज्यांची स्वारीच्या बातमीने शत्रूच्या गोटात घबराट पसरते तो मराठा, ज्याच्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात स्वराजाचा भगवा झेंडा रोवला तो मराठा, ज्यांनी हिंदुस्थानातून अटक पासून ते कटक पर्यंत भगवा फडकावला तो मराठा. शौर्य, जिद्द, बहादुरी, बेधडक आक्रमण,चतुराई , चपळाई, गनिमीकावा, या सर्व गोष्टीच संमिश्र रसायन म्हणजे मराठा.

मराठा यांच्या पराक्रमाच्या अनेक गाथा आहेत आणि प्रत्येक घटना पेरणादायी आणि स्फुर्तीदायी आहे. महाराज्यांच्या स्वराज्याच्या काळापासून ते पेशवाई संपुष्टात येई पर्यंत मराठा मावळ्यांचा एक ज्वलंत इतिहास आपल्याला पाहायला मिळतो नंतर ब्रिटिशांनी जसजसे हिंदुस्थानावर आपली पकड मजबूत करीत गेले आणि पूर्ण हिंदुस्थानाला आपले गुलाम बनविले हे उघड सत्य असले तरी आपल्या देशात येऊन त्यांनी आपल्याच माणसांना हाती घेऊन आपल्यावर राज्य केले हे सत्य सुद्धा आपण नाकारू शकत नाही. इथे सुद्धा मराठ्यांनी आपला पराक्रम आणि युद्धातील शौर्य दाखवण्यात कधी मागे हटले नाहीत. 



मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंटची ही गाथा भारतीय सैनिकांची, ही गाथा जवानांच्या शौर्याची, ही गाथा आपल्या धरणी मातेच्या वीरांची, ही गाथा देशासाठी दिलेल्या बलिदानाची, ही गाथा त्यागाची, ही गाथा जीवावर उदार होऊन लढणाऱ्यांची, ही गाथा शत्रूला भुईचीत करून पळवून लावणाऱ्या मर्द मराठयांची, ही गाथा देशसेवेच्या व्रताची, ही गाथा सर्वस्व समर्पणाची, ही गाथा मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंटची.

अडीशे पेक्षा जास्त वर्षाचा वारसा लाभलेल्या या मराठा लाईट इंफ्रन्टरीची इतिहासाची पाने आज आपण उलगडणार आहोत. सैनिकांच्या शौर्याला इतिहास असतो हा इतिहास असतो ज्वलंत आणि देदीप्यमान. “गनिमाच्या देखती फोजा रनशूरांच्या फुरफुरती भुजा" असा एक इतिहास मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंटला लाभला आहे.

जेव्हा तुम्हीं घरी परत जाल तेव्हा त्यांना आमच्या बद्दल सांगा, “त्यांच्या भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान दिला आहे”. इंग्लिश कवी जॉन मॅक्सवेल एडव्हेंटच्या या ओळी कोहिमा इथल्या स्मारकावर आजही पाहायला मिळतात. खरंच असाच वर्तमान भारतीय जवानांनी आपल्याला दिलाय त्यापैकी शूर वीरांची रेजिमेंट म्हणजे मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट.

रेजिमेंट म्हणजे काय आणि तीची स्थापना व त्याची कारणे

हिंदुस्थानात प्राचीन काळापासून सेनापती पध्दत चालत आलेली आहे. सतराव्या शतकापासूनच ब्रिटिशांचे हिंदस्थानात व्यापार निम्मित येऊन इथेच स्थिर होण्याचा आणि हिंदुस्थानावर राज्य करण्याचा निर्णय पक्का झाला तेव्हापासूनच त्यांनी त्या काळातील आधुनिक आणि पद्धतशीर पणे सैन्याचा विकास केला. मुळातच स्वतःहा ब्रिटिश थोड्याच प्रमाणात हिंदुस्तानात आले होते त्यामुळे त्याचे स्वतःचे सैनिक फार कमी प्रमाणात होते तरीसुद्धा त्यांनी आपल्या सैन्याचा विकास स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देऊन आपला फोज फाटा वाढवून ताकदवर बनले होते.व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानात आलेले ब्रिटिश, पोर्तुगीस, फ़्रेंच, स्पॅनिश यांनी हिंदुस्थानातील मातीचा, हिंदुस्थानातील लोकांचा, समाजाचा, चालीरीती, येथील पर्यावरणाचा, भौगोलिक परिस्थितीचा आणि येथे उपलबध असलेल्या संसाधनांचा बारकाईने अभ्यास केलेला होता त्यामुळे त्यांना हिंदुस्थानावर आपली पकड बळकट करण्यास मदत झाली ज्या प्रांतातील राज्य त्याचे अधिपत्य स्वीकारून ब्रिटिशांत विलीन झाली तिथल्या सैन्याला त्यांनी आपल्या पद्धतीने तयार केले. वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांची वेगवेगळी युद्धनीती आणि त्याची बहादुरी पाहून इंग्रजांनी त्या प्रांता प्रमाणे सैन्य दलाची निर्मिती सुरु केली त्यामध्ये तेथीलच स्थानिक लोकांना सामील करून घेतले. आणि अश्या प्रकारच्या केल्या गेलेल्या सैनिक समूहाला किंवा याच सैन्य दलांना रेजिमेंट म्हणतात.





इंग्रजांन द्वारे मराठा रेजिमेंटचे गठण होणे यासाठी महत्वाचे कारण होते ते म्हणजे मराठ्यांचा इतिहास त्याचे शौर्य फारच जवळून पहिले होते. मराठे संख्या बाळांनी जरी कमी असले तरी त्याची युद्ध नीती, गनिमाची कावा, छापेमारी युद्ध शैली, वेळेच्या आधीच पोहोचून शत्रूला वाटेतच परायचीत करणे आणि नैसर्गिक उत्पादनाचा आणि वातावरणाचा उपयोग करून शत्रूवर मात करणे यात मराठ्यांचा हातखंडा होता. हे सर्व ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य घडताना उध्ड्या डोळ्यांनी पहिले होते. त्यामुळे ब्रिटिशांनी मराठा रेजिमेंटचे गठण केले.



स न ४ फेब्रुवारी १७६८ ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई मध्ये आपल्या वखारींची सुरक्षितते साठी मराठ्यांचा काटक पणा आणि गनिमी काव्याने लढण्याचे गुण हेरून ब्रिटीशानी मराठ्याची निवड करून बॉम्बे सीबॉय या नावाची एक बटालियन उभारलेली होती. मराठा सेना आणि नोसेना दोन्ही बॉम्बे" सीबॉय" ची दुसरी बटालियन बनली हिला "जंगी पलटण" या नावाने ओळखले जाऊ लागले त्यात बहुसंख्य सैनिक हे मराठा होते आणि मराठ्यांची दुसरी फलटण बॉम्बे सीबॉयच्या अंतर्गत तिसरी बटालियन १७६८ मध्ये स्थापित केली गेली तिला नाव दिले गेले "काली पाचवी". अठराव्या शतकात सुध्दा काही बटालियन स्थापन करण्यात आल्या त्यांनी कहून, बलूच, अभेस्मिया मध्ये आपला पराक्रम दाखविला १८२४ मध्ये बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रंट्री हि बटालियन स्थापित केली गेली, १९२२ नंतर पुढे मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंट पहिल्या आणि दुसऱ्या विश्वयुद्धात आपले पराक्रमाचे प्रदर्शन केले आणि ब्रिटिश काळात दिल्या जाणाऱ्या युध्द सन्माना साठी पात्र ठरले. १९४७ मध्ये देशाला स्वातांत्र्य मिळाल्या नंतर या बटालियनला मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट यानावाने ओळखू जाऊ लागले. जी आज २१ बटालियन मजबूत आहेत.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे महत्व काय आहे.

मराठा रेजिमेंट एक प्रकारची लाईट इन्फेन्ट्री आहे. लाईट म्हणजे प्रकाश व इन्फेन्ट्री म्हणजे पायदळसेना. जसे लाईट इन्फेन्ट्री म्हणजे प्रकाशाच्या गतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर न थकता चालतच प्रवास करणारी सेना. स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा मराठा रेजिमेंटने सैन्यदलात राहवून शौर्याला नवीन आकार देण्याचे थांबिवले नाही. स्वतंत्र तर पूर्ण भारताला मिळाले पण गोव्यामध्ये पोर्तुगीज आपला हक्क जमवून बसले होते तेव्हा भारतीय सैन्याच्या आदेशाने मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट च्या जवानांनी बेळगावव पासून ते गोवा ११० किलोमीटरचे अंतर वेंगुर्ल्या मार्गे पायी प्रवास करून गेले आणि पोर्तुगीजांवर आक्रमण करून गोव्याला स्वतंत्र मिळवून दिले आणि इतकेच नाही तर गोव्याच्या सोबत दमण आणि द्विपला पण स्वतंत्र भारतामध्ये मिळवून घेतले.

आज हि रेजिमेंट देशाची सुरक्षा आणि रेजिमेंटचा सन्मान राखुन येणाऱ्या पुढील पिढीला प्रेरणा स्वरूप बनली आहे. स्वातंत्र्यानंतर देखील 'एम एल आय' ने आपली युद्धनीती कायम ठेवत देशाच्या सीमांचे रक्षण प्राणपणाने केले आहे. शिवरायांच्या युध्द नीतीतील एक “गनिमी कावा” ही पध्दत या रेजिमेंट ने आजही तेवढ्याच तडफेने जपत आपल्या समोर येणाऱ्या दुश्मनांचा पाडाव करण्याचा पायंडा कायम ठेवला आहे. म्हणून तर काश्मीर असो , सिक्कीम , अरुणाचल प्रदेश , मणिपूर नागालँड , किंवा देशाची कुठलीही सीमा असो मराठा लाईट इन्फन्ट्री छातीचा कोट पुढे करून देशरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट जवानांची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म



आपण भारतीय सैन्याला वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागून अंदाज लावू शकत नाही कि कोणते सैन्यदल जास्त ताकतीचे आहे किंवा कोण सर्वात श्रेष्ठ आहे आणि आपल्याला तसा विचार सुद्धा नाही केला पाहिजे. कारण आपल्या भारतीय सैन्यातील प्रत्येक जवान शौर्याने परिपूर्ण आहे पण जेव्हा मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट बद्दल बोलायला लागतो तेव्हा त्याच्या शौर्याच्या गाथा ऐकतानाच डोळ्यासमोर पूर्ण इतिहास जिवंत होऊन उभा राहतो रक्त सळसळू लागत अंगात स्फूर्ती निर्माण होऊन छाती फुलून येते मन एक चित्त होऊन वाचण्यात आणि ऐकण्यात दंग होऊन जाते.

इंग्रजांन द्वारे मराठा रेजिमेंटचे गठण होणे यासाठी महत्वाचे कारण होते ते म्हणजे मराठ्यांचा इतिहास त्याचे शौर्य फारच जवळून पहिले होते. मराठे संख्या बाळांनी जरी कमी असले तरी त्याची युद्ध नीती, गनिमाची कावा, छापेमारी युद्ध शैली, वेळेच्या आधीच पोहोचून शत्रूला वाटेतच परायचीत करणे आणि नैसर्गिक उत्पादनाचा आणि वातावरणाचा उपयोग करून शत्रूवर मात करणे यात मराठ्यांचा हातखंडा होता. हे सर्व ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य घडताना उध्ड्या डोळ्यांनी पहिले होते. त्यामुळे ब्रिटिशांनी मराठा रेजिमेंटचे गठण केले.

सुरुवातीच्या काळात त्यांना बॉम्बे सिपॉय या नावाने ओळखले जात होते. आणि इंग्रज हे स्वतः मनात होते की मराठा रेजिमेंटचे गठण केल्यापासून दुसऱ्या महायुध्दा पर्यंत ब्रिटिशांचे पारडे भारी होते सतराव्या शतक पासून ते अठराव्या शतक पर्यंत अंतर्गत युध्दासाठी मराठा रेजिमेंटलाच पाठविले जात होते.



मराठा रेजिमेंटच्या जवानांचे युध्दातील योगदान

१८६८ मध्ये अभेसिनीओच्या थियोडीयो राजा विरूध्द लढाई साठी पहिल्यांदा या बटालियने देश बाहेर आफ्रिकेत ४५० किमी चालत प्रवास करून युद्ध केले आणि तेथिल किल्ला काबीज केला. त्याहून हि आधी मराठा बटालियने बलुचिस्तानमध्ये काहूल च्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता विशेषता काली पाच या बटालियननं त्याच्या दाखवलेल्या शौर्य मुळे त्याच्या झेंड्यावर काहून लिहिल गेलं होत इतकाच नाही तर पुणे कंटेंट मध्ये एका रस्त्याला काहून असे नाव देण्यात आल. 

मराठ्याची बहादुरी पाहून इंग्रजांनी आफ्रिका, चीन, अफगाण, आणि युरोप देशांमधील युध्दांसाठी मराठा जवानांना पाठवण्याचे सुरु केले होते. १९१४ मध्ये मराठा इन्फेन्ट्री ला पहिल्या महायुध्दातील एक भयंकर महायुद्धाला सामोरे जावं लागल पर्शियन गल्फ मध्ये टायग्रिस नदीच्या काठावर कूट इथं तीन दिवसाच्या लढाई नंतर तुर्की सैन्य शहर बाहेर फेकलं गेल मात्र तुर्की सेनानी कूट शहराला पुन्हा वेढा दिला त्यावेळी हजारो मराठा आणि ब्रिटिश सैनिक मारले गेले शंभरहून अधिक दिवस उपासमार करून मराठ्यांनी लढाई केली तरीही पुढे १९१८ साली तुर्कांचा पराभव मराठा बटालियन केला. नंतर या बटालियननं अफगाणिस्थानच्या आक्रमणाला तोंड दिल आणि त्यात हि पराक्रम गाजविला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात सुद्धा मराठा लाईट इन्फन्ट्री ने निर्णायक भूमिका निभावली होती. 'बॅटल ऑफ शरकत' च्या लढाईने तर पहिलं महायुद्ध संपवलं होतं. दुसऱ्या महायुद्धातही तश्या अनेक पराक्रमांचे विक्रम केले गेले.





१७५८ मध्ये ज्यामराठ्यांनी अटक पर्यंत भगवा फडकावला तोच पराक्रम १९६५ मध्ये भारत पाकिस्तान च्या युद्धात पुन्हा पाहायला मिळाले वाघा बॉर्डर पार करून मराठा रेजिमेंटच्या जवानांनी पाकिस्तान च्या काही भागात आपला कब्जा जमविला. १९७१ च्या युध्दामध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मराठा रेजिमेंटच्या जवानांनी आपले फार मोठे योगदान दिले. मराठा रेजिमेंटच्या 22 व्या तुकडीचे नेतृत्व करणारे संभाजी पाटील यांनी साहस आणि पराक्रम दाखवून बांग्लादेशच्या ढाक्कावर आपला कब्जा मिळविला होता. भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये मराठा रेजिमेंटच्या बटालियनचे कार्यरत आहेत. मुंबईच्या २६/११ च्या आतंकवादी हमल्यामध्ये प्रतिउत्तर देण्यासाठी आलेल्या जवानांमध्ये सुध्दा मराठा रेजिमेंटचे जवान होते. एवढाच नाहीतर सर्जिकल स्टायक मध्ये सुध्दा जवानांनी आपली कामगिरी बजावली होती. 

दुसऱ्या महायुद्धात रोमेलच आक्रमण रोखण्यासाठी नाईलच्या खोऱ्यात मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करण्यात आली त्यात इराक मधून एक मराठा तर सायप्रसमधून तीन मराठा बटालियनस आणल्या गेल्या दुर्दैवाने अनेक मराठा सैनिक जर्मन सैनिकांच्या ताब्यात सापडल्यानं ते युध्द कैदी झाले ज्या प्रमाणे हा इतिहास जवानांचा आहे त्याप्रमाणे युद्ध कैद्यांचा सुद्धा आहे तो अधिक मनाला हेलावणारा आहे. या युद्धकैद्यांना ब्रुन्सवीक इथे ठेवण्यात आल त्याची साक्ष म्हणजे कर्नल बोल्टर यांनी मराठा बटालियनचे कॅप्टन बाबुराव दिनकर मोहिते यांचे खडूणी रेखाटलेल चित्र, हे चित्र आजही बेळगावच्या संग्रहालयात पाहावयास मिळते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सैन्यदलात बरेच बदल झाले सॊस्थान खाली झाल्या मुळे त्यांच्या बटालियन विलीन झाल्या पण मराठा इन्फेन्ट्री रेजिमेंट कायम राहिली. आज या रेजिमेनीच्या एकूण सवीस बटालियन आहेत. २० रेगुलर बटालियन, ४ राष्ट्रीय रायफल, गॉन प्रादेशिक सेना कार्यरत आहेत.

मराठा रेजिमेंटच्या जवानांना मिळालेला युध्द सन्मान

मराठा रेजिमेंट त्या काही रेजिमेंट पैकी एक आहे ज्यांच्या दोन जवानांना व्हिक्टोरिया क्रॉस देऊन सन्मानित करण्यात आले होते. व्हिक्टोरिया क्रॉस हा ब्रिटन मधील सर्वात मोठा नागरिक आणि सैन्य सम्मान आहे. १९४५ मध्ये ज्याना हा सम्मान दिला गेला होता त्यांच नाव होत नामदेव जाधव आणि कमांडर यशवंत घाडगे आपल्या मातृभूमीपासून दूर जर्मनी मध्ये पराक्रम दाखवणारे मराठा रेजिमेंटच्या या दोन जवानाने आपल्या रेजिमेंटच्या संम्मानात भर घातली.



यशवंत घाडगे : इटली मध्ये जर्मन सैनिकाच्या एका पोस्टवर मराठा बटालियनच्या एका कंपनीनं हल्ला केला या कंपनीच्या रायफल सेक्शनचे कमांडर यशवंत घाडगे होते त्याच वेळी जर्मन सैनिकांनी तुफान गोळीबार सुरु केला त्यामुळे आपले साथीदार मारले जात असताना पाहून घाडगे यांनी ग्रॅनाईट फेकून शत्रूचे पोस्ट उध्वस्त केले. हातगाईच्या लढाईत ते जर्मन सेनेच्या फारच जवळ पोहोचले होते त्याच्या टॉमी गन मधल्या गोळ्याही संपल्या होत्या शेवटी त्याच टॉमी गनच्या दस्त्याने त्यांनी शत्रूला आस्मान दाखवल. तेव्हढ्यात शत्रूच्या गोळीनं रायगड जिल्ह्यातल्या पळस गावचा बहादर मराठा जवानांचा वेध घेतला त्याच्या इटलीमधील युद्धात असामान्य पराक्रमाबद्दल त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस देऊन सन्मान करण्यात आला. यशवंत रावांच्या वीर मरणाच्या आठवणी त्यांच्या वयोवृद्ध पत्नीने अजून जपून ठेवल्यात. 

नामदेव जाधव : ९ एफ्रील १९४५ रोजी इटली मध्ये सिनियो नदीच्या काठावर जर्मन सैन्य बरोबर झालेल्या युद्धात मराठा लाइट इन्फेन्ट्री च्या नामदेव जाधव यांनी जर्मन सैन्याचे दोन पोस्ट उध्वस्त केले शत्रूच्या हल्ल्यात मराठा बटालियनचे कंपनी कमांडर सह सर्व सैनिक मारले गेलेले असतानाही नामदेव जाधव यांनी एकट्याने जर्मन सैन्याला आस्मान दाखवून दोन पोस्टवर कब्जा मिळविला त्याच्या या धाडसाबद्दल त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस बहाल करण्यात आला.

हि पदक वैयक्तिक असली तरी यातून वाहणारा स्तोत्र मात्र निरंतर आहे. जो मराठाच्या प्रत्येक जवानांना उद्युक्त करतो निरंतर शौर्य गाजवण्यासाठी रेजिमेंटचे नाव राखण्यासाठी. बलिदानाचा आणि त्यागाचा एक अनंत प्रवाह ह्या रेजिमेंट मधून जो वाहत आहे तो आज पर्यंत कायम आहे. 

मराठा रेजिमेंटच्या जवानांनी आतापर्यंत युद्धात बरेच पराक्रम गाजवले त्याची सन्मान पदके पाहून आपल्याला याची प्रचिती येते. मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंटला आता पर्यंत मिळालेली सन्मान पदके यात २ व्हिक्टोरिया क्रॉस, ५ अशोक चक्र, २९ परम विशिष्ट सेवा मेडल, ४ महावीर चक्र, १५ कीर्तीचक्र, ३५ अतिविशिष्ट सेवा मेडल, ४४ वीर चक्र, ६४ शौर्य चक्र, ४ युध्द सेवा मेडल, ४४० सेना मेडल, १ अर्जुन अवार्ड आणि १ पदमभूषण अवार्ड इत्यादी मेडल आणि अवार्डने मराठा रेजिमेंटच्या जवानांचा सन्मान कार्यात आला आहे आणि या सर्व सन्माननी बनत आहे Most Decorated Regiment of India. DUTY-HONOUR-COURAGE ने भरलेली रेजिमेंटला शत शत प्रणाम.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंचे प्रशिक्षण केंद्र आणि इतिहास





मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट हि एक अनोखी रेजिमेंट आहे जिच्या रेजिमेंट केंद्राला सुद्धा एका बॅटल ऑनर प्रमाणे सन्मान दिला आहे. बेळगावचे हे सैनिकी प्रशिक्षण केंद्र सर्वात जुन्या पाच रेजिमेंट केंद्रा पैकी एक आहे. जे बॉम्बे प्रेसिडेंसि च्या निर्मितीच्या वेळी स्थापन केले होते आणि हे इंग्रजांच मोठ शासनिक क्षेत्र होते. ब्रिटिश काळात सुद्धा या सैन्याने आपल्या अंगभूत शिस्त आणि उपजत पराक्रमाचे झेंडे जगभर रोवले होते आणि आज हेच रेजिमेंटचे केंद्र इतिहासाची साक्ष देत मोठ्या दिमाखात उभे आहे. त्या ऐतिहासिक मराठाच्या साहसीचा, शौर्याचा, बलिदानाचा आणि पराक्रमाची गाथा घेऊन. 

दुसऱ्या महायुद्धातील मराठा रेजिमेंटचे शौर्य पाहून स्वतः इंग्रज सुद्धा चकित झाले होते. पण दुसऱ्या महायुध्दा नंतर इंग्रजांची ताकद कमी होऊ लागली होती. तेव्हा इंग्रज आपल्याच रेजिमेंटच्या सैन्याशी घाबरू लागले होते. कारण १८५७ मध्ये त्यांच्याच सैन्यातील जवानांनी विध्रोह सुरु केला होता तसे मराठयानी केला तर आपण कुठे पाळूही शकत नाही आणि देशातील स्वातंत्र्याच्या चळवळी वाढत होत्या त्यामुळे ब्रिटिश साम्राज्य तुटत चालले होते.

ब्रिटिशांच्या काळात मराठा इन्फेन्ट्री मध्ये अधिक तर मराठा जवान होते पण स्वातंत्र्याच्या नंतर आता सर्व जातीचे लोक समावेशक आहेत. मराठा इन्फेन्ट्री मध्ये भरती होण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक असतात पण प्रवेश मिळवून स्वप्न पूर्ण करणारे काही मोजकेच असतात. निवड झालेल्या उमेदवारांना बेळगावच्या प्रशिक्षण केंद्रात कठोर प्रशिक्षण दिले जाते. 

मराठा लाईट इन्फेन्ट्री भारतीय सैन्य दलाची एक आधुनिक आणि उच्च प्रशिक्षित बटालियन पैकी एक रेजिमेंट आहे. मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट साठी हि खूप मोठ्या गर्वाची गोष्ट आहे कि "श्री छत्रपती शिवाजी महाराज" त्याचे मार्गदर्शक आणि प्रेरणा स्फूर्ती आहेत. लढण्यासाठी केवळ शौर्य, हिंमत, टाकत, एवढं असून उपयोगच नाही तर त्याबरोबर आवश्यक आणि महत्वाचं असत ते आहे टेक्निक, मराठा लाईट इन्फेन्ट्रीच वार टेक्निक जगभरात नावाजलेला आहे. या मराठा लाईट इन्फेन्ट्रीचा इतिहास जगभरच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे, लिहिला गेलेला आहे आणि तो ही शौर्याचा.



मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंटच्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये जवानांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कौशल्य पणाला लावलेल असते. ३४ आठवड्याचे या कठोर प्रशिक्षणाचे दोन भाग असतात. प्रथम भाग १९ आठवड्यांचे मूलभूत प्रशिक्षण त्यामध्ये पिटी, फूडड्रिल, रायफल फायरिंग, क्रॉस कन्ट्री, बॉकसिंग, रूट मार्च १० किलोमीटर आणि २० किलोमीटर आणि द्वितीय भाग १५ आठवड्याचा ऍडव्हान्स प्रशिक्षणाचा असतो जो मूलभूत प्रशिक्षण पेक्षा काढीण असतो त्यामध्ये लाईट मशीनगनची फायरिंग, रायफलड्रिल, ३० आणि ४० किलोमीटर रूट मार्च, बॅटल ऑप्टिकल कोर्स आणि आउटडोर प्रशिक्षण असते त्या मध्ये मूलभूत प्रशिक्षण आणि शास्त्र प्रशिक्षण झाल्यानंतर फिल्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट शिकल्यानंतर बचाव आणि आक्रमण करण्याचे सराव प्रशिक्षण घेऊन प्रत्येक्षात अंमलबजावणी कशी करायची ते शिकवले जाते. 

आतंकवादी कारवाया रोकण्यासाठी त्यांच्यावर कश्या प्रकारे हमला करून विजय मिळवायचा याचे प्रशिक्षण देण्यासाठी चक्क बेळगावच्या प्रशिक्षण केंद्रा मध्ये जमूकाश्मीर मधील एक गावच उभ करण्यात आल आहे. या प्रशिक्षणात जवानांचा कान, मन, चित्त, एकाग्रत असणे महत्वाचं आहे. इथे चुकीला क्षमा नाही कारण एका चुकीची किंमत शत्रू सैन्याची बंदुकीची गोळी असते. इथला जवान अश्या कौशल्यात पारंगत व्हावा म्हणूनच अभिरूत युद्धभूमीवर जवानांना कसून घडवले जाते. नऊ महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर मराठा इन्फेन्ट्रीच्या जवानांमध्ये जे बळ येत ते हत्तीचं बळ असत म्हणूनच जगभरातील शत्रुंना या जवानांनी पाणी पाजलेला आहे. अडीशे पेक्षा वर्षाचा हा इतिहास अलीकडच्या या शहीद कुंडलीत येऊन पोहचतो. शहीदांच्या या कहाण्या इथल्या मातीच्या कणा कणा मध्ये आहेत. त्या कहाण्या आयकून कधी डोळे पाणावतात तर कधी रक्त सळसळत ते आपल देश प्रेम सीमेवर येऊन थांबत.





मराठा रेजिमेंट चे घोषवाक्य कोणते, ते कुणी व कधी दिले.

मराठा रेजिमेंटची गाथा फार मोठी आहे. "शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावा प्रताप" श्री छत्रपती शिवाजी महाराजचा जयजय करीत मराठा रेजिमेंट च्या जवानांनी मोठमोठी आव्हानांवर मात केली आहे. महाराजच नाव मराठा रेजिमेंटच्या रक्तातच आहे. म्हणूनच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मराठा रेजिमेंटच्या युद्धाच्या घोषवाक्यामध्ये आहे. या घोषवाक्याची सुद्धा एक रंजक कहाणी आहे. हे वाचून तुम्हाला आचार्य वाटेल. शिवाजी महाराज्यांच्या मावळ्यांचा पराक्रमा बद्दल ऐकल की मन अपोआपच त्या काळात जात.

आपल्या भारतीय सैन्य दलातील प्रत्येक रेजिमेंटची किंवा बटालियनची एक युद्ध ललकारी असते मग ती देशाच्या नावाने आहे तर काहींची देवाच्या नावाने आहे पण मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट हि अशी एकमेव रेजिमेंट आहे जिची युध्द ललकारी "बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय" हि आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषा बद्दल सांगायला फार अभिमान वाटतो पण ह्या जयघोषाची ललकारी मागील इतिहास पण फार मोठा रंजक आणि कौतुकास्पद आहे. ही जयघोषाची ललकारी आपल्याला स्वातंत्र्या नंतर मिळालेली नाही तर ती स्वातंत्र्याच्या पूर्वी मिळालेली आहे आणि ती ललकारी आपल्या देशात मिळालेली नाही तर ती आफ्रीकेतील सुधान मध्ये मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे ती ललकारी कुणी भारतीयाने दिलेली नाही किंवा सुचविलेली नाही ती दिली आहे एका ब्रिटिश अधिकारी बुमगार्ड याने. 

इ.स. १९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे. या प्रांतात उंच उंच डोंगरदऱ्यांच्या रांगा आहेत. या डोंगर रांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक". हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंटचे सैनिक लढत होते. पण बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता. तेव्हा मराठा रेजिमेंटमध्ये 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते त्यांनी ब्रिटिशांना अस सुचविल की आम्हाला आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजच नाव घेऊन युद्ध करण्याची परवानगी द्या, तुम्हाला हा किल्ला आम्ही सर करून दाखवतो. हे ऐकून ब्रिटिश सरकारने प्रथम नकार दर्शविला कारण हेच मराठे हाच जयघोष करून उलट आपल्यावर पण आक्रमण करू शकतात किंवा विद्रोह करू शकतात असा विचार त्याच्या मनात आला, पण वेळ निघून जात चालली होती आणि किल्ला हाती घेणे महत्वाचे होते त्यामुळे आपल्या स्वार्थापोटी नाईलाजाने ब्रिटिशाना मराठा रेजिमेंटच्या सैनिकांना परवानगी द्यावी लागली. मग काय मराठा रेजिमेंटच्या जवानांनी "बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी ललकारी देत मोठ्या जोशात आणि स्फूर्तीने एका रात्रीतच किल्ला सर केला आणि ब्रिटिशाना विजय मिळवून दिला. अस हे सर्व घडत असताना ब्रिटिश सैन्यातील एक अधिकारी बुमगार्ड याचे यासर्व घटनानकडे बारकाईने लक्ष दिला होता. आणि मराठा सैनिकाचे पराक्रम आणि शौर्य पाहून त्याच्या असे लक्ष्यात आले कि हे मराठा रेजिमेंटचे सैनिक जेव्हा असा जयघोष करतात तेव्हा त्यांच्या अंगामध्ये शंभर बैलाचं बळ येत रक्त सळसळून येते त्याच्यात एक प्रकारे वीरश्री संचारते आणि शत्रूवर तुटून पडतात ते शत्रूचा नायनाट करूनच टाकतात. जर असाच जोश त्याच्या मध्ये कायम राहिला तर आपल्याला विजया पासून कोणी रोकु शकत नाही. तेव्हा पासून हा महाराजांचा जयघोष मराठा रेजिमेंटच्या सैन्य दलात अधिकुत युध्द ललकारी म्हणून घोषित करण्यात आला आणि हि ललकारी म्हणजेच "Battle Cry" किंवा "War Cry" अजूनही मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट मध्ये घेतली जाते.

आपल्या भारतीय जवानांच्या बद्दल जितकं सांगावं, बोलावं, लिहावं तितकं कमीच आहे. ज्यांनी आपल्या मातृभूमीसाठी जीवाचे बलिदान दिले आणि जे सीमेवर देशाचे रक्षणार्थी तैनात आहेत व जे आपले कर्तव्य चोख बजावत आहेत त्याच्यामुळेच आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. "त्यांनी आपल्या भविष्यासाठी त्याचा स्वतःचा वर्तमान दिला आहे”. अश्या जावांच्या शौर्याच्या वीर गाथा ऐकून मन नतमस्तक होत कारण जिथे सामान्य माणसाची हद्द संपते तिथेच यांची हद्द सुरु होते. अश्या सर्व भारतीय जवानांना त्रिवार सलाम.



धन्यवाद !!
लेखन : अर्जुन ना. वालावलकर

The Indian Army-2

The Indian Army

Indian-Army-4

आपण पहिल्या भागात भरितीय सैन्यदलातील काही रेजिमेंट आणि बटालियन बद्दलची माहिती पहिली. भारतीय सेन्यदल इतके मोठे आहे की एका लेखांमध्ये पूर्ण माहिती लिहिली तर एक ग्रंथ होईल म्हणून मी काही भागात विभागून हि माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहे. आपण अजून काही फार पूर्वीच्या व आतापर्यंतच्या काळातील रेजिमेंट आणि बटालियन बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय सेन्यदलाने अशी कोणती पुराव्यानिशी माहिती उपलब्ध केलेली नाही कि ज्यामुळे कोणती रेजिमेंट सर्वात पूर्वीची व प्रथम आहे. तरी प्रत्येक रेजिमेंट व बटालियनच्या स्थापनेची माहिती आज उपलब्ध आहे. आपण त्या वादात न जाता इतर माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे.

National-Security-Guard

National Security Guard 

National Security Guard हि भारतात सर्वात जास्त प्रसिद्ध commando Force पैकी एक आहे. 1984 च्या Operation Blue Star च्या नंतर याची स्थापना केली गेली. याचे काम आतंकवादी कारवाही रोखाने आणि देशातील व्यवस्तेला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे व VIP ना व देशातील उच्च पधाधिकाऱ्याची सुरक्षा करणे आहे. National Security Guard ना सोप्या शब्दात सांगायचे तर NSG CommandoBlack Cat Commando या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे Commando नेहमी काळ्या रंगाचे कपडे काळ्या रंगाचा मुखवटा, काळ्या रंगाचे साहित्य आणि हत्यारे सुद्धा काळ्या रंगाचीच वापरतात. म्हणून याना Black Cat Commando म्हटले जाते. याच एकच ब्रीद वाक्य आहे “One for All, All for One” हे Commando आपली कारवाही करताना मनात कोणताही संकोच ठेवत नाही ते फक्त आपल्या ध्येयावर लक्षा ठेवून काम करतात. 26/11 च्या आतंकवादी कार्रवाहीत आतंकवादींना मारण्यात यांचा मोठे योगदान होते. NSG Commando ची प्रशंसा फक्त भारतच नाही तर पूर्ण जगभरात केली जाते व याची तुलना अमेरिका, रशिया, इस्राईल, फ्रांस च्या सैनिकानं बरोबरीने केली जाते. पूर्ण एशिया मध्ये NSG Commando च्या मुकाबल्यात कोणती दुसरी फोर्स नाही. NSG Commando च्या स्थापने पासून आता पर्यंत 20 ते 25 यशस्वी Operation पूर्ण केले आहेत.


Indian-Army-Garud-Commando

Garud Force
Garud Force हि  एक भारतीय वायू सेनाचीच Special Force आहे. 2001 मध्ये जेव्हा जम्मू काश्मीर मध्ये आतंकीवाद्यांनी दोन एअर बेस वर हमला केला तेव्हा त्यांना  मारण्यासाठी Garud Force ला पाचारण केले होते. याची स्थापना 2004 मध्ये Air Force Day च्या दिवशी जगासमोर घोषित केली गेली. Garud Force हवाई युद्धात पारंगत आहे आपल्या कौशल्याने ते शत्रूच्या हद्दीत घुसून आपल्या साथीदारांना सुरक्षित बाहेर काढतात Garud Force चे प्रशीकक्षण काही  यशस्वी Force माध्यमातून केले जाते. Garud Force अति भयानक व जगातील अत्याधुनिक हत्यारांनी सुसज्य असतात याचे ब्रीद वाक्य आहे "प्रहार से सुरक्षा" हे कोणत्याही प्रकारच्या प्रहारा पासून देशाची सुरक्षा करण्याची तयारी ठेवतात.
Indian-Army-Marcos
Marcos Force
Marcos Force भारतीय नौदलाचे विशेष दल युनिट आहे. हि एक सर्वोत्तम फोर्स आहे. याची स्थापना 1987 मध्ये  झाली यांना  Marin Commando म्हणून सुद्धा ओळखले जाते. हि Force सर्वप्रकारच्या युद्धासाठी  पारंगत आहे. मग ते समोरासमोर शत्रूबरोबरचे युद्ध असो, बंदी बनविलेल्या  नागरिकांना सोडवायचे असो किंवा थेट हमला करायचा असेल पाण्यातून केल्याजाणार्या ओप्रेशन मध्ये तर यांची महारार्थ आहे. संपूर्ण लढाऊ सामना सहित  ते समुद्रात Para-Drop करण्यास सक्षम आहेत. या फोर्सला दाढीवाली  फोर्स म्हणून ओळखले जाते. कारण याना कोणी ओळखू नये म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये दाढी वाढवून येतात. Marcos Commando शत्रुपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी नेहमी अत्याधुनिक शस्त्राने सुसज्य असतात. कारगिल युद्धात आणि मुंबई च्या आतंकवादी हमल्यात Marcos Commando साथ दिली होती. Marcos Commando बनण्याची ट्रेनींग 2 वर्षाची असते याची खास बाब हि आहे कि यात 20 ते 24 वर्ष पर्यंतच्या तरुणांचाच समावेश केला जातो त्यांना ट्रेनिगच्या दरम्यान अमेरिकन, ब्रिटन सारख्या सैन्याबरोबर शिक्षण घेण्याची संधी मिळते ज्यामुळे ते कोणत्याही प्रकारचे युद्धाला प्रतित्युर देऊ शकतात.

Indian-Army-Cobra-Force

Cobra Force 
Cobra Force हि एक CRPF ची एक Special Force आहे. जी CRPF च्या Commando Battalion for Resolute Action च्या नावाने सुद्धा ओळखले जाते. Cobra Force जसे नाव तसे काम देखील आहे. Cobra Force ची स्थापना 2008 मध्ये नक्षल वाद्यांचा खात्मा करण्यासाठी केली गेली होती। यांचे काम जंगलातील युद्ध लढने यांच्या युध्द करण्याच्या पद्धतीला Gorilla Tactical म्हटले जाते . नक्षलवादी जंगलात लपून बसलेले असतात त्यांना शोधून काढून ठार मारण्याचे काम हे करत असतात. कोब्रा कमांडचे चयन सीआरपीएफ मध्ये भरती झालेल्या जवानांमधून केले जाते चयन केल्यानंतर त्यांना कधी चार तर कधी नऊ महिन्याची कठीण प्रशिक्षण दिले जाते. Cobra Force चे ब्रीद वाक्य "यश किंवा मृत्यू" असे आहे. जंगलामधील होणाऱ्या युद्धात भारतातील सर्वात अननुभवी आणि सफलता पूर्वक Cobra Force आहे . Cobra Force च्या गोरिला पद्धतीने युद्ध करणे, बॉम्ब शोधणे, जंगलात कश्या प्रकारे जिवंत राहून कोणत्या प्रकारे युद्ध करायचे कौशल्य शिकविले जाते जेणे करून संकटाच्या काळात सैनिकाला कोणत्या प्रकारे युद्ध करावे हे समजले पाहिजे . Cobra Force आतापर्यंत 2 शौर्यचक्र आणि 9 वीरता पुरस्काराने सन्मानित केली गेली आहे सध्या आपल्या देशात Cobra Commando ची 10 युनिट आहेत प्रत्येक युनिट मध्ये 1300 जवानांचा समावेश केला जातो Cobra Force ची Snapper Unit भारतिय सैन्यात उत्तम श्रेणीत गणली जाते. Cobra Commandoशत्रूशी लढण्याची कला आता विदेशात पण पोहचली आहे. दर सहामहिन्यांनी Cobra Commando बाहेरील देशातील अमिरीक, रशिया, इज्राइल सैनिकांना Gorilla युद्ध प्रशिक्षण देण्यास जातात.

Indian-Army-Ghatak-Force

Ghatak Force 
Ghatak Force "भारतीय अजेय विशेष सेना" Ghatak Force भारतीय पायदळ सेनेचा एक भाग आहे. जी भारतीय सैन्यात प्रत्येक पायदळ बटालियनमध्ये उपस्थित आहे. घातक हा हिंदी शब्द आहे ज्याचा अर्थ "Killar" किंवा "प्राणघातक" आहे. Ghatak Force हे नाव जनरल बिपिनचंद्र जोशी यांनी त्यांना दिले. Ghatak Force यांची 20 जणांची फलटण असते त्याचेकाम आहे शत्रूला चकवा देणे आणि शत्रूवर हल्ला करणे. हे पायदळ सेनेच्या एक पाऊल पुढे काम करते जेणे करून सेनेला येणाऱ्या धोक्यापासून आधीच सूचना देता येईल हे मोठमोठ्या शस्त्रांनी सुसज्य होऊन शत्रूच्या भागात धाडी मारत जातात आणि दूरवरून शत्रूवर सुद्धा वार करण्याची क्षमता यांच्यात असते. कारगिल सारख्या युद्धात यांचा सहयोग होता. याचे प्रशिक्षण फार कठीण आणि भयानक असते याना पर्वतारोहन आणि 50 ते 60 किमी पर्यंत जलद पद्धतीने चालण्याची ट्रेनींग दिली जाते याना शस्त्रस्तासोबत आणि पाठीवर २० किलो भारी वजन देऊन मैलो चालवले जाते यामुळे हे शारीरिक पणे खूप मजबूत असतात.
Indian-Army-Para-commando-force

Para commando force 
Para commando force भारतातील यशस्वी फोर्स पैकी एक आहे. Para commando ची स्थापना 1966 मध्ये भारतीय सेन्याने केली  होती. Para commando फक्त जमिनीवर नाहीतर हवेतून सुद्धा युद्धात पारंगत आहे. Para commando Parachute च्या माध्यमातून शत्रूच्या आतल्या भागात जाऊन कारवाही करण्यात हातखंडा आहे पॅरा Para commando हल्लीच्या काळात बरेच वेळा ऐकले गेले पाकिस्तान मध्ये काश्मीरच्या उरी मधील Surgical Strike मध्ये पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांचे केंद्र उध्वस्त केले. Para commando हे आतंकवादी संघटनेशी लढण्यात, बंदी केलेल्या नागरिकांना सोडवण्यामध्ये माहीर आहे Para commando भारताची सर्वात पहिली आणि सर्वात जुनी रेजिमेंट आहे. Para commando प्रशिक्षण जवळजवळ 3 वर्षा पर्यंत चालते याचे प्रशिक्षण भयंकर कठीण स्वरूपाचे असते. भारत-पाकिस्तान युद्धामध्ये Para commando प्रथम तैनात करण्यात आले होते, ज्यात जम्मू-कश्मीरच्या पुंछमधील मांधोळ येथे 9 Para commando ने भारी तोफा बॅटरी हस्तगत केली होती. Para commando ने 1971 आणि 1999 मध्ये झालेल्या युद्धात आपले मोठे योगदान दिले होते. 

Indian-Army-Force-One

Force One 
Force One महाराष्ट्र सरकारची मुंबई महानगर क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक खास Counter Terrarium Unit आहे. जे राष्ट्रीय सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले जगातील सर्वात मोठे महानगरा मध्ये आहे. 2000 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या अंतर्गत Force One ची स्थापना करण्यात आली. Force One ची भरती महाराष्ट्र पोलिसांकडून यापूर्वीच उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या तरुण स्वयंसेवकांमध्ये घेतली जाते. जगात सर्वात तीव्र गतीने काम करणारी टीम आहे जी फक्त 15 मिनिटात आपल्या सर्व शास्त्रसाहित्या सहित तयार होते याना NSG आणि Israel च्या Special Commando मार्फत प्रशिक्षण दिले जाते स्फोटकाचे निरीक्षण, अचूक लक्ष भेदून वार करणे या कौशल्याने याना इतरांपेक्षा वेगळं बनवते. मुंबईतील कोणत्याही प्रकारच्या आतंकी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास हे सक्षम आहेत. यांच्या भरतीच्या वेळी 3000 पर्यंत निवेदन आले होते पण यातील फक्त 216 चे चयन केले गेले.

वैगवेगळ्या प्रकारचे सैन्यदल आपल्या भारत देशात कार्यरत आहेत अश्या सर्वात भयानक Special Forces आणि हे commando आपल्या देशाच्या सेवेसाठी कायम सतर्क असतात. यांच्यामुळेच आपण आपल्या देशात सुरक्षित आहोत. एक सैनिक होणे काही साधं काम नाही कठीण मेहनत आणि परिश्रम करून शरीर मोडेपर्यंत सराव करणे तसेच मनावर मानसिक दबाव असताना देखील दिलेली जबाबदारी अखेरच्या श्वासापर्यंत पूर्ण करण्याची तयारी ठेवणे. हे करत असताना हसत हसत आपले सर्वकाही अर्पण करणाऱ्यांना या जाबाज योध्याना शतशत नमन आहे. हि खूप निराशाजनक बाब आहे कि आपल्याला आपल्या देशातील Special Force तसेच सैन्यदलाबद्दल फारसे काही जास्त माहित नाही किंवा ते जाणून घेण्यासाठी आपण किती उसूक्त आहोत ते प्रत्येकाने आपणच ठरवावे. आपल्याला आपल्या भारत देशातील सर्व सैन्यदलाचे आभार मानायला हवे ज्याच्यामुळे आपण सुरक्षित आहोत आणि हे सांगावे लागताकामा नये.  यासाठी आपण आपल्या देशप्रेमाची ज्योत प्रत्येकांच्या मनामनामध्ये प्रज्वलित केली पाहिजे आताच्या पिढीकडून पुढच्या पिढीला मार्गदर्शन करून देशाबद्दल आणि देशासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या सैन्यदलाचे महत्व किती अनमोल आहे हे पटवून देता आले पाहिजे. हि सुद्धा एक देशसेवा मानून आपल्या देशाच्या प्रति आपले देशावरील प्रेम व्यक्त करता आले पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक आहोत हे छातीठोक पणे अभिमानाने सांगू शकतो कि भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे.

जय हिंद !!

धन्यवाद !! 

लेखन: अर्जुन ना वालावलकर

The Indian Army-1

 The Indian Army

The-Indian-Army-1

कोणत्याही देशासाठी त्याची सेना हि त्याची मोठी ताकत असते. भारत आपल्या शेजारील देशापासून नेहमीच आतंकवादी समस्याशी संघर्ष करीत आलेला आहे. जगातील सातव्या  सर्वात मोठ्या देशाची सुरक्षा करणे आपल्या बहादूर सैनिका शिवाय  शक्य  नाही. आपल्या देशातील बरेच नागरिक Hollywood Movie पाहून म्हणतात कि आपल्या देशाची Special Commando Force अमेरिका मारिन, नेव्ही सील कमांडो सारखी कधी होणार. तुम्हाला हे माहित झाल्यावर आश्चर्य चकित व्हाल कि काही भारतीय Special Commando Force चा मान अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जर्मनी, आणि इस्रायली सेने पेक्षा मोठा आहे.

सर्वसाधारण भारतीयांना आपल्या देशाचे सैनिक म्हणजे Indian Army, Indian navy, आणि Indian Air Force, इतकेच माहित आहे. खूप कमी लोकांना Special Commando Force याबद्दल माहित असेल. आज आपण जाणून घेऊया आपल्या भारतातील सैनिकांच्या इतर Commando Force बद्दल Indian Army जगातल्या मोठ्या Army पैकी एक आहे. भारतीय सेन्यदल इतके मोठे आहे कि ते बऱ्याच Regiment आणि Battalion मध्ये विभागले गेले आहे. आपण सर्वप्रथम स्वतंत्र काळाच्या आधीच्या काही Regiment आणि Battalion बद्दलची माहिती पाहूया.

 राजपूतन रायफल - राजपूतन रेजिमेंट Rajput Regiment

Indian_Army-Rajput_regiment

Rajput Regiment 1775 मध्ये बनविण्यात आली होती. या रेजिमेंटचे उद्धिष्ट "वीर भजो वसुंधरा" आहे. युद्धाच्यावेळी याचे घोषवाक्य "राजा रामचंद्र कि जय" आहे. हि Battalion "Infantry Regiment" पद्धतीची आहे. आणि याचे २३ Battalion आहेत. राजपुताना रायफल देशाची सर्वात जुनी आणि सन्मानित Battalion पैकी एक आहे. ही Regiment पाकिस्तान बरोबर युद्ध करण्यात पारंगत असल्याचं समजले जाते. या Regiment ने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धा मध्ये जवळजवळ 30 हजार योध्यांनी आपले बलिदान दिले होते. राजपुतान रायफल मध्ये 40% पेक्षा जास्त सैनिक राजस्थान, पंजाब, हरियाणा, येथील आहेत. दिल्ली मध्ये राजपुताना रायफलचे एक संग्रालय बनविलेला आहे त्यामध्ये त्याचा पूर्ण इतिहास दिला गेला आहे.

जाट रेजिमेंट Jat Regiment Indian Army

Jat-Regiment-Indian-Army

Jat Regiment ची स्थापना 1795  मध्ये केली गेली होती ज्याचे उद्धिष्ट होते "युनिटी आणि वेलर्स" आहे. युद्धाच्यावेळी याचे घोषवाक्य "जाट बलवान जय भगवान" या Regiment केंद्र उत्तरप्रदेशच्या  बरेली मध्ये आहे. याचे 23 Battalion आहेत. हि भारतीय सेनेची "Infantry Regiment" आहे. हि देशातील 200 वर्ष पेक्षा जुनी पदक प्राप्त करणारी Regiment आहे या Regiment पहिले आणि दुसऱ्या महायुद्ध मध्ये आपले योगदान दिले आहे. Jat Regiment मध्ये मुख्यता उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली जाट सामाज्याची संख्या आहे. Jat Regiment हे  एक असे Regiment आहे त्यामध्ये पूर्ण पाने 100% फक्त जाट समाजाचे सैनिक असतात. याचे कारण जाट सैनिकाचे सूत त्याने भरले पाहिजे बाकी कोणत्याही जातीचे असे Regiment नाही. Jat Regiment  कडे 2 अशोक चक्र, 35 शौर्य चक्र, 10 महावीर चक्र, आणि 2 व्हिक्टरीया क्रोस, जोतं संम्मान आणि 8 कीर्ती चक्र, 39 वीरचक्र, आणि 170 सैनिक पदक आहेत. हि रेजिमेंट जाट समाजांची. आपल्या कर्तव्याने, पुरस्काराने प्रसिद्ध आहे.

शीख रेजिमेंट Sikh Regiment Indian Army

Sikh-Regiment-Indian-Army
Sikh Regiment शत्रूचा नाश करण्यासाठी या Regiment चे फक्त नावाचं पुरेस  आहे. या Regiment ची स्थापना इंग्रजांनी १८४६ मध्ये केली होती. Sikh Regiment चे 19 Battalion आहेत. Sikh Regiment ने कारगिल युद्धाच्या वेळेला Tiger Hill वर आपला कब्जा केला होता Sikh Regiment ने देशाला अडचणीच्या वेळेला युद्धामध्ये आपले पूर्ण योगदान दिले  आहे. Sikh Regiment भारतातील सर्वात खतरनाक  सेना आहे. या सेनेने पहिले आणि दुसऱ्या महायुद्ध मध्ये इंग्रजान सोबत युद्धात भाग घेतला होता.

 प्याराशुट रेजिमेंट Parachute Regiment Indian Army

Parachute-Regiment-Indian_Army
Parachute Regiment ची स्थापना स्वतन्रच्या पूर्वी १९४१ मध्ये केली गेली होती. हि Regiment देशातील बाकी सर्व Regiment ना आणि बाकी सर्व Battalion ना सर्व हवाई सुविधा प्रधान करते. भारताच्या कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी, आणीबाणीच्या वेळी वादळ, भूकंप, आतंकवाद्यांकडून घडविलेला घातपातच्या ठिकाणीअतिदुर्गम भागात आवश्यकतेच्या वेळी Parachute Regiment ला पाचारण केले जाते. हे एकमात्र असे Regiment  आहे जे Air Force प्रमाणे काम करते. म्यानमारच्या ठिकाणाहून काही आतंकवादी भारतात घातपात घडविण्यासाठी येणार होते पण Parachute Regiment ने त्याचा अश्या प्रकारे खात्मा केला की  त्यांना Parachute Regiment येण्याची चाहूल पण लागू दिली नाही. हे Parachute Regiment अश्या प्रकारे काम करते.

 गोरख रेजिमेंट Gurkha Regiment Indian Army

Gurkha-Regiment-Indian-Army
Gurkha Regiment ची स्थापना १८५० मध्ये झाली होती. Gurkha Regiment ची हे एक असे Regiment आहे जे मृत्यूला घाबरत नाही. कुण्या एका महापुरुषांनी सांगितले आहे कि जेव्हा कोण म्हणत असेल कि मी मृत्यूला घाबरत नाही तर समजावं एक तर तो खोट बोलत आहे किंवा तो गोरख आहे. Regiment च्या सैनिक जेव्हा शस्त्र उचलतो तेव्हा त्याच्या समोरील व्यक्ती नतमस्तक होऊन जातो. Gurkha Regiment बलिदानाचे दुसरे नाव आहे. यांच्या बळावर इंग्रजांनी हिटलर बरोबर युद्ध केले. हिटलर या सेन्यावर इतका प्रभावित झाला कि या सैन्याला घेऊन मी पूर्ण जग जिकंण्याचा मनसुबा होता. Gurkha Regiment मधील अधिकतर सैनिक नेपाळ मधून आले आहेत. गोरख हे कोणत्या जातीचे नाव नाही तर ते एका शहराचे नाव आहेगोरख सेना हि भारतात, नेपाळ आणि ब्रिटीश आर्मी मध्ये सुद्धा आहे.
वैगवेगळ्या प्रकारचे सैन्यदल आपल्या भारत देशात कार्यरत आहेत अश्या सर्वात भयानक Special Forces आणि हे commando आपल्या देशाच्या सेवेसाठी कायम सतर्क असतात. यांच्यामुळेच आपण आपल्या देशात सुरक्षित आहोत. एक सैनिक होणे काही साधं काम नाही कठीण मेहनत आणि परिश्रम करून शरीर मोडेपर्यंत सराव करणे तसेच मनावर मानसिक दबाव असताना देखील दिलेली जबाबदारी अखेरच्या श्वासापर्यंत पूर्ण करण्याची तयारी ठेवणे. हे करत असताना हसत हसत आपले सर्वकाही अर्पण करणाऱ्यांना या जाबाज योध्याना शतशत नमन आहे. हि खूप निराशाजनक बाब आहे कि आपल्याला आपल्या देशातील Special Force तसेच सैन्यदलाबद्दल फारसे काही जास्त माहित नाही किंवा ते जाणून घेण्यासाठी आपण किती उसूक्त आहोत ते प्रत्येकाने आपणच ठरवावे. आपल्याला आपल्या भारत देशातील सर्व सैन्यदलाचे आभार मानायला हवे ज्याच्यामुळे आपण सुरक्षित आहोत आणि हे सांगावे लागताकामा नये.  यासाठी आपण आपल्या देशप्रेमाची ज्योत प्रत्येकांच्या मनामनामध्ये प्रज्वलित केली पाहिजे आताच्या पिढीकडून पुढच्या पिढीला मार्गदर्शन करून देशाबद्दल आणि देशासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या सैन्यदलाचे महत्व किती अनमोल आहे हे पटवून देता आले पाहिजे. हि सुद्धा एक देशसेवा मानून आपल्या देशाच्या प्रति आपले देशावरील प्रेम व्यक्त करता आले पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक आहोत हे छातीठोक पणे अभिमानाने सांगू शकतो कि भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे.
जय हिंद !!


धन्यवाद !! 

लेखन: अर्जुन ना वालावलकर