Gratitude


Gratitude

Gratitude

निसर्गामध्ये जे काही उपलब्ध आहे त्याचा आपण उपभोग घेत आहोत. आपल्या जन्मापासून जन्मतःच जे प्राप्त झाले आहे ते म्हणजे पाणी, हवा, आकाश, आणि  निसर्गातील इतर सर्व काही जे कुणाच्याही मालकीचे नाही पण ते सार्वाना मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण त्याबद्दल आपण कधी विचार केला आहे का? किंवा त्याबद्दल तुम्ही कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे का नाही ना.

Gratitude

सर्व साधारण माणसं आपले जीवन जगत असताना दोन प्रकारे विचार करीत असतात पहिला विचार  उदा. आपल्याकडे पैसे आहे, स्वतःचे घर आहे, काम धंदा आहे, प्रवास करण्यासाठी गाडी आहे, चांगला मोबाइल आहे, हातात ब्रँडेड घड्याळ आहे, इतर सर्व सुखसोई आहेत, चांगले आरोग्य आहे, चांगले कपडे आहेत, घरामध्ये वातावरण खेळीमेळीचे आहे, परिवाराला, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींन बरोबर घालवण्यासाठी वेळ आहे. आणि दुसरा विचार उदा. मला अजून बऱ्याच गोष्टी करावयाच्या आहेत, पण त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, घर  घ्यायचं आहे, चांगली नोकरी नाही, व्यवसाय चालत नाही, आपल्याकडे गाडी नाही, भरपूर पैसे कमवायचे आहेत, अश्या बऱ्याचगोष्टी आहेत. प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याच्या वैयक्तिक मनातील इच्छा वेगवेगळ्या आहेत. या दोन्ही विचारांमधून एक गोष्ट लक्षात येतेकी माणूस आपल्याकडे जे नाही आहे त्या बद्दल विचार करत असतो आणि जे त्याच्याकडे आहे त्या बद्दल विचार करीत नाही. म्हणजेच तो स्वतःला कमतरतेच्या उत्पतीकडे लक्ष केंद्रित करतो त्यामुळे तो कमतरतेलाच आकर्षित करतो आणि जीवनात सुखाचा अभाव निर्माण झल्यावर तक्रार करतात व दोष नशिबाला देतो

Gratitude


भोतिक शास्त्रात (Quantum Physics) आकर्षणाच्या सिंध्दांता मध्ये हा नियम कायम कार्यरत आहे. "ज्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्याल ती गोष्ट जागृत होईल" ज्यांना हा सिद्धांत कळला त्याने आपले आयुष्य बदलून टाकले आहे आणि ज्याला आपले जीवन बदलायचे आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीची सवय लावून घ्यायची आहे ती म्हणजे (Gratitude) कृतज्ञता. एखाद्या गोष्टीसाठी, व्यक्तीसाठी, अपेक्षित कार्यासाठी, आपल्याला जे प्राप्त आहे त्याच्यासाठी मनापासून अंतःकरणातून आभार व्यक्त करणे म्हणजेच कृतज्ञता. कृतज्ञता या शब्दाचा अर्थ शब्दात सांगितला तरी तो प्रत्यक्ष अनुभवण्यात एक वेगळा आनंद आहे.


to-express-gratitude-1

आपण आपल्या जीवनातील आयुष्याबद्दल कृतज्ञ झालो तर आपल्याला जिवंत ठेवणारी जी असीम ऊर्जा आहे ती चांगल्या प्रकारे कार्यरत राहील. कृतज्ञ राहण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व प्रथम स्वतःहा बद्दल विचार करावा आपण जे जीवन जगत आहोत, जिवंत आहोत ते कश्यामुळे, शरीरात आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास त्यामुळे मी जिवंत आहे आणि हि क्रिया कायम सुरूच आहे. यासाठी मला कोणतेही कष्ट घ्यावे लागत नाहीत किंवा कोणत्याही सूचना द्याव्या लागत नाहीत त्या श्वासाला अंतःकरणातून मनापासून कृतज्ञता व्यक्त करा तुम्हाला खूप छान वाटेल, समाधान वाटेल, रात्री झोपून सकाळी उठल्यावर आपण सुरक्षित आहोत जिवंत आहोत आजचा दिवस माझ्यासाठी नवीन आहे, नवीन जन्माप्रमाणेच आहे याबद्दल सुध्दा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुम्हाला दिवसभरामध्ये भरपूर असे क्षण आहेत भरपूर अश्या गॊष्टी आहेत  ज्यावर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता.

to-express-gratitude-2


तुम्ही निसर्गा बद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता तुम्हाला ज्या गोष्टी बद्दल प्रेम आहे ज्या तुम्हाला आवडतात ज्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, घरातील मंडळी, नातेवाईक, शेजारी, मित्र, तुम्ही जिथे कामकारीत असल्याठिकाणची तुमचे सहकारी व अधिकारी आणि इतर तुमच्या परिचयाची माणसं त्यांचे तुमच्या जीवनात काय स्थान आहे याचा विचार करा ते जर तुमच्या जीवनात नसते तर तुमचे जीवन कसे असले असते, हा साधा विचार सुद्धा मनात आणला तर किती त्रास होतो. तुम्हाला त्याच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केलात तर तुम्हाला जाणवेल की आयुष्य किती सुंदर आहे आणि जीवन जगणे सोपे होऊन जाईल. अशा कृतज्ञता व्यक्त करण्याची तुम्ही एक यादी केलात आणि त्यावर कृतज्ञता व्यक्त केलात किंवा करीत राहिलात तर तुमच्यामध्ये आपोआप एक सकारात्मक बदल घडून येईल जे तुमचे जीवन बदलून टाकेल तुम्ही दिवसेंदिवस आनंदी आणि ताजेतवाने दिसू लागाल  तुमच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचे चेतन्याने भरलेली ऊर्जा निर्माण होत राहील कोणतेही सकारात्मक कार्य करण्या पूर्वी त्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलात तर ते काम योजिलेल्या वेळेवर पूर्ण तर होईलच पण त्या सोबत तुम्हाला ते आनंदायी ठरेल.

तुम्ही म्हणाल फक्त कृतज्ञता व्यक्त केल्याने जीवनामध्ये इतका बद्दल घडू शकतो ?

असा प्रश्न तुम्ही जर मनामध्ये करत असाल तर त्यात काही वेगळं वाटण्याचे कारण नाही. कारण आपल्या मेंदूमध्ये कोणतीही गोष्ट (Observe) निरीक्षण करताना, अनुभव करताना त्यामध्ये (Negative) नकारत्मक काय आहे हे पहिले पाहतो कारण आपल्याला बालपणापासून, पिढ्यानपिढ्या, जनुकातून, आलेली असुरक्षिता या मुळे मेंदूला (Negative Bias) नकारत्मक प्रवृत्तीची  सवय झाली आहे त्यामुळे चांगल्या गोष्टी बद्दल मेंदू जास्त (Intrest) आवड दाखवत नाही त्याला  (Intrest) असतो (Problematic) समस्याप्रधान गोष्टीमधें त्यात तो लक्ष देतो आणि दुर्भाग्याने आपण त्यात अडकतो. आपल्याला जीवनामध्ये यश संपादन करायचे असेल म्हणजेच जीवन सुखी आणि समृद्ध बनवायचे आहे तर आपल्याला कृतज्ञतेचा मंत्र जपला पाहिजे. तुम्ही हे एकदा करून तर पहा काय चमत्कार घडेल तुमच्या जीवनात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणताही वेळ ठरलेला नाही कोणतेही बंधन नाही  “You Have To Be Just To Grateful”

to-express-gratitude-3


तुम्हीं कृतज्ञता मनापासून व्यक्त करण्यास काही ठळक गोष्टीचे नियमित सराव केलात तर तुम्हाला याचे आनंदायी अनुभव येतील. पण कोणतीही गोष्ट परिपाठ होण्यासाठी कमीत कमी २१ दिवसाचा नियमित सराव करणे गरजेचं आहे.

रोज सकाळी उठल्यावर प्रथम निसर्गाचे आभार मना आजचा उगवलेला दिवस नवीन चैतन्य आणि उर्जस्वरूप आहे यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांचे आभार माना तुम्ही सकाळी उठल्यावर जिवंत आहात याची जाणीव होणे हा एक अविश्वसनीय  चमत्कार आहे यासाठी संपूर्ण शरीरसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा.

ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्या मातापित्यांना, ज्यांनी तुमचे संगोपन केले, ज्यांनी तुमच्यावर चांगले संस्कार घडविले, मार्गदर्शन केले अश्या थोर व्यक्तीचे आपल्या गुरुजनांचे अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या जीवनात ज्याचे स्थान अनमोल आहे अशा व्यक्तीचे आणि तुमच्या नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
 ज्यांनी तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्याच्यासाठी  कृतज्ञता व्यक्त करा.

तुमची सध्याची परिस्तिथी पूर्वी पेक्षा चांगली असेल तर त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. पण आयुष्यातील मागील काळापासून आता पर्यंतच्या केलेल्या प्रयत्नासाठी ज्यांनी तुम्हाला सहकार्य केले त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. असे केल्याने तुमच्यातील चांगुलपणा तुम्हाला प्रामाणिक बनविण्यास मदत करतो.

दिवसभरासाठी ठरविलेल्या चांगल्या कामाची आठवण करा आणि त्यावर कृतज्ञता व्यक्त  करा. जीवनातील रोजच्या घडामोडीमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात त्यात बऱ्याच सकारात्मक असतात त्यागोष्टी त्वरित लक्षात घेऊन त्यावर कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करण्यास मिळालेली संधी म्हणजे तुम्ही आनंदी होण्याचा एक मार्ग आहे.
  
to-express-gratitude

कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्ही तुमच्याकडे जे नाही आहे त्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्यावर लक्ष केंदित करून त्याचे आभार मानल्याने तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही लायक बनता.  

तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमचे मन नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहते. कृतज्ञतेने मुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बददलतो प्रत्येक परिस्तिथी मध्ये तुम्ही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करता तुम्ही उद्धिष्टापर्यंत पोहोचण्यास स्वतःलाच प्रोत्साहित करतात त्यामुळे तुमच्या अवतीभोवती सकारात्मक गोष्टी घडताना तुम्हाला दिसून येतात.

कृतज्ञतेने मुळे तुमचे मानसिक आणि शाररिक आरोग्य संतुलित राहते. कृतज्ञतेने मुळे तुमच्या मनातील भीती कमी होत जाते व सुरक्षितते बद्दलचा विश्वास बळकट होतो.

कृतज्ञतेने मुळे आपले जीवन बदलू शकते असे तुम्हाला जेव्हा जाणवायला लागेल तेव्हा तुमच्या जीवनात अशा काही सकारात्मक अविश्वसनीय घटना घडू लागतील ज्याने तुमचे जीवन बदलून जाईल.



जय हिंद

धन्यवाद !! 

लेखन: अर्जुन ना वालावलकर

Previous Post
Next Post
Related Posts

0 comments:

Please do not enter any spam link in the Comment