Maratha Light Infantry Regiment

Maratha Light Infantry Regiment

Maratha-Light-Infantry-Regiment-A3
मराठा आणि रेजिमेंट 
रेजिमेंट म्हणजे काय आणि तीची स्थापना व त्याची कारणे
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे महत्व काय आहे.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट जवानांची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म 
मराठा रेजिमेंटच्या जवानांचे युध्दातील योगदान 
मराठा रेजिमेंटच्या जवानांना मिळालेला युध्द सन्मान 
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंचे प्रशिक्षण केंद्र आणि इतिहास 
मराठा रेजिमेंट चे घोषवाक्य कोणते, ते कुणी व कधी दिले.

Maratha-Light-Infantry-Regiment-5

मराठा आणि रेजिमेंट 

मराठ्यांचं नाव घेताच आपल्याला आठवतात ते श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा अस्मर्णीय, असाधारण स्वराज्यासाठी केलेल्या पराक्रमाचा इतिहास. शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा वारसा जपणाऱ्या मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंटचा ज्यांनी जगाला आपली ताकत दाखवून दिली.

जो मरणाला घाबरत नाहीत तो मराठा, जो कोणासमोरही नजर झुकवत नाही तो मराठा, ज्यांची स्वारीच्या बातमीने शत्रूच्या गोटात घबराट पसरते तो मराठा, ज्याच्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात स्वराजाचा भगवा झेंडा रोवला तो मराठा, ज्यांनी हिंदुस्थानातून अटक पासून ते कटक पर्यंत भगवा फडकावला तो मराठा. शौर्य, जिद्द, बहादुरी, बेधडक आक्रमण,चतुराई , चपळाई, गनिमीकावा, या सर्व गोष्टीच संमिश्र रसायन म्हणजे मराठा.

मराठा यांच्या पराक्रमाच्या अनेक गाथा आहेत आणि प्रत्येक घटना पेरणादायी आणि स्फुर्तीदायी आहे. महाराज्यांच्या स्वराज्याच्या काळापासून ते पेशवाई संपुष्टात येई पर्यंत मराठा मावळ्यांचा एक ज्वलंत इतिहास आपल्याला पाहायला मिळतो नंतर ब्रिटिशांनी जसजसे हिंदुस्थानावर आपली पकड मजबूत करीत गेले आणि पूर्ण हिंदुस्थानाला आपले गुलाम बनविले हे उघड सत्य असले तरी आपल्या देशात येऊन त्यांनी आपल्याच माणसांना हाती घेऊन आपल्यावर राज्य केले हे सत्य सुद्धा आपण नाकारू शकत नाही. इथे सुद्धा मराठ्यांनी आपला पराक्रम आणि युद्धातील शौर्य दाखवण्यात कधी मागे हटले नाहीत. 



मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंटची ही गाथा भारतीय सैनिकांची, ही गाथा जवानांच्या शौर्याची, ही गाथा आपल्या धरणी मातेच्या वीरांची, ही गाथा देशासाठी दिलेल्या बलिदानाची, ही गाथा त्यागाची, ही गाथा जीवावर उदार होऊन लढणाऱ्यांची, ही गाथा शत्रूला भुईचीत करून पळवून लावणाऱ्या मर्द मराठयांची, ही गाथा देशसेवेच्या व्रताची, ही गाथा सर्वस्व समर्पणाची, ही गाथा मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंटची.

अडीशे पेक्षा जास्त वर्षाचा वारसा लाभलेल्या या मराठा लाईट इंफ्रन्टरीची इतिहासाची पाने आज आपण उलगडणार आहोत. सैनिकांच्या शौर्याला इतिहास असतो हा इतिहास असतो ज्वलंत आणि देदीप्यमान. “गनिमाच्या देखती फोजा रनशूरांच्या फुरफुरती भुजा" असा एक इतिहास मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंटला लाभला आहे.

जेव्हा तुम्हीं घरी परत जाल तेव्हा त्यांना आमच्या बद्दल सांगा, “त्यांच्या भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान दिला आहे”. इंग्लिश कवी जॉन मॅक्सवेल एडव्हेंटच्या या ओळी कोहिमा इथल्या स्मारकावर आजही पाहायला मिळतात. खरंच असाच वर्तमान भारतीय जवानांनी आपल्याला दिलाय त्यापैकी शूर वीरांची रेजिमेंट म्हणजे मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट.

रेजिमेंट म्हणजे काय आणि तीची स्थापना व त्याची कारणे

हिंदुस्थानात प्राचीन काळापासून सेनापती पध्दत चालत आलेली आहे. सतराव्या शतकापासूनच ब्रिटिशांचे हिंदस्थानात व्यापार निम्मित येऊन इथेच स्थिर होण्याचा आणि हिंदुस्थानावर राज्य करण्याचा निर्णय पक्का झाला तेव्हापासूनच त्यांनी त्या काळातील आधुनिक आणि पद्धतशीर पणे सैन्याचा विकास केला. मुळातच स्वतःहा ब्रिटिश थोड्याच प्रमाणात हिंदुस्तानात आले होते त्यामुळे त्याचे स्वतःचे सैनिक फार कमी प्रमाणात होते तरीसुद्धा त्यांनी आपल्या सैन्याचा विकास स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देऊन आपला फोज फाटा वाढवून ताकदवर बनले होते.व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानात आलेले ब्रिटिश, पोर्तुगीस, फ़्रेंच, स्पॅनिश यांनी हिंदुस्थानातील मातीचा, हिंदुस्थानातील लोकांचा, समाजाचा, चालीरीती, येथील पर्यावरणाचा, भौगोलिक परिस्थितीचा आणि येथे उपलबध असलेल्या संसाधनांचा बारकाईने अभ्यास केलेला होता त्यामुळे त्यांना हिंदुस्थानावर आपली पकड बळकट करण्यास मदत झाली ज्या प्रांतातील राज्य त्याचे अधिपत्य स्वीकारून ब्रिटिशांत विलीन झाली तिथल्या सैन्याला त्यांनी आपल्या पद्धतीने तयार केले. वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांची वेगवेगळी युद्धनीती आणि त्याची बहादुरी पाहून इंग्रजांनी त्या प्रांता प्रमाणे सैन्य दलाची निर्मिती सुरु केली त्यामध्ये तेथीलच स्थानिक लोकांना सामील करून घेतले. आणि अश्या प्रकारच्या केल्या गेलेल्या सैनिक समूहाला किंवा याच सैन्य दलांना रेजिमेंट म्हणतात.





इंग्रजांन द्वारे मराठा रेजिमेंटचे गठण होणे यासाठी महत्वाचे कारण होते ते म्हणजे मराठ्यांचा इतिहास त्याचे शौर्य फारच जवळून पहिले होते. मराठे संख्या बाळांनी जरी कमी असले तरी त्याची युद्ध नीती, गनिमाची कावा, छापेमारी युद्ध शैली, वेळेच्या आधीच पोहोचून शत्रूला वाटेतच परायचीत करणे आणि नैसर्गिक उत्पादनाचा आणि वातावरणाचा उपयोग करून शत्रूवर मात करणे यात मराठ्यांचा हातखंडा होता. हे सर्व ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य घडताना उध्ड्या डोळ्यांनी पहिले होते. त्यामुळे ब्रिटिशांनी मराठा रेजिमेंटचे गठण केले.



स न ४ फेब्रुवारी १७६८ ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई मध्ये आपल्या वखारींची सुरक्षितते साठी मराठ्यांचा काटक पणा आणि गनिमी काव्याने लढण्याचे गुण हेरून ब्रिटीशानी मराठ्याची निवड करून बॉम्बे सीबॉय या नावाची एक बटालियन उभारलेली होती. मराठा सेना आणि नोसेना दोन्ही बॉम्बे" सीबॉय" ची दुसरी बटालियन बनली हिला "जंगी पलटण" या नावाने ओळखले जाऊ लागले त्यात बहुसंख्य सैनिक हे मराठा होते आणि मराठ्यांची दुसरी फलटण बॉम्बे सीबॉयच्या अंतर्गत तिसरी बटालियन १७६८ मध्ये स्थापित केली गेली तिला नाव दिले गेले "काली पाचवी". अठराव्या शतकात सुध्दा काही बटालियन स्थापन करण्यात आल्या त्यांनी कहून, बलूच, अभेस्मिया मध्ये आपला पराक्रम दाखविला १८२४ मध्ये बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रंट्री हि बटालियन स्थापित केली गेली, १९२२ नंतर पुढे मराठा लाईट इंफ्रन्टरी रेजिमेंट पहिल्या आणि दुसऱ्या विश्वयुद्धात आपले पराक्रमाचे प्रदर्शन केले आणि ब्रिटिश काळात दिल्या जाणाऱ्या युध्द सन्माना साठी पात्र ठरले. १९४७ मध्ये देशाला स्वातांत्र्य मिळाल्या नंतर या बटालियनला मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट यानावाने ओळखू जाऊ लागले. जी आज २१ बटालियन मजबूत आहेत.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे महत्व काय आहे.

मराठा रेजिमेंट एक प्रकारची लाईट इन्फेन्ट्री आहे. लाईट म्हणजे प्रकाश व इन्फेन्ट्री म्हणजे पायदळसेना. जसे लाईट इन्फेन्ट्री म्हणजे प्रकाशाच्या गतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर न थकता चालतच प्रवास करणारी सेना. स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा मराठा रेजिमेंटने सैन्यदलात राहवून शौर्याला नवीन आकार देण्याचे थांबिवले नाही. स्वतंत्र तर पूर्ण भारताला मिळाले पण गोव्यामध्ये पोर्तुगीज आपला हक्क जमवून बसले होते तेव्हा भारतीय सैन्याच्या आदेशाने मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट च्या जवानांनी बेळगावव पासून ते गोवा ११० किलोमीटरचे अंतर वेंगुर्ल्या मार्गे पायी प्रवास करून गेले आणि पोर्तुगीजांवर आक्रमण करून गोव्याला स्वतंत्र मिळवून दिले आणि इतकेच नाही तर गोव्याच्या सोबत दमण आणि द्विपला पण स्वतंत्र भारतामध्ये मिळवून घेतले.

आज हि रेजिमेंट देशाची सुरक्षा आणि रेजिमेंटचा सन्मान राखुन येणाऱ्या पुढील पिढीला प्रेरणा स्वरूप बनली आहे. स्वातंत्र्यानंतर देखील 'एम एल आय' ने आपली युद्धनीती कायम ठेवत देशाच्या सीमांचे रक्षण प्राणपणाने केले आहे. शिवरायांच्या युध्द नीतीतील एक “गनिमी कावा” ही पध्दत या रेजिमेंट ने आजही तेवढ्याच तडफेने जपत आपल्या समोर येणाऱ्या दुश्मनांचा पाडाव करण्याचा पायंडा कायम ठेवला आहे. म्हणून तर काश्मीर असो , सिक्कीम , अरुणाचल प्रदेश , मणिपूर नागालँड , किंवा देशाची कुठलीही सीमा असो मराठा लाईट इन्फन्ट्री छातीचा कोट पुढे करून देशरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट जवानांची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म



आपण भारतीय सैन्याला वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागून अंदाज लावू शकत नाही कि कोणते सैन्यदल जास्त ताकतीचे आहे किंवा कोण सर्वात श्रेष्ठ आहे आणि आपल्याला तसा विचार सुद्धा नाही केला पाहिजे. कारण आपल्या भारतीय सैन्यातील प्रत्येक जवान शौर्याने परिपूर्ण आहे पण जेव्हा मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट बद्दल बोलायला लागतो तेव्हा त्याच्या शौर्याच्या गाथा ऐकतानाच डोळ्यासमोर पूर्ण इतिहास जिवंत होऊन उभा राहतो रक्त सळसळू लागत अंगात स्फूर्ती निर्माण होऊन छाती फुलून येते मन एक चित्त होऊन वाचण्यात आणि ऐकण्यात दंग होऊन जाते.

इंग्रजांन द्वारे मराठा रेजिमेंटचे गठण होणे यासाठी महत्वाचे कारण होते ते म्हणजे मराठ्यांचा इतिहास त्याचे शौर्य फारच जवळून पहिले होते. मराठे संख्या बाळांनी जरी कमी असले तरी त्याची युद्ध नीती, गनिमाची कावा, छापेमारी युद्ध शैली, वेळेच्या आधीच पोहोचून शत्रूला वाटेतच परायचीत करणे आणि नैसर्गिक उत्पादनाचा आणि वातावरणाचा उपयोग करून शत्रूवर मात करणे यात मराठ्यांचा हातखंडा होता. हे सर्व ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य घडताना उध्ड्या डोळ्यांनी पहिले होते. त्यामुळे ब्रिटिशांनी मराठा रेजिमेंटचे गठण केले.

सुरुवातीच्या काळात त्यांना बॉम्बे सिपॉय या नावाने ओळखले जात होते. आणि इंग्रज हे स्वतः मनात होते की मराठा रेजिमेंटचे गठण केल्यापासून दुसऱ्या महायुध्दा पर्यंत ब्रिटिशांचे पारडे भारी होते सतराव्या शतक पासून ते अठराव्या शतक पर्यंत अंतर्गत युध्दासाठी मराठा रेजिमेंटलाच पाठविले जात होते.



मराठा रेजिमेंटच्या जवानांचे युध्दातील योगदान

१८६८ मध्ये अभेसिनीओच्या थियोडीयो राजा विरूध्द लढाई साठी पहिल्यांदा या बटालियने देश बाहेर आफ्रिकेत ४५० किमी चालत प्रवास करून युद्ध केले आणि तेथिल किल्ला काबीज केला. त्याहून हि आधी मराठा बटालियने बलुचिस्तानमध्ये काहूल च्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता विशेषता काली पाच या बटालियननं त्याच्या दाखवलेल्या शौर्य मुळे त्याच्या झेंड्यावर काहून लिहिल गेलं होत इतकाच नाही तर पुणे कंटेंट मध्ये एका रस्त्याला काहून असे नाव देण्यात आल. 

मराठ्याची बहादुरी पाहून इंग्रजांनी आफ्रिका, चीन, अफगाण, आणि युरोप देशांमधील युध्दांसाठी मराठा जवानांना पाठवण्याचे सुरु केले होते. १९१४ मध्ये मराठा इन्फेन्ट्री ला पहिल्या महायुध्दातील एक भयंकर महायुद्धाला सामोरे जावं लागल पर्शियन गल्फ मध्ये टायग्रिस नदीच्या काठावर कूट इथं तीन दिवसाच्या लढाई नंतर तुर्की सैन्य शहर बाहेर फेकलं गेल मात्र तुर्की सेनानी कूट शहराला पुन्हा वेढा दिला त्यावेळी हजारो मराठा आणि ब्रिटिश सैनिक मारले गेले शंभरहून अधिक दिवस उपासमार करून मराठ्यांनी लढाई केली तरीही पुढे १९१८ साली तुर्कांचा पराभव मराठा बटालियन केला. नंतर या बटालियननं अफगाणिस्थानच्या आक्रमणाला तोंड दिल आणि त्यात हि पराक्रम गाजविला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात सुद्धा मराठा लाईट इन्फन्ट्री ने निर्णायक भूमिका निभावली होती. 'बॅटल ऑफ शरकत' च्या लढाईने तर पहिलं महायुद्ध संपवलं होतं. दुसऱ्या महायुद्धातही तश्या अनेक पराक्रमांचे विक्रम केले गेले.





१७५८ मध्ये ज्यामराठ्यांनी अटक पर्यंत भगवा फडकावला तोच पराक्रम १९६५ मध्ये भारत पाकिस्तान च्या युद्धात पुन्हा पाहायला मिळाले वाघा बॉर्डर पार करून मराठा रेजिमेंटच्या जवानांनी पाकिस्तान च्या काही भागात आपला कब्जा जमविला. १९७१ च्या युध्दामध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मराठा रेजिमेंटच्या जवानांनी आपले फार मोठे योगदान दिले. मराठा रेजिमेंटच्या 22 व्या तुकडीचे नेतृत्व करणारे संभाजी पाटील यांनी साहस आणि पराक्रम दाखवून बांग्लादेशच्या ढाक्कावर आपला कब्जा मिळविला होता. भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये मराठा रेजिमेंटच्या बटालियनचे कार्यरत आहेत. मुंबईच्या २६/११ च्या आतंकवादी हमल्यामध्ये प्रतिउत्तर देण्यासाठी आलेल्या जवानांमध्ये सुध्दा मराठा रेजिमेंटचे जवान होते. एवढाच नाहीतर सर्जिकल स्टायक मध्ये सुध्दा जवानांनी आपली कामगिरी बजावली होती. 

दुसऱ्या महायुद्धात रोमेलच आक्रमण रोखण्यासाठी नाईलच्या खोऱ्यात मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करण्यात आली त्यात इराक मधून एक मराठा तर सायप्रसमधून तीन मराठा बटालियनस आणल्या गेल्या दुर्दैवाने अनेक मराठा सैनिक जर्मन सैनिकांच्या ताब्यात सापडल्यानं ते युध्द कैदी झाले ज्या प्रमाणे हा इतिहास जवानांचा आहे त्याप्रमाणे युद्ध कैद्यांचा सुद्धा आहे तो अधिक मनाला हेलावणारा आहे. या युद्धकैद्यांना ब्रुन्सवीक इथे ठेवण्यात आल त्याची साक्ष म्हणजे कर्नल बोल्टर यांनी मराठा बटालियनचे कॅप्टन बाबुराव दिनकर मोहिते यांचे खडूणी रेखाटलेल चित्र, हे चित्र आजही बेळगावच्या संग्रहालयात पाहावयास मिळते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सैन्यदलात बरेच बदल झाले सॊस्थान खाली झाल्या मुळे त्यांच्या बटालियन विलीन झाल्या पण मराठा इन्फेन्ट्री रेजिमेंट कायम राहिली. आज या रेजिमेनीच्या एकूण सवीस बटालियन आहेत. २० रेगुलर बटालियन, ४ राष्ट्रीय रायफल, गॉन प्रादेशिक सेना कार्यरत आहेत.

मराठा रेजिमेंटच्या जवानांना मिळालेला युध्द सन्मान

मराठा रेजिमेंट त्या काही रेजिमेंट पैकी एक आहे ज्यांच्या दोन जवानांना व्हिक्टोरिया क्रॉस देऊन सन्मानित करण्यात आले होते. व्हिक्टोरिया क्रॉस हा ब्रिटन मधील सर्वात मोठा नागरिक आणि सैन्य सम्मान आहे. १९४५ मध्ये ज्याना हा सम्मान दिला गेला होता त्यांच नाव होत नामदेव जाधव आणि कमांडर यशवंत घाडगे आपल्या मातृभूमीपासून दूर जर्मनी मध्ये पराक्रम दाखवणारे मराठा रेजिमेंटच्या या दोन जवानाने आपल्या रेजिमेंटच्या संम्मानात भर घातली.



यशवंत घाडगे : इटली मध्ये जर्मन सैनिकाच्या एका पोस्टवर मराठा बटालियनच्या एका कंपनीनं हल्ला केला या कंपनीच्या रायफल सेक्शनचे कमांडर यशवंत घाडगे होते त्याच वेळी जर्मन सैनिकांनी तुफान गोळीबार सुरु केला त्यामुळे आपले साथीदार मारले जात असताना पाहून घाडगे यांनी ग्रॅनाईट फेकून शत्रूचे पोस्ट उध्वस्त केले. हातगाईच्या लढाईत ते जर्मन सेनेच्या फारच जवळ पोहोचले होते त्याच्या टॉमी गन मधल्या गोळ्याही संपल्या होत्या शेवटी त्याच टॉमी गनच्या दस्त्याने त्यांनी शत्रूला आस्मान दाखवल. तेव्हढ्यात शत्रूच्या गोळीनं रायगड जिल्ह्यातल्या पळस गावचा बहादर मराठा जवानांचा वेध घेतला त्याच्या इटलीमधील युद्धात असामान्य पराक्रमाबद्दल त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस देऊन सन्मान करण्यात आला. यशवंत रावांच्या वीर मरणाच्या आठवणी त्यांच्या वयोवृद्ध पत्नीने अजून जपून ठेवल्यात. 

नामदेव जाधव : ९ एफ्रील १९४५ रोजी इटली मध्ये सिनियो नदीच्या काठावर जर्मन सैन्य बरोबर झालेल्या युद्धात मराठा लाइट इन्फेन्ट्री च्या नामदेव जाधव यांनी जर्मन सैन्याचे दोन पोस्ट उध्वस्त केले शत्रूच्या हल्ल्यात मराठा बटालियनचे कंपनी कमांडर सह सर्व सैनिक मारले गेलेले असतानाही नामदेव जाधव यांनी एकट्याने जर्मन सैन्याला आस्मान दाखवून दोन पोस्टवर कब्जा मिळविला त्याच्या या धाडसाबद्दल त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस बहाल करण्यात आला.

हि पदक वैयक्तिक असली तरी यातून वाहणारा स्तोत्र मात्र निरंतर आहे. जो मराठाच्या प्रत्येक जवानांना उद्युक्त करतो निरंतर शौर्य गाजवण्यासाठी रेजिमेंटचे नाव राखण्यासाठी. बलिदानाचा आणि त्यागाचा एक अनंत प्रवाह ह्या रेजिमेंट मधून जो वाहत आहे तो आज पर्यंत कायम आहे. 

मराठा रेजिमेंटच्या जवानांनी आतापर्यंत युद्धात बरेच पराक्रम गाजवले त्याची सन्मान पदके पाहून आपल्याला याची प्रचिती येते. मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंटला आता पर्यंत मिळालेली सन्मान पदके यात २ व्हिक्टोरिया क्रॉस, ५ अशोक चक्र, २९ परम विशिष्ट सेवा मेडल, ४ महावीर चक्र, १५ कीर्तीचक्र, ३५ अतिविशिष्ट सेवा मेडल, ४४ वीर चक्र, ६४ शौर्य चक्र, ४ युध्द सेवा मेडल, ४४० सेना मेडल, १ अर्जुन अवार्ड आणि १ पदमभूषण अवार्ड इत्यादी मेडल आणि अवार्डने मराठा रेजिमेंटच्या जवानांचा सन्मान कार्यात आला आहे आणि या सर्व सन्माननी बनत आहे Most Decorated Regiment of India. DUTY-HONOUR-COURAGE ने भरलेली रेजिमेंटला शत शत प्रणाम.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंचे प्रशिक्षण केंद्र आणि इतिहास





मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट हि एक अनोखी रेजिमेंट आहे जिच्या रेजिमेंट केंद्राला सुद्धा एका बॅटल ऑनर प्रमाणे सन्मान दिला आहे. बेळगावचे हे सैनिकी प्रशिक्षण केंद्र सर्वात जुन्या पाच रेजिमेंट केंद्रा पैकी एक आहे. जे बॉम्बे प्रेसिडेंसि च्या निर्मितीच्या वेळी स्थापन केले होते आणि हे इंग्रजांच मोठ शासनिक क्षेत्र होते. ब्रिटिश काळात सुद्धा या सैन्याने आपल्या अंगभूत शिस्त आणि उपजत पराक्रमाचे झेंडे जगभर रोवले होते आणि आज हेच रेजिमेंटचे केंद्र इतिहासाची साक्ष देत मोठ्या दिमाखात उभे आहे. त्या ऐतिहासिक मराठाच्या साहसीचा, शौर्याचा, बलिदानाचा आणि पराक्रमाची गाथा घेऊन. 

दुसऱ्या महायुद्धातील मराठा रेजिमेंटचे शौर्य पाहून स्वतः इंग्रज सुद्धा चकित झाले होते. पण दुसऱ्या महायुध्दा नंतर इंग्रजांची ताकद कमी होऊ लागली होती. तेव्हा इंग्रज आपल्याच रेजिमेंटच्या सैन्याशी घाबरू लागले होते. कारण १८५७ मध्ये त्यांच्याच सैन्यातील जवानांनी विध्रोह सुरु केला होता तसे मराठयानी केला तर आपण कुठे पाळूही शकत नाही आणि देशातील स्वातंत्र्याच्या चळवळी वाढत होत्या त्यामुळे ब्रिटिश साम्राज्य तुटत चालले होते.

ब्रिटिशांच्या काळात मराठा इन्फेन्ट्री मध्ये अधिक तर मराठा जवान होते पण स्वातंत्र्याच्या नंतर आता सर्व जातीचे लोक समावेशक आहेत. मराठा इन्फेन्ट्री मध्ये भरती होण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक असतात पण प्रवेश मिळवून स्वप्न पूर्ण करणारे काही मोजकेच असतात. निवड झालेल्या उमेदवारांना बेळगावच्या प्रशिक्षण केंद्रात कठोर प्रशिक्षण दिले जाते. 

मराठा लाईट इन्फेन्ट्री भारतीय सैन्य दलाची एक आधुनिक आणि उच्च प्रशिक्षित बटालियन पैकी एक रेजिमेंट आहे. मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट साठी हि खूप मोठ्या गर्वाची गोष्ट आहे कि "श्री छत्रपती शिवाजी महाराज" त्याचे मार्गदर्शक आणि प्रेरणा स्फूर्ती आहेत. लढण्यासाठी केवळ शौर्य, हिंमत, टाकत, एवढं असून उपयोगच नाही तर त्याबरोबर आवश्यक आणि महत्वाचं असत ते आहे टेक्निक, मराठा लाईट इन्फेन्ट्रीच वार टेक्निक जगभरात नावाजलेला आहे. या मराठा लाईट इन्फेन्ट्रीचा इतिहास जगभरच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे, लिहिला गेलेला आहे आणि तो ही शौर्याचा.



मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंटच्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये जवानांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कौशल्य पणाला लावलेल असते. ३४ आठवड्याचे या कठोर प्रशिक्षणाचे दोन भाग असतात. प्रथम भाग १९ आठवड्यांचे मूलभूत प्रशिक्षण त्यामध्ये पिटी, फूडड्रिल, रायफल फायरिंग, क्रॉस कन्ट्री, बॉकसिंग, रूट मार्च १० किलोमीटर आणि २० किलोमीटर आणि द्वितीय भाग १५ आठवड्याचा ऍडव्हान्स प्रशिक्षणाचा असतो जो मूलभूत प्रशिक्षण पेक्षा काढीण असतो त्यामध्ये लाईट मशीनगनची फायरिंग, रायफलड्रिल, ३० आणि ४० किलोमीटर रूट मार्च, बॅटल ऑप्टिकल कोर्स आणि आउटडोर प्रशिक्षण असते त्या मध्ये मूलभूत प्रशिक्षण आणि शास्त्र प्रशिक्षण झाल्यानंतर फिल्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट शिकल्यानंतर बचाव आणि आक्रमण करण्याचे सराव प्रशिक्षण घेऊन प्रत्येक्षात अंमलबजावणी कशी करायची ते शिकवले जाते. 

आतंकवादी कारवाया रोकण्यासाठी त्यांच्यावर कश्या प्रकारे हमला करून विजय मिळवायचा याचे प्रशिक्षण देण्यासाठी चक्क बेळगावच्या प्रशिक्षण केंद्रा मध्ये जमूकाश्मीर मधील एक गावच उभ करण्यात आल आहे. या प्रशिक्षणात जवानांचा कान, मन, चित्त, एकाग्रत असणे महत्वाचं आहे. इथे चुकीला क्षमा नाही कारण एका चुकीची किंमत शत्रू सैन्याची बंदुकीची गोळी असते. इथला जवान अश्या कौशल्यात पारंगत व्हावा म्हणूनच अभिरूत युद्धभूमीवर जवानांना कसून घडवले जाते. नऊ महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर मराठा इन्फेन्ट्रीच्या जवानांमध्ये जे बळ येत ते हत्तीचं बळ असत म्हणूनच जगभरातील शत्रुंना या जवानांनी पाणी पाजलेला आहे. अडीशे पेक्षा वर्षाचा हा इतिहास अलीकडच्या या शहीद कुंडलीत येऊन पोहचतो. शहीदांच्या या कहाण्या इथल्या मातीच्या कणा कणा मध्ये आहेत. त्या कहाण्या आयकून कधी डोळे पाणावतात तर कधी रक्त सळसळत ते आपल देश प्रेम सीमेवर येऊन थांबत.





मराठा रेजिमेंट चे घोषवाक्य कोणते, ते कुणी व कधी दिले.

मराठा रेजिमेंटची गाथा फार मोठी आहे. "शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावा प्रताप" श्री छत्रपती शिवाजी महाराजचा जयजय करीत मराठा रेजिमेंट च्या जवानांनी मोठमोठी आव्हानांवर मात केली आहे. महाराजच नाव मराठा रेजिमेंटच्या रक्तातच आहे. म्हणूनच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मराठा रेजिमेंटच्या युद्धाच्या घोषवाक्यामध्ये आहे. या घोषवाक्याची सुद्धा एक रंजक कहाणी आहे. हे वाचून तुम्हाला आचार्य वाटेल. शिवाजी महाराज्यांच्या मावळ्यांचा पराक्रमा बद्दल ऐकल की मन अपोआपच त्या काळात जात.

आपल्या भारतीय सैन्य दलातील प्रत्येक रेजिमेंटची किंवा बटालियनची एक युद्ध ललकारी असते मग ती देशाच्या नावाने आहे तर काहींची देवाच्या नावाने आहे पण मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट हि अशी एकमेव रेजिमेंट आहे जिची युध्द ललकारी "बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय" हि आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषा बद्दल सांगायला फार अभिमान वाटतो पण ह्या जयघोषाची ललकारी मागील इतिहास पण फार मोठा रंजक आणि कौतुकास्पद आहे. ही जयघोषाची ललकारी आपल्याला स्वातंत्र्या नंतर मिळालेली नाही तर ती स्वातंत्र्याच्या पूर्वी मिळालेली आहे आणि ती ललकारी आपल्या देशात मिळालेली नाही तर ती आफ्रीकेतील सुधान मध्ये मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे ती ललकारी कुणी भारतीयाने दिलेली नाही किंवा सुचविलेली नाही ती दिली आहे एका ब्रिटिश अधिकारी बुमगार्ड याने. 

इ.स. १९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे. या प्रांतात उंच उंच डोंगरदऱ्यांच्या रांगा आहेत. या डोंगर रांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक". हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंटचे सैनिक लढत होते. पण बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता. तेव्हा मराठा रेजिमेंटमध्ये 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते त्यांनी ब्रिटिशांना अस सुचविल की आम्हाला आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजच नाव घेऊन युद्ध करण्याची परवानगी द्या, तुम्हाला हा किल्ला आम्ही सर करून दाखवतो. हे ऐकून ब्रिटिश सरकारने प्रथम नकार दर्शविला कारण हेच मराठे हाच जयघोष करून उलट आपल्यावर पण आक्रमण करू शकतात किंवा विद्रोह करू शकतात असा विचार त्याच्या मनात आला, पण वेळ निघून जात चालली होती आणि किल्ला हाती घेणे महत्वाचे होते त्यामुळे आपल्या स्वार्थापोटी नाईलाजाने ब्रिटिशाना मराठा रेजिमेंटच्या सैनिकांना परवानगी द्यावी लागली. मग काय मराठा रेजिमेंटच्या जवानांनी "बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी ललकारी देत मोठ्या जोशात आणि स्फूर्तीने एका रात्रीतच किल्ला सर केला आणि ब्रिटिशाना विजय मिळवून दिला. अस हे सर्व घडत असताना ब्रिटिश सैन्यातील एक अधिकारी बुमगार्ड याचे यासर्व घटनानकडे बारकाईने लक्ष दिला होता. आणि मराठा सैनिकाचे पराक्रम आणि शौर्य पाहून त्याच्या असे लक्ष्यात आले कि हे मराठा रेजिमेंटचे सैनिक जेव्हा असा जयघोष करतात तेव्हा त्यांच्या अंगामध्ये शंभर बैलाचं बळ येत रक्त सळसळून येते त्याच्यात एक प्रकारे वीरश्री संचारते आणि शत्रूवर तुटून पडतात ते शत्रूचा नायनाट करूनच टाकतात. जर असाच जोश त्याच्या मध्ये कायम राहिला तर आपल्याला विजया पासून कोणी रोकु शकत नाही. तेव्हा पासून हा महाराजांचा जयघोष मराठा रेजिमेंटच्या सैन्य दलात अधिकुत युध्द ललकारी म्हणून घोषित करण्यात आला आणि हि ललकारी म्हणजेच "Battle Cry" किंवा "War Cry" अजूनही मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट मध्ये घेतली जाते.

आपल्या भारतीय जवानांच्या बद्दल जितकं सांगावं, बोलावं, लिहावं तितकं कमीच आहे. ज्यांनी आपल्या मातृभूमीसाठी जीवाचे बलिदान दिले आणि जे सीमेवर देशाचे रक्षणार्थी तैनात आहेत व जे आपले कर्तव्य चोख बजावत आहेत त्याच्यामुळेच आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. "त्यांनी आपल्या भविष्यासाठी त्याचा स्वतःचा वर्तमान दिला आहे”. अश्या जावांच्या शौर्याच्या वीर गाथा ऐकून मन नतमस्तक होत कारण जिथे सामान्य माणसाची हद्द संपते तिथेच यांची हद्द सुरु होते. अश्या सर्व भारतीय जवानांना त्रिवार सलाम.



धन्यवाद !!
लेखन : अर्जुन ना. वालावलकर

Previous Post
Next Post
Related Posts

0 comments:

Please do not enter any spam link in the Comment