Water is life पाणी जीवन आहे
पाणी आपल्या जीवनाचा एक प्रमुख घटक आहे हे तुम्हाला माहित आहेच पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश हे निसर्गातील पाच पंचभूत घटक आहेत. हेच पाच घटक ज्याच्या मूळे आपले शरीर बनले आहे या पाच घटकानेच हा ग्रह बनलेला आहे, ज्याने संपूर्ण पर्यावरण बनले आहे, हे संपूर्ण अस्तित्व या पाच घटकांचे चक्र आहे. या पाच घटका मुळेच निसर्गाचा समतोल राखला जातो. पाण्याविना जीवन नाही तरी देखील आपण पाण्या बद्दल किती जागरूक आहोत याचे आपल्याला आत्म परीक्षण करण्याची गरज आहे
Water is life पाणी जीवन आहे
या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आता पर्यंत आपल्याला पृथ्वी प्रमाणे दुसरा कोणताही ग्रह सापडलेला नाही किंवा त्याचा आजून आपल्याला शोध लागलेला नाही, विचार करा या विश्वात असंख्य तारे, ग्रह, त्याचे उपग्रह आणि काही सूर्य देखील आहेत पण या सर्वांमध्ये पृथ्वी असा एकाच ग्रह आहे ज्याच्यावर पाणी आहे म्हणजेच जीवन सृष्टी आहे. निसर्गामध्ये जे काही बदल जाणवतात ते फक्त पाण्यामुळेच. आपल्याला माहीतच आहे कि पृथ्वीवर ७०% पाणी आहे आणि हवेतील पाण्यामध्ये या 30 डिग्री सेल्सियस (86.86 फॅ) पर्यंत, उदाहरणार्थ, हवेच्या परिमाणात 4 % पाण्याची वाफ असू शकते. म्हणजेच हवेत सुद्धा पाणी आहे.
निसर्गामध्ये होणारे जे बदल आपल्याला दिसतात त्यामध्ये पाण्याची मोठी भूमिका आहे उदा. एका बीजातून रोप बनण्याची प्रक्रिया आणि निर्मितीची सुरुवात हि पाण्यामुळे होते. पाण्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत कि ते कोणत्याही पदार्थाशी किंवा वास्तूच्या संपर्कात आले कि त्याच्यावर प्रक्रिया होण्यास सुरुवात होते. पाणी हे मानवासाठी आणि या पृथ्वी तलावावरील असणाऱ्या इतर सर्व सजीवांसाठी एक वरदानच आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करावेच लागेल. आपल्याला हे माहित आहे का पृथ्वी वरील अस्थित्वात असलेले पाणी म्हणजेच निसर्गात जिथे जिथे पाणी आहे त्या पाण्याला स्मृती, आठवण, स्मरणशक्ती आहे आणि ती स्मृती आपल्या सोबत साठवून ठेवते.
याची सत्य वस्तूस्थिती पहिल्यांदा 1988 मध्ये एका फ़्रेंच रोगप्रतिकारशास्त्रज्ञ डॉ. जेकेस बेन्विस्ते याने जागा समोर ठेवली. बेन्विस्ते यांनी सांगितले कि ही "मेमरी" डिजिटलीज्ड, संक्रमित केली जाऊ शकते आणि पाण्याचे दुसऱ्या नमुनामध्ये पुन्हा घातली जाऊ शकते, ज्यात नंतर पहिल्या नमुन्यासारखेच सक्रिय गुण असतील. पाण्याला स्मृती असते हे स्पष्ट करण्यासाठी डॉ. बेन्विस्ते यांनी अनुमान केले कि पाणी कोणत्याही पदार्थाच्या किंवा वास्तूच्या संपर्कात आले कि त्या पदार्थाची, वास्तुबद्दलची माहिती आपल्याकडे साठवून घेते. त्यानंतर पाण्यावर अजून संशोधन करीत असताना काही रोचक आणि लाभदायक निष्कर्ष आढळून आले कि पाणी आपल्या आजूबाजूच्या परिसर आठवणीत ठेवत असून तेथील वातावरणात होणाऱ्या घडामोडी, बदल, विचार, संवाद, भावना अशा सर्वांची नोंद आपल्या कडे करून घेत असते आणि त्या प्रमाणेच आपल्या मध्ये तसा बदल घडवून आणत असते म्हणजेच पाण्याला तुम्ही काही उद्देश ठेवून त्यावर आपले विचार, भावना एकाग्रीत केली तर पाण्याच्या स्फटिका मध्ये बदल घडून येतात.
Water is life पाणी जीवन आहे
त्यानंतर जपान मधील मासारो इमोटो
या लेखक आणि वैज्ञानिकाने पाण्यावर
एका वेगळ्या प्रकारे संशोधन केले असता त्याला असे आढळून आले कि पाण्याच्या आण्विक रचनेवर मानवी
चेतनाचा प्रभाव आहे. 2004 मध्ये
प्रकाशित झालेले इमोटोचे द
हिडन
मेसेजेस
इन
वॉटर हे पुस्तक
न्यूयॉर्क टाइम्समधील सर्वोत्कृष्ट विक्रेता
होते. इमोटोची कल्पना
बऱ्याच वर्षाने विकसित झाली
पण त्यांचे प्रारंभिक
कार्य ढोंगी-वैज्ञानिक
गृहीतकांभोवती फिरले की पाणी
सकारात्मक विचार आणि शब्दांवर
प्रतिक्रिया देऊ शकते, प्रदूषित
पाणी प्रार्थना आणि
सकारात्मक दृश्यात्मकतेद्वारे साफ केले जाऊ
शकते.
मासारो इमोटो यांनी
हे सिद्ध करून दाखवण्या
साठी इमोटोने
1999 पासून, मेसेजेस फ्रॉम वॉटर
या नावाच्या कार्याचे
अनेक खंड प्रकाशित
केले, ज्यात बर्फाचे
स्फटिक आणि त्यावरील
प्रयोगांची छायाचित्रे जगासमोर ठेवली.
इमोटो म्हणाले की
पाणी हे आपल्या
वास्तविकतेचे एक ब्लू
प्रिंट आहे आणि
भावनिक "ऊर्जा" आणि "स्पंदने"
पाण्याची भौतिक रचना बदलू
शकतात. इमोटोच्या वॉटर क्रिस्टल
प्रयोगांमध्ये मॅग्निफायिंग ग्लास वरील पाण्यावर वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, प्रार्थना, धर्माचे विचार, काही जागतिक पुढार्यांचे फोटो, फुले, संगीत, चित्रे अश्या बऱ्याच गोष्टींना प्रयोगात आणले आणि
त्यानंतर मायक्रोस्कोपिक फोटोग्राफीद्वारे परिणामी क्रिस्टल्सच्या सौंदर्याचा
गुणधर्म गोठविणे आणि त्यांचे
परीक्षण केले होते. त्यांनी असा
दावा केला की
सकारात्मक भाषण आणि
भावनात्मक विचारांमुळे पाण्यामध्ये उद्भवलेल्या
बदलाचे पाणी
गोठलेले असता तेव्हा
तेथे "सुखकारक"
दृश्ये क्रिस्टल्स तयार होतात
आणि तेच जर
नकारात्मक हेतूने पाणी
गोठलेले असता "कुरूप" दृश्ये
क्रिस्टल फॉर्म तयार होतात.
Water is life पाणी जीवन आहे
Water is life पाणी जीवन आहे
पाण्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक स्फटिकांच्या चित्रातून असे जाणवते की पाणी विचार आणि भवनाच्या आधारे आपल्या मध्ये बदल घडवून आणत असते. पाण्याला चेतना आहे आणि ते संवेदनशील देखील आहे. आपण आपल्या शरीरातील असलेल्या पाण्याचा विचार केला तर माणूस दिवसभरात मनामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे विचार करीत असतो त्या प्रमाणेच त्याच्या मध्ये बदल घडून येत असतात हा बदल त्याच्या शरीरात असलेले पाणी हे बदल घडवून आणत असतात हे आपल्याला मान्य करावे लागेल. आपले विचारच आपले जीवन निर्माण करत असते म्हणजेच आपले जीवन बदलणे आपल्याच हातात आहे. आपण आपल्या इच्छेनुसार जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो. ज्यांना हे माहित आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आपण सुद्धा आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.
पुढील माहिती भाग २ मध्ये
जय हिंद
धन्यवाद !!
लेखन: अर्जुन ना वालावलकर
धन्यवाद !!
लेखन: अर्जुन ना वालावलकर
0 comments:
Please do not enter any spam link in the Comment