१ मे, महाराष्ट्र दिन चिरायू होवो...!!
१ मे १९८१, स्वर्गाहून सुंदर सिंधुदुर्ग स्थापना दिनाच्यानिम्मित चारोळी...!!
"रम्य ही सिंधुदुर्ग भूमी आणि धन्य ते सिंधुदुर्गवासी"
जन्मो जन्मी येथेच जन्मावे हेच मागतो निसर्गाशी..!!
"जन्मलो आम्ही सिंधुदुर्गात बोलतो आम्ही मालवणी"
"जाहलो आम्ही धन्य आम्हास लाभली ही सिंधुदुर्ग धरणाची माती"
"डोंगर, माळरान, आणि कडेकपाऱ्यात,
दऱ्या खोऱ्यातून वाहतो मालवणी मायेचा झरा...!!
देवाची करणी आणि नारळात पाणी
तशी मालवणी माणसाच्या ह्रदयात शहाळी...!!
"इथे नांदतो संपन्न निसर्गाचा साज,
अशी असावी एक भूमी म्हणुनी केला परशुरामाने अट्टाहास...!!
सिंधुदुर्ग म्हणजे निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न,
म्हणूनच या भूमीत पंचतत्वाचा पूर्ण सहवास...!!
"विशाल सागराची साथ सोबत समुद्राची खनिजे,
माझ्या दर्याराजाची साधन संपत्ती अफाट...!!
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी होते येथे पहाट,
असा निसर्गरम्य अद्वितीय सिधुदुर्ग एकच आहे जगात...!!
येथे प्रत्येक चराचरा मध्ये आहे रामेश्वर आणि सतेरीचा सहवास,
कुठे लक्ष्मीनारायणाची साथ तर कुठे माऊलीचा मायेचा हात...!!
जशी भजन कीर्तनाला टाळ मुरदुगाची साथ
तशी रात्रीच्या धयकाल्याला दशावताराचा थाट...!!
सण, उत्सवच्या दिवसात उजळून येते पहाट,
गौरी गणपतीच्या सणात नाचत येतात आमचे चाकरमानी अफाट...!!
येथे प्रत्येक सणांना वेगळाच उत्साह वेगळीच निसर्गाची किमया
तसेच प्रत्येक मोसमात एक अदभूत क्रियेची वेगळीच जादू...!!
कधी कडक ऊन, कधी थंडगार वारा तर कधी पाऊस धारा
पावसाळ्याच्या उभ्या, तिरप्या सरी धुऊन काढतात सारा पसारा...!!
असा आगळा वेगळा माझा सिंधुदुर्ग न्यारा
झाडाच्या छायेत शीतल गार वारा..!!
सर्व जगात आहे माझा सिंधुदुर्ग न्यारा
आम्हा मालवण्यांना आमचा सिधुदुर्ग प्यारा...!!
स्वर्गाहून सुंदर सिंधुदुर्ग स्थापना दिनाच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा...!!
लेखन :
अर्जुन वालावलकर
0 comments:
Please do not enter any spam link in the Comment