आठवणी येतात आणि आठवणी जातात.....!! असे आपण बरेचदा म्हणतो पण याच आठवणी जेव्हा येतात तेव्हा याच आठवणींची सुद्धा एक आठवण आपल्याला आठवणीत ठेवून जातात ती एका तपशीला प्रमाणे, कि अमुक एक आठवण त्या दिवशी किंवा कधी झाली होती, म्हणजेच आठवणी येतात आणि आठवून जातात.....!!
काही आठवणी बोलतात तर काही आठवणी काहीतरी सांगून जातात, आठवणी कधी हसवतात तर कधी रडवतात, काही आठवणी सुखावणारे असतात तर काही दुखावणारे हि असतात, काही आठवणी प्रेमळ असतात, काही आठवणी जीवापाड जपलेल्या असतात तर काही आठवणी मनाच्या खोलवर नाजूकपणे रुजलेल्या असतात अश्याच काही आठवणी हृदयस्पर्शी असतात तर काही भावनात्मक. आपण आपल्या जीवनातील प्रत्येक आठवण आपल्या प्रत्येक स्तरावर नकळत आपल्या सोबत घेऊन चालत असतो. मग त्या आठवल्या कि आठवणी बनतात. आज आपण अश्याच आठवणीनं बद्दल बोलणार आहोत आणि आपल्या आठवणींना जवळून पाहणार आहोत म्हणजेच कि आपण यावर विस्ताराने चर्चा करणार आहोत.
आठवण म्हणजे काय आहे, आठवण म्हणजे नेमक काय असते, ती का येते, जी कधी आपल्याला आठवते तर कधी आठवत नाही ती आठवण, तर कधी आठवावी लागते. अश्याच त्याबद्दलचे बऱ्याच शंका आहेत तर काही प्रश्न सुद्धा आहेत. पण आपण यावर सर्विस्तरपणे चर्चा करून त्याबद्दलची काय कारण आहोत ती आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी आठवण म्हणजे काय ? हे जाणून घेण्याबरोबर ती जाणून घेण्याची आवड व त्याबद्दलची रुची असणे हि तितकीच आवश्यक आहे. आपण याबद्दलची माहिती तीन भागामध्ये समजून घेणार आहोत. पहिली वैयक्तिक, दुसरी सामाजिक जी समजून घेणे फार आवश्यक आहे आणि भोगौलिक व प्राकृतीक यातून सृष्टीत निर्माण होणारे रासायनिक बदल आणि त्यातून घडत गेलेली माणसांची जीवन शैली कश्या प्रकारे बनत गेली आहे या स्थितीवर प्रकाश टाकणारी आहे.
मी गमतीने तुम्हाला एक प्रश्न विचारतो ? आपल्या जीवनामध्ये आपण कधी असा विचार केला आहे का ? किंवा आपण आपला जीवनाचा प्रवासा करीत असताना कधी स्वतःला असा प्रश्न केला आहे का ? माझ्या जीवनात जर आठवणीच नसतील तर काय झालं असतं अशी कधी कल्पना मनात आली आहे का? तर ते जीवन कसे असेल असते, तुम्हाला हे वाचून असे वाटेल की हा प्रश्न आहे की वेडेपणा, असा विचार तुमच्या मनात येईल असा कधी तुम्ही बहुतेक विचार केलाच नसेल जर आलाच तरी त्याचे उत्तर काय असेल हा पण एक विचार करायला लावणारा प्रश्नच आहे आणि या बद्दल प्रत्येकाचे मत वेगवेगळे असेल यात काही शंका नाही किंवा त्याबद्दल आपण वेगळ्या प्रकारे स्वतःलाच प्रश्न करायला सुरुवात करु पण योग्य उत्तर काय आहे हे सांगताना थोडेफार गोंधळल्या सारखे सुद्धा होईल आणि त्याचे स्पष्टीकरण सहजपणे देता येणार नाही. कारण प्रत्येक माणसाची मानसिकता हि वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकाचे उत्तर व त्याचे स्पष्टीकरण आणि त्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो यात कोणतेही दुमत नाही हे आपल्याला हि माहीत आहे.
माणूस ज्या पद्धतीने आपले जीवन जगत आहे त्या जीवनात त्याला अनुकूल वातावरण मिळत आहे कि नाही तसेच त्याचा ज्या अपेक्षा आहेत त्या परिपूर्ण आहेत कि अपूर्ण आहेत तसेच तो जीवनात यशस्वी आहे किंवा अपयशी आहे, तो जीवनाकडे कश्या व कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार आहेत की नकारात्मक विचार, तो मनाने आशावादी आहे की निराशारवादी आहे, त्याचा स्वभाव, त्याची सवय, त्याची आवड, वृत्ती या सर्व गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला तर आपल्या असे जाणवेल की ज्या पद्धतीने माणूस आपले जीवन जगतो किंवा आता जगात आहे त्यात त्याचा बऱ्याच प्रमाणात भूतकाळाचा संबंध नक्कीच आहे. इथे भूतकाळ म्हणजेच त्याच्या आठवणी किंवा अनुभवलेला प्रत्येक क्षण, घटना, प्रसंग, चर्चा, वाद, संवाद अगदी छोट्या छोट्या गोष्टी याची सर्व नोंद आपल्या कडे ठेवत असतो, साठवत असतो आणि या सर्व गोष्टीचा प्रभाव त्याच्या मनावर होत असतो त्या सर्व गोष्टीचा प्रभाव त्याच्या जीवनात होत असतो त्याप्रकारे प्रत्येकाची आठवणीं बद्दलची प्रतिक्रिया बनत असते, म्हणूनच आठवण या शब्दावर प्रत्येकाची वेगवेगळी प्रतिक्रिया नक्कीच असू शकते यावर हि कोणते दुमत नाही.
आठवण येणे किंवा आठवणीत असणे हा सहज प्रश्न किंवा एक चर्चेचा विषय असला तरी आपल्याला बऱ्याच जणांन कडून आपल्या तरुणपणातील प्रेमाच्या आठवणी बद्दल ऐकायला मिळेल त्या आठवणी चांगल्या की निराश करणाऱ्या असतील हा नंतरचा विषय आहे. कारण आठवण हि प्रेमाने जोपासली जाते म्हणून आठवण हा शब्ध प्रेमा संबंधित जास्त प्रचलित असला तरी आठवणींना एक जवळचा मायेचा ओलावा असतो त्यासाठीच प्रेमाच्या आठवणी बद्दल जास्त बोललं जात अस आता पर्यंतच्या वाचनातून, पहाण्यातून आणि इतर माध्यमातून निदर्शनास आलं आहे. तुम्हाला एखाद्या तुमच्या जवळच्या व्यक्तीने आपल्या आठवणीतून व्यक्त केलेल्या आठवणीतून तुम्हाला जाणवले असेल तर याचा तुम्हाला अनुभव असेल आणि यावर अश्या प्रकारची बरीच पुस्तके कथा, कादंबऱ्या, कविता, लेख, चर्चा, केल्या गेलेल्या आहेत यातून सुद्धा आपण समजू शकतो. तुम्ही कुतूहलाने आपल्या पेक्षा जास्त वयाच्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या आठवणी बद्दल विचारलेत तर ती व्यक्ती आपल्या बालपणाच्या किंवा आपल्या तारुण्यातील आठवणी बद्दल बोलताना दिसतील त्यात पण प्रामुख्याने प्रेमाचा विषय असण्याची शक्यता जास्त असू शकते. काही जण आपल्या बालपणाच्या आठवणी बद्दल बोलतील तर काही जण आपल्या जीवनातील अविस्मरणीय घडलेल्या घटनांच्या आठवणी सांगतील, काहीजण आपल्या शालेय आणि कॉलेजच्या जीवनातील मित्रांसोबतच्या आठवणी बद्दल बोलताही तर काही त्यानंतरही आता सुद्धा त्याच्या अतूट मैत्रीच्या आठवणी बद्दल बोलतील अश्या आठवणी बऱ्याच प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या स्तरावरच्या चर्चा करण्यासाठी मिळतील पण तुम्ही त्यांना कश्या प्रकारे स्वीकारता किंवा त्या आपल्या जीवनात कोणता प्रभाव ठेवून गेल्या आहेत त्यावेळेच्या घडलेल्या वेळेवर आवलंबून आहेत.
आपण अश्या दोन माणसांबद्दल बोलत आहोत जी दोन्ही माणसं आपल्या आठवणी आपापल्या परीने जोपासत आहेत पण या दोन्ही माणसांतील एक व्यक्ती आनंदी आणि दुसरी दुःखी आहे, असं का ? याच काय कारण असू शकत ? याच कारण आपण ज्या विषयावर चर्चा करीत आहोत त्यातच आहे ते म्हणजे आठवण. बहुतांशी आपण पाहिलात तर आपल्याला अशी माणस आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात किंवा आपण सुद्धा या दोन्हीतील एक व्यक्ती नक्कीच असू हे देखील तितकेच आहे. जे आपल्या सुखद आठवणीची आठवण काढून आनंदी होतात ते सद्देव आनंदमय व समृद्ध जीवन जगतात आणि जे आपल्या भूतकाळातील वाईट व मनाला त्रास देणाऱ्या आठवणींची आठवण काढून स्वतःलाच त्रास होईल असे वागतात त्याचे जीवन कायम त्रासदायक व दुःखी असल्याचे आठळते.
माणूस आपल्या जीवनामध्ये कितीही सकारात्मक आणि आशावादी, असला तरीही तो भूतकाळाचा विचार करून वर्तमानात प्रवास करीत असतो आणि यशस्वी होण्यासाठी भविष्याची पायरी चढत असतो पण यशस्वी तोच होतो जे जुन्या आठवणीना सकारात्मकपणे घेऊन आठवणींचे ओझे करून न घेता त्यांना पेरणारूपीने पाहतो आणि तसेच दुसऱ्या बाजूने विचार करून पाहिले तर जे आठवणींना वरवरच्या स्थरावर सहज घेतात त्यांना पूर्ण स्वरूपाने व्यक्त करीत नाही त्याला कधी आनंद झाला तरी त्याची तुलना ते भूतकाळातील वाईट घटनांशी करतात व आपल्याला झालेला आनंद सुद्धा प्रत्यक्ष पणे घेऊ शकत नाही किंवा दुसऱ्याला सांगू शकत नाही. कारण त्यांना त्याच्या आठवणींची नकारात्मकतेची तीव्रता इतकी जास्त असते की ते त्यावर मात करू शकत नाही त्यामुळे त्यांना आनंद झाला तरी ते व्यक्त करायला घाबरत असतात त्यांना मनातून आतून खूप भीती वाटत असते कि जर आता जास्त आनंदी झालो तर लगेचच आपल्याला कोणत्या वाईट प्रसंगाला तर सामोरे जावं लागणार नाही ना...!! आणि त्यांना त्यांच्या काही ठराविक आठवणींची आठवण झाली नाही तर त्यांना स्वतःलाच आपण एखाद्या अपराध केल्या सारखे वाटते, कि आपण बदललो कि काय ? तो बदल साकारात्म हि असू शकतो पण तो त्यांना स्वीकारावा कि नाही कि तो योग्य आहे कि अयोग्य हा मोठा प्रश्न असतो . कारण त्यांना त्या आठवणीनं सोबत जगण्याची सवय झालेली असते. तीच त्याची दुनिया आणि तेच त्याचे जग असा त्याचा गहण समज असतो त्याच्या सीमा त्यांनीच स्वतःच आखून घेतलेल्या असतात. अश्या माणसाची फार काळजी वाटते.
आठवण हा शब्द आपण सहज म्हणून जातो किंवा त्यांची सहजता आपल्याला माहित आहे म्हणून तो आपण बोलतो आणि सांगतो हि. कुणी आपल्याला असे विचारले की आठवण म्हणजे काय ? मग सांगायचे झालेच तर आपल्या लक्षात असलेल्या विषयाकडे लक्ष जाणे म्हणजे आठवण हे सरळ एक वाक्यातले उत्तर, असे सरळ शब्दांमध्ये किंवा सोप्या भाषेमध्ये आठवण या शब्दाची व्याख्या. पण विश्लेषण करून आठवण या प्रक्रियेची मांडणी करायची झाली तर असे सुद्धा म्हणता येईल किंवा हि प्रक्रिया ज्या माध्यमातून घडते म्हणजे घडलेला प्रसंग व क्रिया आणि त्याचा मनावर झालेला प्रभाव किंवा अनुभव याची संवेदना आपल्या पंचेंद्रिया मार्फत आपल्या मेंदूमध्ये साठवलेली जात असते ती पुन्हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने संबंधित कृत्य व प्रसंगा नुसार तसेच वैचारिक दृष्टीने विचार मनात आल्याने पुन्हा लक्षित होते आणि ती आपल्याला आठवते त्याला आपण आठवण असे म्हणतो.
वास्तविकता पाहिल्यास आपल्या शरीरातील पंचेंद्रिय यांनी एखादी घटना, प्रसंग, अनुभव, अभ्यास, सराव, प्रशिक्षण, चर्चा, वादविवाद, संवाद, अश्या काही गोष्टीच्या घडामोडी अनुभवल्या असतील पाहिल्या असतील त्यात काही गोष्टी जाणवल्या असतील समजलेल्या किंवा समजविलेल्या असतील अश्या सर्व गोष्टींचे नोंदणी आपल्या मेंदुमध्ये (मेमरी मध्ये) झालेली असते ती नोंदणी प्रत्येक घटनाच्या संबंधित विषयाला धरून झालेली असते त्यावेळी आपल्या पंचेंद्रिया व्यतिरिक्त इतर शरीरातील ज्या अवयावयाने व ज्या ज्या इंद्रियांनी त्यात आपला सहभाग घेतला होता, किंवा कार्य तसेच कृती केली असेल त्याचीसुद्धा नोंद त्यासोबत झालेली असते त्या सर्वगोष्टी आपल्या मेंदू मध्ये स्थापित झालेल्या असतात त्यामुळे त्या आपल्याकडे एक तपशीला प्रमाणे आपल्या कडे उपलब्ध किंवा साठवलेल्या गेल्या असतात त्या घटना किंवा तो विषय काही वेळा सहज सांगण्यासाठी बोलल्या जातात पण त्याच प्रकारची घटना भविष्यामध्ये पुन्हा घडली जाते किंवा त्याबद्दलची कमतरता जाणवते त्यावेळेला त्याची आठवण होते ती आठवण कोणत्याही स्वरूपात येऊ शकते आपल्या पंचेंद्रियांच्या मार्फत येऊ शकते किंवा तोच विषय परत बोलल्या गेल्यामुळे आपल्याला आठवू शकतो किंवा पाहिल्यानंतर आठवू शकतो तसेच आपण स्वतः आठवल्यावर ती आठवतो, स्वतः आठवायचा प्रयत्न केला की आठवते किंवा आपण तिथे लक्ष केंद्रित केल्यावर ते आठवते अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मेंदूमध्ये प्रस्थापित केलेली घटना आपल्याला आठवते त्यालाच आपण आठवण यात सामायिक करतो.
आठवण ही अशी एक क्रिया आहे जी प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणशक्तीच्या क्षमतेवर अवलंबून आहे. आणि याही पेक्षा वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाले तर एखादी गोष्ट किंवा वस्तू आपल्याला माहीतच नाही असे समजून आपण त्यागोष्टीकडे पाहत असताना अचानक आपल्याला ती मागील घटना आपोआप चटकन आठवते व आपण त्या आठवणीत जातो आता इथे एक मजेशीर गुपित आहे आपण कधी याचा विचारच केला नाही पण या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किंवा त्या माध्यमातून पहिले तर तुमच्या असे लक्षात येईल कि... मी तुम्हाला हे स्पष्टीकरण करून सांगतो जसे आपण आपल्या पंचेंद्रियांबाबतीत पहिले त्याच प्रकारे एखादी घटना, प्रसंग, अनुभव, अभ्यास, सराव, प्रशिक्षण, चर्चा, वादविवाद, संवाद, अश्या काही गोष्टीच्या घडामोडी अनुभवल्या असतील, आपण ज्या गोष्टींकडे पाहतो स्पर्श करतो खातो पितो अश्या विविध गोष्टी करतो पण त्यातल्या सर्वच आपल्याला लक्षात असतात किंवा आपण त्या लक्षात ठेवतो का ? नाही ना.... पण आपला मेंदू त्या सर्व गोष्टी आपल्या स्मरणात ठेवतो अगदी एका चित्रा प्रमाणे किंवा एखाद्या चित्रकारांना प्रमाणे. जेव्हा जेव्हा त्याच्याशी मिळताजुळता प्रसंग किंवा घटना समोर आली कि तो थेट त्या गोष्टीशी प्रस्थापित म्हणजेच कनेकट होतो, जोडला जातो पण हे सर्वांच्याच बाबतीत होईल याची काही शाश्वती नाही कारण ज्याची जितकी स्मरणशक्ती तल्लक तितका त्याला आठवणे सोपे असते. ज्याची स्मरणशक्ती जितकी चांगली असेल त्याची आठवण्याची कुवत जास्त असते. स्मरणशक्ती हा आठवणींचा मूळ गाभा आहे सर्वकाही इथेच संग्रहीत केले जाते व इथूनच पुन्हा लक्षित म्हणजेच प्रक्षेपित केले जाते आणि आठवण ही सदैव आपल्या स्मरणशक्तीची प्रचिती देत असते.
सर्वात सोप्या आणि सुलभ शब्दात सांगायचे झाले तर आठवण या शब्दाची एका शब्दात व्याख्या म्हणजे किंवा पर्यायी देता येईल असा शब्द म्हणजे "स्मृती" या एका शब्दामध्ये सर्व काही सामाविले आहे. आठवण म्हणजे स्मृती आणि स्मृती म्हणजेच आठवणी. या दोन्ही शब्दाचा अर्थ जरी एकाच असला तरी काही जणांच्या मते या दोन्ही शब्दातील अर्थ वेगवेगळ्या प्रकारे घेतला जातो असे यावर दुमत आहे. जर त्यांचे म्हणणे रास्त मानून आपण थोडा बारकाईने विचार करून पहिले तर आठवण आणि स्मृती या दोन्ही गोष्टी परस्पर एकमेकांशी संलग्न असल्या तरी यात फरक जाणवतो या दोन्ही शब्दातील फरक आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनातील किंवा व्यवहारातील घडामोडीत काही उदाहरणा द्वारे सांगण्याचा प्रयत्त्न करतो तो आपण अनुभवला देखील असेल जो तुम्हाला सुद्धा पटण्यासारखा आहे.
अश्या आठवणींची श्रुंखला अनंत आहे ती कधी न संपणारी, स्मृती जरी एकच असली तरी त्याच्या आठवणी अनेक असतात त्या वेगवेगळ्या प्रकारे निरनिराळ्या स्वरूपाने आपल्याशी जुळलेल्या असतात मनामध्ये आत पर्यंत खोलवर रुतलेल्या असतात. "आठवणी ह्या आठवणी असतात, आठवल्या कि आठवत राहतात आणि नाही आठवल्या कि आठवाव्या लागतात...!!"
क्रमशः
दुसऱ्या भागामध्ये
लेखक : अर्जुन ना. वालावलकर