The Indian Army-1

 The Indian Army

The-Indian-Army-1

कोणत्याही देशासाठी त्याची सेना हि त्याची मोठी ताकत असते. भारत आपल्या शेजारील देशापासून नेहमीच आतंकवादी समस्याशी संघर्ष करीत आलेला आहे. जगातील सातव्या  सर्वात मोठ्या देशाची सुरक्षा करणे आपल्या बहादूर सैनिका शिवाय  शक्य  नाही. आपल्या देशातील बरेच नागरिक Hollywood Movie पाहून म्हणतात कि आपल्या देशाची Special Commando Force अमेरिका मारिन, नेव्ही सील कमांडो सारखी कधी होणार. तुम्हाला हे माहित झाल्यावर आश्चर्य चकित व्हाल कि काही भारतीय Special Commando Force चा मान अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जर्मनी, आणि इस्रायली सेने पेक्षा मोठा आहे.

सर्वसाधारण भारतीयांना आपल्या देशाचे सैनिक म्हणजे Indian Army, Indian navy, आणि Indian Air Force, इतकेच माहित आहे. खूप कमी लोकांना Special Commando Force याबद्दल माहित असेल. आज आपण जाणून घेऊया आपल्या भारतातील सैनिकांच्या इतर Commando Force बद्दल Indian Army जगातल्या मोठ्या Army पैकी एक आहे. भारतीय सेन्यदल इतके मोठे आहे कि ते बऱ्याच Regiment आणि Battalion मध्ये विभागले गेले आहे. आपण सर्वप्रथम स्वतंत्र काळाच्या आधीच्या काही Regiment आणि Battalion बद्दलची माहिती पाहूया.

 राजपूतन रायफल - राजपूतन रेजिमेंट Rajput Regiment

Indian_Army-Rajput_regiment

Rajput Regiment 1775 मध्ये बनविण्यात आली होती. या रेजिमेंटचे उद्धिष्ट "वीर भजो वसुंधरा" आहे. युद्धाच्यावेळी याचे घोषवाक्य "राजा रामचंद्र कि जय" आहे. हि Battalion "Infantry Regiment" पद्धतीची आहे. आणि याचे २३ Battalion आहेत. राजपुताना रायफल देशाची सर्वात जुनी आणि सन्मानित Battalion पैकी एक आहे. ही Regiment पाकिस्तान बरोबर युद्ध करण्यात पारंगत असल्याचं समजले जाते. या Regiment ने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धा मध्ये जवळजवळ 30 हजार योध्यांनी आपले बलिदान दिले होते. राजपुतान रायफल मध्ये 40% पेक्षा जास्त सैनिक राजस्थान, पंजाब, हरियाणा, येथील आहेत. दिल्ली मध्ये राजपुताना रायफलचे एक संग्रालय बनविलेला आहे त्यामध्ये त्याचा पूर्ण इतिहास दिला गेला आहे.

जाट रेजिमेंट Jat Regiment Indian Army

Jat-Regiment-Indian-Army

Jat Regiment ची स्थापना 1795  मध्ये केली गेली होती ज्याचे उद्धिष्ट होते "युनिटी आणि वेलर्स" आहे. युद्धाच्यावेळी याचे घोषवाक्य "जाट बलवान जय भगवान" या Regiment केंद्र उत्तरप्रदेशच्या  बरेली मध्ये आहे. याचे 23 Battalion आहेत. हि भारतीय सेनेची "Infantry Regiment" आहे. हि देशातील 200 वर्ष पेक्षा जुनी पदक प्राप्त करणारी Regiment आहे या Regiment पहिले आणि दुसऱ्या महायुद्ध मध्ये आपले योगदान दिले आहे. Jat Regiment मध्ये मुख्यता उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली जाट सामाज्याची संख्या आहे. Jat Regiment हे  एक असे Regiment आहे त्यामध्ये पूर्ण पाने 100% फक्त जाट समाजाचे सैनिक असतात. याचे कारण जाट सैनिकाचे सूत त्याने भरले पाहिजे बाकी कोणत्याही जातीचे असे Regiment नाही. Jat Regiment  कडे 2 अशोक चक्र, 35 शौर्य चक्र, 10 महावीर चक्र, आणि 2 व्हिक्टरीया क्रोस, जोतं संम्मान आणि 8 कीर्ती चक्र, 39 वीरचक्र, आणि 170 सैनिक पदक आहेत. हि रेजिमेंट जाट समाजांची. आपल्या कर्तव्याने, पुरस्काराने प्रसिद्ध आहे.

शीख रेजिमेंट Sikh Regiment Indian Army

Sikh-Regiment-Indian-Army
Sikh Regiment शत्रूचा नाश करण्यासाठी या Regiment चे फक्त नावाचं पुरेस  आहे. या Regiment ची स्थापना इंग्रजांनी १८४६ मध्ये केली होती. Sikh Regiment चे 19 Battalion आहेत. Sikh Regiment ने कारगिल युद्धाच्या वेळेला Tiger Hill वर आपला कब्जा केला होता Sikh Regiment ने देशाला अडचणीच्या वेळेला युद्धामध्ये आपले पूर्ण योगदान दिले  आहे. Sikh Regiment भारतातील सर्वात खतरनाक  सेना आहे. या सेनेने पहिले आणि दुसऱ्या महायुद्ध मध्ये इंग्रजान सोबत युद्धात भाग घेतला होता.

 प्याराशुट रेजिमेंट Parachute Regiment Indian Army

Parachute-Regiment-Indian_Army
Parachute Regiment ची स्थापना स्वतन्रच्या पूर्वी १९४१ मध्ये केली गेली होती. हि Regiment देशातील बाकी सर्व Regiment ना आणि बाकी सर्व Battalion ना सर्व हवाई सुविधा प्रधान करते. भारताच्या कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी, आणीबाणीच्या वेळी वादळ, भूकंप, आतंकवाद्यांकडून घडविलेला घातपातच्या ठिकाणीअतिदुर्गम भागात आवश्यकतेच्या वेळी Parachute Regiment ला पाचारण केले जाते. हे एकमात्र असे Regiment  आहे जे Air Force प्रमाणे काम करते. म्यानमारच्या ठिकाणाहून काही आतंकवादी भारतात घातपात घडविण्यासाठी येणार होते पण Parachute Regiment ने त्याचा अश्या प्रकारे खात्मा केला की  त्यांना Parachute Regiment येण्याची चाहूल पण लागू दिली नाही. हे Parachute Regiment अश्या प्रकारे काम करते.

 गोरख रेजिमेंट Gurkha Regiment Indian Army

Gurkha-Regiment-Indian-Army
Gurkha Regiment ची स्थापना १८५० मध्ये झाली होती. Gurkha Regiment ची हे एक असे Regiment आहे जे मृत्यूला घाबरत नाही. कुण्या एका महापुरुषांनी सांगितले आहे कि जेव्हा कोण म्हणत असेल कि मी मृत्यूला घाबरत नाही तर समजावं एक तर तो खोट बोलत आहे किंवा तो गोरख आहे. Regiment च्या सैनिक जेव्हा शस्त्र उचलतो तेव्हा त्याच्या समोरील व्यक्ती नतमस्तक होऊन जातो. Gurkha Regiment बलिदानाचे दुसरे नाव आहे. यांच्या बळावर इंग्रजांनी हिटलर बरोबर युद्ध केले. हिटलर या सेन्यावर इतका प्रभावित झाला कि या सैन्याला घेऊन मी पूर्ण जग जिकंण्याचा मनसुबा होता. Gurkha Regiment मधील अधिकतर सैनिक नेपाळ मधून आले आहेत. गोरख हे कोणत्या जातीचे नाव नाही तर ते एका शहराचे नाव आहेगोरख सेना हि भारतात, नेपाळ आणि ब्रिटीश आर्मी मध्ये सुद्धा आहे.
वैगवेगळ्या प्रकारचे सैन्यदल आपल्या भारत देशात कार्यरत आहेत अश्या सर्वात भयानक Special Forces आणि हे commando आपल्या देशाच्या सेवेसाठी कायम सतर्क असतात. यांच्यामुळेच आपण आपल्या देशात सुरक्षित आहोत. एक सैनिक होणे काही साधं काम नाही कठीण मेहनत आणि परिश्रम करून शरीर मोडेपर्यंत सराव करणे तसेच मनावर मानसिक दबाव असताना देखील दिलेली जबाबदारी अखेरच्या श्वासापर्यंत पूर्ण करण्याची तयारी ठेवणे. हे करत असताना हसत हसत आपले सर्वकाही अर्पण करणाऱ्यांना या जाबाज योध्याना शतशत नमन आहे. हि खूप निराशाजनक बाब आहे कि आपल्याला आपल्या देशातील Special Force तसेच सैन्यदलाबद्दल फारसे काही जास्त माहित नाही किंवा ते जाणून घेण्यासाठी आपण किती उसूक्त आहोत ते प्रत्येकाने आपणच ठरवावे. आपल्याला आपल्या भारत देशातील सर्व सैन्यदलाचे आभार मानायला हवे ज्याच्यामुळे आपण सुरक्षित आहोत आणि हे सांगावे लागताकामा नये.  यासाठी आपण आपल्या देशप्रेमाची ज्योत प्रत्येकांच्या मनामनामध्ये प्रज्वलित केली पाहिजे आताच्या पिढीकडून पुढच्या पिढीला मार्गदर्शन करून देशाबद्दल आणि देशासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या सैन्यदलाचे महत्व किती अनमोल आहे हे पटवून देता आले पाहिजे. हि सुद्धा एक देशसेवा मानून आपल्या देशाच्या प्रति आपले देशावरील प्रेम व्यक्त करता आले पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक आहोत हे छातीठोक पणे अभिमानाने सांगू शकतो कि भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे.
जय हिंद !!


धन्यवाद !! 

लेखन: अर्जुन ना वालावलकर
Previous Post
Next Post
Related Posts

1 comment:

  1. Good story , it is very important information about our army
    Word combination ok like writer
    I give 75 mark out of 100

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the Comment